Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची ‘इटली’वारी! नामांकित विद्यापीठांमध्ये मोफत शिक्षण आणि शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी इटलीतील नामांकित विद्यापीठांमध्ये मोफत शिक्षण आणि शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांना ही संधी मिळणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 18, 2026 | 05:35 PM
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची 'इटली'वारी! (Photo Credit- AI)

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची 'इटली'वारी! (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:

 

  • मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची ‘इटली’वारी!
  • नामांकित विद्यापीठांमध्ये मोफत शिक्षण आणि शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी
मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क: मुंबई विद्यापीठाच्या युरोपियन अभ्यास केंद्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इटलीतील सिएना आणि पेरुजिया येथील नामांकित विद्यापीठांमध्ये इटालियन भाषा व संस्कृतीच्या अध्ययनासाठी मोठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत बी.ए. व एम.ए. (फ्रेंच अभ्यास) या अभ्यासक्रमांमध्ये इटालियन भाषा व संस्कृतीचा मायनर विषय म्हणून समावेश करण्यात आला आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यातील ४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची संधी उपलब्ध झाली आहे. या शिष्यवृत्तीत शिक्षण शुल्क माफीसह मोफत निवास व्यवस्था किंवा ५०० युरोपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.

सप्टेंबर आणि नोव्हेंबर २०२६ मध्ये हे विद्यार्थी अध्ययनासाठी इटली येथे रवाना होणार आहेत. विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर शिक्षण, संशोधन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या व्यापक संधी उपलब्ध व्हाव्या तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी या व्यापक हितासाठी मुंबई विद्यापीठाने या उपक्रमाला सुरुवात केली आहे.

मुंबई विद्यापीठातील युरोपियन अभ्यास केंद्र हे आशियातील एकमेव ‘इरासमस मुंडूस’ अंतर्गत युरोपियन लिटररी कल्चर्स या आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे संचालन करणारे केंद्र आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात या अभ्यासक्रमातील दोन आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना एका सत्रासाठी मुंबई विद्यापीठात अध्ययनाची संधी उपलब्ध करून दिली जाते. विशेष म्हणजे इटलीच्या परराष्ट्र मंत्रालयामार्फत इटालियन नागरिक डॉ. अ‍ॅना फेरारा यांची सहा वर्षांसाठी पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

Teacher Recruitment 2026 : शिक्षक होण्याचे स्वप्न होणार पूर्ण! ‘या’ राज्यात बंपर रिक्त पदांची भरती

याशिवाय, सन १०८८ मध्ये स्थापन झालेल्या आणि युरोपमधील सर्वात जुने मानल्या जाणाऱ्या बोलोनिया विद्यापीठासोबत ‘इरासमस प्लस’ आंतरराष्ट्रीय क्रेडिट मोबिलिटी प्रोग्राम अंतर्गत मुंबई विद्यापीठातील एम.ए. (फ्रेंच) तृतीय सत्रातील एका विद्यार्थ्यांला पाच महिन्यांसाठी इटलीत शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांला दरमहा ८५० युरो शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क माफी तसेच ये-जा विमानप्रवास खर्च दिला जातो. मुंबई विद्यापीठाच्या सामंजस्य करारामुळे परदेशात मिळवलेले शैक्षणिक गुण मुंबई विद्यापीठात हस्तांतरित केले जात असून विद्यार्थ्यांना चौथे सत्र येथे पूर्ण करणे सुलभ होते.

मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय अनुभव मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. इटलीतील नामांकित विद्यापीठांमध्ये मिळालेल्या या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना केवळ भाषा व संस्कृतीचे ज्ञानच नव्हे, तर जागतिक दृष्टीकोन विकसित करण्याचीही मोठी संधी मिळणार असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता निश्चितच अधिक बळकट होईल असा आशावाद मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद; अर्ज करण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत अंतिम मुदत

Web Title: Mumbai university students scholarship italy universities nep 2020

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 05:34 PM

Topics:  

  • Career News
  • Italy
  • Mumbai University

संबंधित बातम्या

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
1

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
2

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
3

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय
4

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.