घोडबंदर रोडवरील खड्डे आणि प्रचंड ट्रॅफिकमुळे त्रस्त झालेल्या आस्ताद काळेने इंस्टाग्राम पोस्टद्वारे राज्यातील पुढाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. शांत आणि सन्मानपूर्वक केलेल्या या पोस्टला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
महाराष्ट्र शासन व भारतीय गुणवत्तापरिषद (QCI) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘कार्यालयीन मूल्यमापन - 100 दिवसांचा कृती कार्यक्रम आराखडा’ अंतर्गत जिल्हा परिषद, ठाणे राज्यभरातून प्रथम क्रमांकावर आली आहे.
सर्व 81 शाळांच्या विरोधात ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यापैकी 68 शाळांच्या विरोधात पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून उर्वरित13 अनधिकृत शाळांविरोधात एफआयआर नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे
ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच आमदारांना रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून निधी देण्यात आला असून रस्ते सुस्थितीत राहावेत व दर्जेदार कामे व्हावी त्याकडे शासनाचा भर असल्याचे देखील चव्हाण यांनी सांगितले.
महापालिकेने एनआरसी कॉलनीतील घरे धोकादायक असल्याचे सांगितले. ती घरे पाडली जात आहे. कामगारांची थकीत देणी एनआरसीकडून मिळालेली नाही. थकीत देण्याचा विषय न्यायप्रविष्ट आहे.
खडकपाडा पोलिसांनी मुलीचा मामा नितेश जाधव आणि कपील ढोले या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात परेश ठाकरे, पंकज आणि अन्य दोन ते तीन जणांचा पोलीस शोध घेत आहेत.
मानपाडा पोलीस ठाण्याचे एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली यामुळे करण्यात आली की, त्यांनी एका महिलेच्या तक्रारीवर एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
ठाण्यात कोकेन आणि एमडी पावडरची विक्री केल्याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने तीन नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 60 ग्रॅम कोकेन आणि 70 ग्रॅम एमडी आणि…