Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

National Doctors Day : १ जुलैलाच का साजरा केला जातो ‘राष्ट्रीय डॉक्टर्स डे’? जाणून घ्या यामागील रंजक इतिहास..

National Doctors Day history: भारतात दरवर्षी १ जुलै रोजी 'राष्ट्रीय डॉक्टर्स डे' का साजरा केला जातो? भारताचे सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' मिळवणारे आणि महात्मा गांधींचे वैयक्तिक डॉक्टर राहिलेले डॉ. बिधान चंद्र रॉय कोण होते? जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास...

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 01, 2026 | 11:49 AM
doctor

doctor

Follow Us
Follow Us:

Dr BC Roy biography : भारतात दरवर्षी १ जुलै रोजी ‘राष्ट्रीय डॉक्टर्स डे’ (National Doctors Day) साजरा केला जातो. रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी आणि लोकांना निरोगी ठेवण्यासाठी दिवस-रात्र झटणाऱ्या डॉक्टरांचा गौरव करण्याचा हा दिवस आहे. डॉक्टर केवळ आजारांवर उपचारच करत नाहीत, तर अनेकदा स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता समाजाची सेवा करतात.

राष्ट्रीय डॉक्टर्स डे हा दिवस देशातील थोर चिकित्सक डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथी निमित्त साजरा केला जातो. विशेष म्हणजे त्यांचा जन्म आणि मृत्यू या दोन्ही एकाच दिवशी म्हणजेच १ जुलै रोजी झाले होते. याच कारणामुळे त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.

भारतात का साजरा केला जातो ‘राष्ट्रीय डॉक्टर्स डे’?

भारतात राष्ट्रीय डॉक्टर्स डे हा डॉक्टरांची निस्वार्थ सेवा, समर्पण आणि समाजाप्रती असलेल्या त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (IMA) दरवर्षी या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करते आणि डॉक्टरांचा सन्मान करते.

कोण होते डॉ. बी. सी. रॉय?

डॉ. बी. सी. रॉय यांचे पूर्ण नाव डॉ. बिधान चंद्र रॉय होते. ते केवळ एक प्रसिद्ध डॉक्टर नव्हते, तर एक थोर समाजसेवक, स्वातंत्र्यसैनिक आणि यशस्वी राजकारणी देखील होते. ते पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी राज्याच्या विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.

ते महात्मा गांधींचे अत्यंत जवळचे मित्र आणि त्यांचे वैयक्तिक डॉक्टर होते. असे सांगितले जाते की, १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनादरम्यानही त्यांनी महात्मा गांधींवर उपचार केले होते.

डॉ. बी. सी. रॉय यांचा जन्म १ जुलै १८८२ रोजी बिहारची राजधानी पाटणा येथे झाला होता. त्यांनी कलकत्ता मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस (MBBS) आणि एमडी (MD) चे शिक्षण पूर्ण केले. यानंतर वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी आपली अशी वेगळी ओळख निर्माण केली की, त्यांचे नाव देशातील सर्वात प्रतिष्ठित डॉक्टरांच्या यादीत समाविष्ट झाले.

PM Narendra Modi security: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठा बदल; ‘हे’ आयपीएस ऑफिसर सांभाळणार त्यांच्या सुरक्षेची धुरा!

शिक्षण आणि समाजसेवेतही मोठे योगदान

डॉ. रॉय हे केवळ डॉक्टर नव्हते तर एक दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञही होते. ते जेव्हा कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू होते, तेव्हा दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानी हवाई हल्ल्यांचा धोका निर्माण झाला होता. त्या काळात त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेतेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

ते अनेक सामाजिक आणि मदतकार्यातही सक्रिय राहिले. वैद्यकीय आणि समाजसेवेतील त्यांचे योगदान लक्षात घेऊन १९४४ मध्ये त्यांना ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’ या पदवीने सन्मानित करण्यात आले.

CBSE 12th Supplementary Exam 2026: CBSE बोर्ड १२ वी सप्लीमेंट्री परीक्षेचे वेळापत्रक जाहीर! कधीपर्यंत करता येणार अर्ज?

१९६१ मध्ये ‘भारतरत्न’ सन्मान

देशासाठी त्यांनी दिलेल्या असाधारण योगदानाचा गौरव करत भारत सरकारने १९६१ मध्ये त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान केला. एक रंजक योगायोग असा की, १ जुलै १९६२ रोजी, म्हणजेच त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांचे निधन झाले.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) शिफारशीवरून भारत सरकारने १९९१ मध्ये पहिल्यांदा ‘राष्ट्रीय डॉक्टर्स डे’ साजरा करण्यास सुरुवात केली. डॉ. बी. सी. रॉय यांच्या योगदानाचा सन्मान करणे आणि देशभरातील डॉक्टरांच्या सेवेला ओळख देणे हा यामागील मुख्य उद्देश होता.

Web Title: National doctors day history significance dr bc roy birth death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • Doctor
  • Jayanti
  • Mahatma Gandhi

संबंधित बातम्या

RBI old notes ban : अरे देवा! पुन्हा एकदा नोटबंदी? ‘महात्मा गांधी’ मालिकेतील नोटांवर RBI चा मोठा निर्णय; बँकिंग क्षेत्रात खळबळ
1

RBI old notes ban : अरे देवा! पुन्हा एकदा नोटबंदी? ‘महात्मा गांधी’ मालिकेतील नोटांवर RBI चा मोठा निर्णय; बँकिंग क्षेत्रात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.