फोटो सौजन्य - Social Media
बारावीचा निकाल लागल्यानंतर राज्यात दहावीच्या निकालासंदर्भात उत्सुकता वाढत आहे. अशामध्ये देशभरात आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या संबंधित मनामध्ये तयार होणाऱ्या अनेक प्रश्नांना आणि गोंधळाला टाळण्यासाठी राज्य शिक्षण मंडळांनी दहावीच्या निकालाबाबत महत्वाची माहिती जाहीर केली आहे.
यंदाच्या वर्षी एकूण १६ लाख विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेला उपस्थिती लावली होती, जी मागच्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. २०२४मध्ये ही संख्या १५,४९,६२३ इतकी होती. राज्यभरातही परीक्षा घेण्यात आली होती. यंदाची SSC प्रात्यक्षिक परीक्षा ३ फेब्रुवारी २०२५ ते २० फेब्रुवारी २०२५ दरम्यान घेण्यात आली होती. यानंतर लेखी परीक्षेला सुरुवात करण्यात आली होती. मागच्या वर्षी हा निकाल ९५.८१% लागल्याने यंदाच्या वर्षी निकाल काय असेल? असा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये आणि संपूर्ण राज्यातील नागरिकांना पडला आहे.
दहावीचा निकाल कधी करण्यात येईल जाहीर?
दहावीच्या निकालाबाबत काही ठरविक तारीख जाहीर करण्यात आली नाही आहे. मुळात, निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार अशी एकंदरीत शक्यता वर्तवण्यात आली होती, परंतु अधिकृतपणे असे काहीच जाहीर करण्यात आले नाही. दहावीच्या निकालाबाबत महत्वाची माहिती शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी याबाबत वेळोवेळी या संकेतस्थळांवर लक्ष ठेवावे. देशात चालू असलेल्या आपात्कालीन परिस्थितीचाही या निकालाच्या तारखांवर परिणाम होऊ शकतो.
अशा प्रकारे चेक करता येईल निकाल?
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तो ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. निकाल पाहण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा:
ऑनलाईन निकाल हा तात्पुरता असतो. विद्यार्थ्यांनी अधिकृत मार्कशीट आणि प्रमाणपत्र त्यांच्या शाळेतून काही दिवसांनी प्राप्त करून घ्यायचे असते. शाळांमार्फतच हे कागदपत्र वितरीत केले जातात.