फोटो सौजन्य - Social Media
भारतीय नौदलाने अग्निवीर MR म्युझिशियन 2025 बॅचसाठी प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना आता आपले Indian Navy Agniveer Admit Card 2025 डाउनलोड करता येणार आहे. हे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांनी आपल्या नोंदणीकृत ईमेल आयडी व पासवर्डने लॉगिन करावे लागेल.
प्रवेशपत्रामध्ये परीक्षा दिनांक, परीक्षा सत्र, रिपोर्टिंग वेळ, परीक्षा केंद्राचा संपूर्ण पत्ता यांचा समावेश आहे. उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर जाताना प्रवेशपत्राची प्रिंट आणि एक वैध ओळखपत्र सोबत नेणे आवश्यक आहे. ही भरती SSR (Senior Secondary Recruit) आणि MR (Matric Recruit) पदांसाठी केली जात आहे. यामध्ये पुरुष व महिला दोघांनाही संधी दिली जात आहे. लिखित परीक्षेनंतर शारीरिक चाचणी (PFT) आणि वैद्यकीय तपासणी घेतली जाणार आहे.
उमेदवारांनी आपल्या प्रवेशपत्रावरील सर्व माहिती काळजीपूर्वक तपासावी. नाव, जन्मतारीख, परीक्षा केंद्राचा पत्ता, फोटो इत्यादी कोणतीही माहिती चुकीची असल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधावा.
प्रवेशपत्र कसे डाऊनलोड कराल?
महत्त्वाची माहिती:
भारतीय नौदलामध्ये ही भरती सुरु करण्यात आली होती. अग्नीवीर MR पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली होती. या भरती संबंधित प्रवेश पत्र जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेचा कालावधी, जुलै-ऑगस्ट 2025 (प्रवेशपत्रानुसार) ठरवण्यात आली आहे. या संबंधित अधिक माहिती भारतीय नौदलाच्या www.joinindiannavy.gov.in अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
सर्व उमेदवारांना सुचविण्यात येते की त्यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. परीक्षा केंद्रावर वेळेआधी पोहोचावे आणि शांतपणे परीक्षा द्यावी. अग्निवीर म्हणून देशसेवेची संधी मिळवण्यासाठी ही एक महत्त्वाची पायरी आहे.