इंडियन आर्मीकडून अग्निवीर कॉमन एन्ट्रन्स एक्झाम (CEE) घेण्यात आली होती. ३० जून ते १० जुलै २०२५ दरम्यान पोस्टनुसार परीक्षा आयोजित करण्यात आली होती. आता या परीक्षेत सहभागी झालेले लाखो उम्मीदवार निकालाची वाट बघत आहे. या परीक्षेचा निकाल कधीही लागू शकतो. जो उमेदवार लेखी परीक्षेत पास होणार तोच उमेदवार पुढील टप्प्यासाठी, शारीरिक चाचणीसाठी पात्र असेल. चला जाणून घेऊया या परीक्षेचा निकाल आपल्या कुठे आणि कसा पाहता येईल.
UGC NET 2025: यूजीसी नेटचा निकाल जाहीर; कसे बघता येईल निकाल, कटऑफ काय?
कुठे बघता येईल निकाल?
भारतीय सैन्य अग्निवीर कॉमन एंट्रेस एग्जा (CEE) चा निकाल कधीही जाहीर होऊ शकतो. याचा निकाल भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाईट joinindianarmy.nic.in वर ऑनलाईन जाहीर करण्यात येईल. या वेबसाईटवर तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.
कसा तपासाचा निकाल?
भारतीय सैन्याने अग्निवीर कॉमन एंट्रेस एग्जा (CEE) चा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार केवळ ऑनलाइन निकाल तपासू शकतील. निकालाची माहिती कोणत्याही उमेदवारासोबत वैयक्तिकरित्या शेअर केली जाणार नाही. तुम्ही हा निकाल फक्त ४ पायऱ्यांमध्ये तपासू शकता.
तुम्ही सर्वात आधी joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
वेबसाइटच्या होम पेजवर, तुम्हाला अग्निवीर निकालाशी संबंधित लिंकवर क्लिक करावे लागेल
यानंतर, तुम्हाला ज्या प्रदेशातील गुणवत्ता यादी डाउनलोड करायची आहे त्याच्या शेजारी दिलेल्या PDF लिंकवर क्लिक करावे लागेल.
आता स्क्रीनवर PDF उघडेल जिथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता आणि त्यात तुमचा रोल नंबर तपासू शकता.
शारीरिक भरतीकधी
नोव्हेंबरमध्ये शारीरिक भरतीसाठी रॅली भरती होणार आहे. या भरतीसाठी लेखी परीक्षेत यशस्वी होणारे उमेदवार शारीरिक चाचणीला बसू शकतील. भारतीय सैन्याने ८ आणि ९ नोव्हेंबर २०२५ रोजी शारीरिक भरतीसाठी रॅली आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
शारीरिक पात्रता आणि निकष
आर्मी अग्निवीर शारीरिक चाचणीमध्ये जीडी, टेक्निकल आणि ट्रेड्समन पदांसाठी किमान उंची 169 सेमी आणि छातीची रुंदी 77 सेमी (विस्तारासह 82 सेमी) असावी. राखीव क्षेत्रातून येणाऱ्या उमेदवारांना उंची आणि छातीच्या मापनात सूट दिली जाते. राखीव श्रेणीतील उंची इत्यादींची माहिती
राखीव श्रेणीतील भौतिक मानके, उंची (CMS), वजन (KG), छाती (CMS) माहिती
भौतिक मानके, उंची (CMS), वजन (KG), छाती (CMS)
पश्चिम हिमालय -१६२ सेमी, ४८ किलो, ७७ सेमी
पूर्व हिमालय – १६० सेमी, ४८ किलो, ७७ सेमी
पश्चिम मैदान -१६२ सेमी, ५० किलो, ७७ सेमी
पूर्व मैदान – १६२ सेमी, ५० किलो, ७७ सेमी
मध्य मैदान – १६२ सेमी, ५० किलो, ७७ सेमी
दक्षिण मैदान – १६२ सेमी, ५० किलो, ७७ सेमी
गोरख – १५७ सेमी, ४८ किलो, ७७ सेमी
लडाखी – १५७ सेमी, ४८ किलो, ७७ सेमी
अंदमान आणि निकोबार बेट, लक्षद्वीप गट – मिनिकॉय (स्थानिक) सह – १५७ सेमी, ४८ किलो, ७७ सेमी
अंदमान आणि निकोबार बेट, लक्षद्वीप गट, मिनिकॉय (सेटलर्स) सह – १६५ सीएमएस, ४८ किलो, ७७ सेमी