Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Defense Production: भारतीय लष्कराची ऐतिहासिक झेप! परकीय कंत्राटे ३८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर; स्वदेशी उद्योगांचा डंका

भारतीय खासगी क्षेत्राचा वाटा सहा पटीने वाढून ३१ टक्क्यांवर पोहोचला असून, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचा (पीएसयू) बाटा ५७टक्क्यांवर स्थिर असल्याचे त्यांनी नमूद केले.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 15, 2026 | 04:33 PM
Indian Army Procurement Policy, Indian Army, Atmanirbhar Bharat,

Indian Army Procurement Policy, Indian Army, Atmanirbhar Bharat,

Follow Us
Follow Us:
  • संरक्षण क्षेत्रात खासगी उद्योगांची सहा पट झेप! लष्करी कंत्राटांमध्ये ३१ टक्क्यांपर्यंत वाटा वाढला.
  • लष्कराची ८४ हजार कोटींची खरेदी आणि ‘मेक इन इंडिया’चा जोर; संरक्षण निर्यातीत खासगी क्षेत्राचे ६५% योगदान
  • देशाचे एकूण संरक्षण उत्पादन ५.१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले
Indian Army Procurement Policy : भारतीय लष्कराच्या खरेदी धोरणात गेल्या पाच वर्षांत ऐतिहासिक बदल झाला असून, परकीय कंपन्यांवरील अवलंबित्व ३८ टक्क्यांवरून थेट १२ टक्क्यांवर आले आहे. त्याचबरोबर लष्करी कंत्राटांमध्ये भारतीय खासगी उद्योगांचा वाटा ५ टक्क्यांवरून ३१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ‘उसन्या’ तंत्रज्ञानावर विकसित राष्ट्र बनणे शक्य नसल्याची जाणीव ठेवून लष्कर आता स्वदेशी खासगी भागीदारीवर भर देत आहे, असे प्रतिपादन उप-लष्करप्रमुख (क्षमता विकास आणि शाश्वतता) लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंह यांनी केले.

Ajit Pawar Plane crash New Video: अजित पवारांचा अपघात की घातपात? दुर्घटनेचा नवा ‘स्फोटक’ व्हिडिओ समोर

लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे आयोजित ‘जय से विजय’ (संयुक्तता, आत्मनिर्भरता आणि नवोन्मेष) या चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय लष्कराच्या गेल्या पाच वर्षांतील खरेदीचा आढावा सादर केला. सिंह म्हणाले की, २०१९-२० या आर्थिक वर्षात भारतीय लष्कराने सुमारे ३७हजार कोटी रुपयांच्या कंत्राटांवर स्वाक्षरी केली होती. त्यावेळी परकीय कंपन्यांचा वाटा ३८ टक्के होता, तर खासगी उद्योगांचा वाटा केवळ ५ टक्के होता. मात्र २०२४-२५ या एकाच आर्थिक वर्षात लष्कराने ८४ हजार कोटींहून अधिक मूल्याची कंत्राटे केली असून, परकीय कंपन्यांचा वाटा घटून केवळ १२ टक्क्यांवर आला आहे.

Karjat News : रस्त्याचं निकृष्ट बांधकाम, अवघ्या सहा महिन्यात खड्डे; संतप्त गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

भारतीय खासगी क्षेत्राचा वाटा सहा पटीने वाढून ३१ टक्क्यांवर पोहोचला असून, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचा (पीएसयू) बाटा ५७टक्क्यांवर स्थिर असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताच्या संरक्षण उत्पादनाने यावर्षी ५.१ लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला असून, २०१९ च्या तुलनेत यात ९० टक्क्यांची वाढ झाली आहे. संरक्षण निर्यातीत खासगी क्षेत्राचे योगदान सर्वाधिक म्हणजे ६५ टक्के असल्याचे सांगत त्यांनी भारतीय उद्योगांची क्षमता आणि जागतिक स्तरावर त्यांच्यावरील वाढता विश्वास अधोरेखित होत असल्याचे म्हटले.

Kedarnath Dham Opening Date : सर्व शिवभक्तांची मोठी बातमी! ‘या’ दिवशी उघडणार बाबा केदारनाथ धामचे

‘आता धोरणात्मक स्वायत्तता अपरिहार्य असणार’

२०४७ पर्यंत विकसित भारत’ होण्याचे ध्येय गाठायचे असेल, तर कोणतीही महासता आपल्याला प्रगत तंत्रज्ञान सहज देणार नाही, त्यामुळे धोरणात्मक स्वायत्तता भारतासाठी अत्यावश्यक आहे, केवळ तंत्रज्ञान आत्मसात करण्याऐवजी तंत्रज्ञान नेतृत्व करण्याकडे देशाने वाटचाल करावी, असेही लेपटनंट जनरल सिंह यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Defense production indian armys historic leap foreign contracts down from 38 percent to 12 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • Defense Sector
  • Defense System
  • indian army

संबंधित बातम्या

अभिमानास्पद ! भारतीय जवानांनी वर्ल्ड रोइंग कपमध्ये रचला इतिहास; लक्ष्य–उज्ज्वल जोडीने जिंकले पहिले Gold Medal
1

अभिमानास्पद ! भारतीय जवानांनी वर्ल्ड रोइंग कपमध्ये रचला इतिहास; लक्ष्य–उज्ज्वल जोडीने जिंकले पहिले Gold Medal

Operation Sindoor: देशासाठी सर्वोच्च बलिदान! ‘ऑपरेशन सिंदूर’च्या ६ शूरवीरांची नावे जाहीर; नॅशनल वॉर मेमोरियलमध्ये मानवंदना
2

Operation Sindoor: देशासाठी सर्वोच्च बलिदान! ‘ऑपरेशन सिंदूर’च्या ६ शूरवीरांची नावे जाहीर; नॅशनल वॉर मेमोरियलमध्ये मानवंदना

Operation Sindoor Martyrs: ‘ऑपरेशन सिंदूर’मधील ६ शहीद जवानांची नावे प्रथमच अधिकृतपणे जाहीर; देशासाठी सर्वोच्च बलिदान
3

Operation Sindoor Martyrs: ‘ऑपरेशन सिंदूर’मधील ६ शहीद जवानांची नावे प्रथमच अधिकृतपणे जाहीर; देशासाठी सर्वोच्च बलिदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.