Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET PG 2026: नीट परीक्षेत वीज गेली किंवा कॉम्प्युटर हँग झाला तर काय कराल? NBEMS ने दिली महत्त्वाची माहिती!

NEET PG 2026 Exam Guidelines: नीट पीजी २०२६ परीक्षेदरम्यान पाॅवर कट, सिस्टीम लॉक किंवा तांत्रिक अडचण आल्यास उमेदवारांनी काय करावे? जाणून घेण्यासाठी NBEMS च्या महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना एकदा वाचाच.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 25, 2026 | 10:32 AM
neet pg

neet pg

Follow Us
Follow Us:

NEET PG 2026 Exam Guidelines: नीट पीजी २०२६ (NEET PG 2026) परीक्षेला आता फारसा वेळ उरलेला नाही. परीक्षेच्या तयारीसोबतच परीक्षा केंद्रावरील व्यवस्थेबाबतही उमेदवारांच्या मनात अनेक प्रश्न असतात. विशेषतः संगणकावर घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत अचानक वीज गेली, सिस्टीम लॉक झाली किंवा स्क्रीन आणि माउसमध्ये काही बिघाड झाला, तर काय करायचे? याबाबत नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.

एनबीईएमएसच्या मते, परीक्षेदरम्यान कोणत्याही तांत्रिक समस्येबाबत उमेदवारांनी अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आली असून, तांत्रिक बिघाडामुळे उमेदवाराच्या ठरलेल्या वेळेचे नुकसान होणार नाही.

३० ऑगस्ट रोजी होणार NEET PG २०२६ परीक्षा

NBEMS द्वारे ३० ऑगस्ट २०२६ रोजी NEET PG २०२६ परीक्षा आयोजित केली जाईल. अधिकृत माहितीनुसार, या परीक्षेसाठी एकूण २,७३,१८३ उमेदवारांनी यशस्वीरित्या नोंदणी केली आहे. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत १२.५ टक्क्यांनी अधिक आहे. ही परीक्षा सुमारे ३४० शहरांमध्ये आणि १३०० हून अधिक परीक्षा केंद्रांवर एकाच शिफ्टमध्ये घेतली जाईल.

पावर कट झाल्यास काय करावे?

जर उमेदवाराने परीक्षेत लॉगिन केले असेल आणि त्याच दरम्यान वीज गेली, तर उमेदवाराला स्वतःहून कोणतीही कृती करण्याची गरज नाही. एनबीईएमएसनुसार, वीज जाताच परीक्षेचा टायमर थांबेल. वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर टायमर जिथे थांबला होता, तिथूनच पुन्हा सुरू होईल. म्हणजेच तांत्रिक समस्येमुळे उमेदवाराच्या परीक्षा वेळेत कोणतीही कपात केली जाणार नाही.

IT Career : बीटेकशिवाय आयटी सेक्टरमध्ये लाखांचे पॅकेज कसे मिळवायचे? जाणून घ्या सर्वोत्कृष्ट करिअर पर्याय!

संगणक लॉक झाल्यास काय होईल?

परीक्षेदरम्यान मुख्य सर्व्हरवरील कनेक्टिव्हिटी संपल्यामुळे जर उमेदवाराची मशिन लॉक झाली, तर परीक्षा केंद्राच्या प्रत्येक परीक्षा खोलीत उपस्थित असलेला आयटी मॅनेजर उमेदवाराचे अकाउंट व्हेरिफाय करून ते अनलॉक करेल. त्यानंतर उमेदवाराने जिथे परीक्षा सोडली होती, त्याच वेळेपासून परीक्षेचा टायमर पुन्हा सुरू होईल.

स्क्रीन किंवा माउसमध्ये अडचण आल्यास तात्काळ सांगा

जर उमेदवाराच्या सिस्टीममध्ये स्क्रीन फ्लिकर होणे, माउसमध्ये अडचण येणे, सिस्टीम वारंवार लॉक किंवा हँग होणे यांसारख्या काही विशिष्ट समस्या येत असतील, तर याची माहिती तात्काळ सुपरव्हायझरला द्यावी लागेल. एनबीईएमएसनुसार, तक्रार मिळाल्यानंतर आयटी मॅनेजर किंवा इनव्हिजिलाइट्र उमेदवाराची मशिन व्हेरिफाय करून लॉक करेल. गरज भासल्यास उमेदवाराला त्याच लॅबमध्ये किंवा इतर लॅबमधील बफर सीटवर  हलवले जाऊ शकते.

NEET PG 2026 परीक्षेपूर्वी पेपर झाला लीक? NBEMS कडून विद्यार्थ्यांसाठी कडक इशारा!

परीक्षा केंद्रांवर सुरक्षेची कडक व्यवस्था

अधिकृत माहितीनुसार, NEET PG २०२६ साठी परीक्षा केंद्रांची आधीच सीलिंग आणि पडताळणी, सीसीटीव्ही (CCTV) निगराणी, बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन, उमेदवारांची फ्रिस्किंग आणि सिग्नल जॅमर यांसारख्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. याशिवाय, डायनॅमिक कॉम्प्युटर्स, केंद्रीय आणि प्रादेशिक कमांड सेंटरद्वारे लाइव मॉनेटरिंग तसेच स्वतंत्र निरीक्षक (Observers) आणि अप्रेझर्सची रिअल-टाइम निगराणी या परीक्षा व्यवस्थेचा एक भाग असेल.

Web Title: Neet pg 2026 technical glitch guidelines nbems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 10:32 AM

Topics:  

  • exam tips
  • guide
  • NEET
  • NEET PG Exam

संबंधित बातम्या

NEET PG 2026 परीक्षेपूर्वी पेपर झाला लीक? NBEMS कडून विद्यार्थ्यांसाठी कडक इशारा!
1

NEET PG 2026 परीक्षेपूर्वी पेपर झाला लीक? NBEMS कडून विद्यार्थ्यांसाठी कडक इशारा!

NEET PG 2026 परीक्षा ३० ऑगस्ट रोजी! लवकरच येणार प्रवेशपत्र, परीक्षा केंद्रावर ‘ही’ कागदपत्रे नेणे आवश्यक
2

NEET PG 2026 परीक्षा ३० ऑगस्ट रोजी! लवकरच येणार प्रवेशपत्र, परीक्षा केंद्रावर ‘ही’ कागदपत्रे नेणे आवश्यक

Rahul Gandhi Protest: NEET, पेलेट गन अन् ‘वंदे मातरम्’वरून राजकीय घमासान; राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचे प्रत्युत्तर
3

Rahul Gandhi Protest: NEET, पेलेट गन अन् ‘वंदे मातरम्’वरून राजकीय घमासान; राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचे प्रत्युत्तर

Free NEET JEE Coaching: केंद्र सरकारची मोठी तयारी! आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना ‘या’ तारखेपासून मिळणार मोफत शिक्षण!
4

Free NEET JEE Coaching: केंद्र सरकारची मोठी तयारी! आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना ‘या’ तारखेपासून मिळणार मोफत शिक्षण!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.