Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai News : डिजिटल जन्मदाखल्यांना दिरंगाई; विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा खोळंबा

Navi Mumbai News : नवी मुंबईत डिजिटल जन्मदाखले मिळण्यास होत असलेल्या विलंबामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार समोर आली आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे २०१६ पूर्वीच्या जन्मदाखल्यांचे अर्ज प्रलंबित असून, दीड महिन्यापासून त्यावर कार्यवाही झालेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 18, 2026 | 07:50 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:

Navi Mumbai News : महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेत डिजिटल जन्म दाखला अनिवार्य ठरत असताना, 2016 पूर्वीच्या जन्मनोंदणीच्या डिजिटल दाखल्यांना विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. नवी मुंबई महापालिकेकडून 2016 नंतरचे जन्म दाखले डिजिटल स्वरूपात दिले जात असले, तरी त्यापूर्वीच्या नोंदींसाठीचे अर्ज पुढील कार्यवाहीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले जातात. मात्र तेथे या अर्जांवर दीड महिन्यापर्यंत कार्यवाही होत नसल्याची तक्रार आहे.

जन्म-मृत्यू नोंदणी कायद्यातील सुधारणांनंतर जन्म-मृत्यू नोंदणी केंद्रीय पोर्टलवर करण्याची प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. शाळा प्रवेश, पासपोर्ट, वाहनचालक परवाना तसेच विविध शासकीय कामांसाठी जन्मतारखेचा अधिकृत पुरावा म्हणून डिजिटल जन्म दाखल्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

नवी मुंबई महापालिकेत 2016 पासून डिजिटल जन्म दाखले देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र 2016 पूर्वीच्या जन्मनोंदीचा डिजिटल दाखला मिळण्यासाठी अर्ज आल्यास तो पुढील कार्यवाहीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केला जातो. संबंधित कार्यालयाकडून या अर्जांवर वेळेत कार्यवाही होत नसल्याने अनेक अर्ज प्रलंबित आहेत.

Navi Mumbai News: मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत BLOच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह; उपमहापौर दशरथ भगत नाराज

दरम्यान, मागील महिन्यापासून महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. प्रवेशावेळी डिजिटल जन्म दाखल्याची मागणी केली जात असल्याने दाखला मिळण्यास होणाऱ्या विलंबाचा थेट परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. प्रवेशाची मुदत संपण्यापूर्वी दाखला मिळत नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचीही धावपळ सुरू आहे.

तातडीने कार्यवाहीची मागणी

प्रलंबित अर्जांवर तातडीने कार्यवाही करून डिजिटल जन्म दाखले लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी समाजसेवक विजय देशमुख यांनी केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रवेश प्रक्रियेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.नवी मुंबई महापालिकेच्या वाशी विभागातील जन्म-मृत्यू नोंदणी विभागाच्या अधिकाऱ्यानेही 2016 नंतरचे जन्म दाखले डिजिटल स्वरूपात दिले जात असल्याची माहिती दिली.

Navi Mumbai News: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीला मिळणार ब्रेक? पाम बीच रोडवर उड्डाणपुलांचा पर्याय

2016 पूर्वीच्या जन्म दाखल्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यास तो ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोट“महाविद्यालय प्रवेशासाठी डिजिटल जन्म दाखला आवश्यक असताना तो मिळण्यास दीड महिन्याचा विलंब होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. संबंधित कार्यालयाने प्रलंबित अर्जांवर तातडीने कार्यवाही करून दाखले वितरित करावेत.”

Web Title: Navi mumbai news delay in digital birth certificates students admissions stalled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 07:50 PM

Topics:  

  • Exam News
  • Navi Mumbai News
  • Thane News update

संबंधित बातम्या

Navi Mumbai News: मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत BLOच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह; उपमहापौर दशरथ भगत नाराज
1

Navi Mumbai News: मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत BLOच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह; उपमहापौर दशरथ भगत नाराज

Mumbai University : अपार आयडीशिवाय हॉलतिकीट नाही; १९-२० ऑगस्टला मुंबई विद्यापीठाचे विशेष शिबिर
2

Mumbai University : अपार आयडीशिवाय हॉलतिकीट नाही; १९-२० ऑगस्टला मुंबई विद्यापीठाचे विशेष शिबिर

Navi Mumbai News: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीला मिळणार ब्रेक? पाम बीच रोडवर उड्डाणपुलांचा पर्याय
3

Navi Mumbai News: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीला मिळणार ब्रेक? पाम बीच रोडवर उड्डाणपुलांचा पर्याय

Navi Mumbai News : भव्य ११११ फूट तिरंगा यात्रेत पनवेल-खारघरमध्ये राष्ट्रभक्तीचा जल्लोष !
4

Navi Mumbai News : भव्य ११११ फूट तिरंगा यात्रेत पनवेल-खारघरमध्ये राष्ट्रभक्तीचा जल्लोष !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.