Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

National Book Trust Recruitment: आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! अर्ज आणि निवड प्रक्रिया जाणून घ्या

National Book Trust Recruitment 2026: नॅशनल बुक ट्रस्ट (NBT) मध्ये 'यंग प्रोफेशनल' पदांसाठी भरती सुरू झाली आहे. ७० हजार रुपयांपर्यंत पगार मिळवण्याची संधी असून ऑफलाईन अर्ज कसा करावा? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 23, 2026 | 03:24 PM
contract job

contract job

Follow Us
Follow Us:

National Book Trust Recruitment 2026:  सरकारी संस्थांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ (NBT) कडून ‘यंग प्रोफेशनल’ या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. जर तुम्ही आर्ट्स किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही विषयात पदवी पूर्ण केली असेल आणि तुमच्याकडे इव्हेंट मॅनेजमेंटचा अनुभव असेल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी ठरू शकते.

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ६०,००० ते ७०,००० रुपये वेतन दिले जाईल. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. चला तर मग, या भरतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

NBT मध्ये नक्की काय काम करावे लागेल?

नॅशनल बुक ट्रस्टतर्फे देशभरात पुस्तक मेळावे, साहित्यिक उत्सव आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या भरती अंतर्गत निवड होणाऱ्या ‘यंग प्रोफेशनल’ उमेदवारांवर खालील जबाबदाऱ्या असतील:

  • या कार्यक्रमांचे नियोजन करणे आणि त्यांचे यशस्वी आयोजन करणे.
  • विविध संस्थांशी समन्वय साधणे.
  • कार्यक्रमांचे अहवाल तयार करणे आणि डेटा संकलित करणे.
  • प्रदर्शक आणि प्रकाशकांशी संपर्क ठेवणे.

कोण करू शकते अर्ज?

शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास कम्युनिकेशन, ह्युमॅनिटीज किंवा संबंधित कला शाखेतून पदवी पूर्ण केलेली असावी.

अनुभव: उमेदवाराकडे कोणत्याही सरकारी विभाग, सांस्कृतिक संस्था किंवा नामांकित संस्थेमध्ये कमीत कमी ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. हा अनुभव प्रदर्शन, परिषदा, पुस्तक मेळावे किंवा मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजनाशी संबंधित असावा.

Google Job: गुगलमध्ये नोकरी मिळवायची आहे का? मग लगेच गूगलच्या रिक्रुटरने सांगितलेल्या ‘या’ ३ टिप्स नक्की फॉलो करा

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय ३२ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. ३२ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

वेतन आणि निवड प्रक्रिया

वेतन: निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹६०,००० ते ₹७०,००० मानधन दिले जाईल.

स्वरुप: ही नियुक्ती मॅनपावर एजन्सीमार्फत कंत्राटी पद्धतीने केली जाईल. सुरुवातीचा कंत्राट कालावधी ३ महिन्यांचा असेल, जो गरजेनुसार पुढे वाढवला जाऊ शकतो.

निवड प्रक्रिया: प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य असेल. कागदपत्रांच्या पडताळणीनंतरच अंतिम निवड केली जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली फास्ट ट्रॅक कोर्टबाबत मोठी घोषणा! Fast Track Court म्हणजे नेमकं काय?

अर्ज कसा करावा?

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

१. अधिकृत अधिसूचनेत दिलेल्या अर्जाच्या नमुन्याची प्रिंट आऊट काढून घ्या.
२. अर्जात विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
३. शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडा.
४. अर्जावर स्वाक्षरी करून तो अंतिम तारखेपूर्वी दिलेल्या पत्यावर स्पीड पोस्ट किंवा डाकेने पाठवा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता: Deputy Director (A&E), National Book Trust, India,5, Institutional Area, Vasant Kunj, New Delhi – 110070

Web Title: National book trust recruitment 2026 young professional apply offline

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • Contract Basis Job
  • High salary Job

संबंधित बातम्या

KMPML Recruitment 2026 : सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी मोठी बातमी! KMPMLअंतर्गत करार पद्धतीने होणार ‘या’ पदांची भरती
1

KMPML Recruitment 2026 : सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी मोठी बातमी! KMPMLअंतर्गत करार पद्धतीने होणार ‘या’ पदांची भरती

Apple New CEO : अ‍ॅपलमध्ये महाभूकंप! टिम कुक मुख्यपदावरून बाजूला, New CEO चा रेकॉर्डब्रेक पगार वाचून थक्क व्हाल
2

Apple New CEO : अ‍ॅपलमध्ये महाभूकंप! टिम कुक मुख्यपदावरून बाजूला, New CEO चा रेकॉर्डब्रेक पगार वाचून थक्क व्हाल

Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा
3

Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

Bank of Baroda Recruitment : बँक ऑफ बडोदात बंपर भरती! २०४९ जागांसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत
4

Bank of Baroda Recruitment : बँक ऑफ बडोदात बंपर भरती! २०४९ जागांसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.