फोटो सौजन्य - सोशल मीडिया
ज्या विद्यार्थ्यांना स्वत:चे करियर इंजिनिअरिंग क्षेत्रात करायचे आहे. त्यांनी प्रथम जेईई ॲडव्हान्स्ड (JEE Advanced 2026) परीक्षेची नोंदणी करणे आवश्यक आहे. या परिक्षेत सहभागी होऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांना देशातील आघाडीच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (IIT) प्रवेश मिळू शकतो. जर तुमचेही स्वप्न आयआयटी संस्थेत प्रवेश मिळवून इंजिनीयरिंग क्षेत्रात करियर करायचे असेल तर त्यांनी त्वरित जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेसाठी अर्ज करा.
पात्र उमेद्वारांनी या परीक्षेसाठी नोंदणी लवकरात लवकर करावी. कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मे २०२६ आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच अर्जाचे शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख ४ मे २०२६ आहे
कोण करू शकतो या परिक्षेला अर्ज?
या परिक्षेसाठी तेच उमेदवार पात्र आहेत ज्यांनी जेईई मेन (JEE Main 2026) परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली आहे. जेईई मेन परीक्षेतील पहिल्या रँकमधील २.५ लाख उमेद्वार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. तसेच पात्र उमेद्वार ऑनलाईन प्रक्रियेद्वारे आपली नोंदणी पूर्ण करू शकतात.
जेईई ॲडव्हान्स्डसाठी अर्ज कसा करावा?






