फोटो सौजन्य - Social Media
नॅशनल कॅपिटल रिजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (NCRTC) कडून दिल्ली-मेरठ नामो भारत रेल्वे प्रकल्पासाठी विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना नुकतीच जाहीर झाली असून, ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स विभागात थेट भरतीच्या माध्यमातून तांत्रिक, अभियांत्रिकी आणि प्रशासकीय पदांवर निवड केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २४ मार्च २०२५ पासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २४ मे २०२५ पर्यंत अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
या भरतीतील सर्व पदांसाठी कमाल वयोमर्यादा २५ वर्षे ठेवण्यात आली आहे. मात्र, मागासवर्गीय उमेदवारांसाठी नियमानुसार वयात सवलत देण्यात येणार आहे. SC/ST उमेदवारांना ५ वर्षे, OBC (NCL) साठी ३ वर्षे, तसेच दिव्यांग आणि माजी सैनिक उमेदवारांसाठीही विशेष सवलतीची तरतूद आहे.
उमेदवारांची निवड दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. सर्वप्रथम संगणकाधारित चाचणी (CBT) घेतली जाईल. यात १०० प्रश्न असतील आणि ती ९० मिनिटांची असेल. CBT मध्ये निगेटिव्ह मार्किंग नसून पेपर इंग्रजी आणि हिंदी या दोन माध्यमांतून असेल. CBT मध्ये पात्र ठरलेले उमेदवार वैद्यकीय तपासणीस पात्र ठरतील. ही तपासणी भारतीय रेल्वेच्या वैद्यकीय मानकांनुसार केली जाईल. मात्र, CBT पास होणे म्हणजे अंतिम निवड निश्चित आहे असे नाही.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.ncrtc.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. त्यानंतर ‘Career’ विभागात जाऊन ‘O&M Vacancy Notice No. 13/2025’ या पर्यायावर क्लिक करावे. अर्ज करताना उमेदवारांनी आपली वैयक्तिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक माहिती भरावी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. त्यानंतर अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून अर्ज सबमिट करावा.
महत्त्वाची तारखा:
या संधीचा लाभ घेऊन इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. 1