फोटो सौजन्य- सोशल मीडिया
NEET PG 2026 Paper Leak Claims Fake: नीट पीजी २०२६ (NEET PG 2026) परीक्षेच्या काही दिवस आधी सोशल मीडियावर पेपर लीक झाल्याचे दावे समोर येऊ लागले आहेत. टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपसारख्या प्लॅटफॉर्मवर काही अकाउंट्स आणि चॅनेल्सवर नीट पीजीचा पेपर उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस ने उमेदवारांसाठी अलर्ट जारी केला आहे. सोशल मीडियावर सुरू असलेले पेपर लीकचे दावे पूर्णपणे खोटे असून उमेदवारांनी अशा मेसेज किंवा पोस्टवर अजिबात विश्वास ठेवू नये, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
नीट पीजी २०२६ चे आयोजन ३० ऑगस्ट २०२६ रोजी होणार आहे. परीक्षेस आता काहीच दिवस शिल्लक असताना, सोशल मीडियावर समोर येत असलेल्या पेपर लीकच्या दाव्यांमुळे उमेदवारांची चिंता वाढवली आहे. परीक्षेेशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी केवळ अधिकृत वेबसाईटवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन NBEMS ने उमेदवारांना केले आहे. तसेच, ३० ऑगस्ट रोजी होणारी ही परीक्षा देशभरात एकाच शिफ्टमध्ये घेतली जाईल. यासाठी ३४० शहरांमध्ये १३०० हून अधिक परीक्षा केंद्र तयार करण्यात आली आहेत. शिवाय, नीट पीजी परीक्षा ही देशभरातील वैद्यकीय संस्थांमध्ये पोस्ट ग्रॅजुएट कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा आहे. याद्वारे एमएस, एमडी आणि इतर पोस्ट ग्रॅजुएट मेडिकल प्रोग्राममध्ये प्रवेश मिळतो.
Lost Marksheet : १० वी-१२ वीची मार्कशीट हरवली? आता घाबरू नका, या सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच मिळवा
NBEMS नुसार, सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर अशा पोस्ट आणि मेसेज व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये नीट पीजी २०२६ चा प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा आणि पेपर आधीच उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे. काही ठिकाणी पेपर किंवा परीक्षेशी संबंधित इतर माहिती लीक होत असल्याचे म्हटले जात आहे. बोर्डाने हे दावे बनावट आणि दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे. नीट पीजीच्या पेपर लीकचा दावा करणाऱ्या कोणत्याही सोशल मीडिया अकाउंट, चॅनेल किंवा जाहिरातीवर विश्वास ठेवू नका, असा सल्ला उमेदवारांना देण्यात आला आहे.
Sindhudurg DCC Bank : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत ‘या’ पदांची भरती; आजपासूनच ऑनलाईन अर्ज सुरू!
परीक्षा जवळ आल्याने सोशल मीडियावर असे ऑफर्स मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामध्ये कथित पेपर किंवा परीक्षेशी संबंधित सामग्री उपलब्ध करून देण्याच्या बदल्यात पैसे मागितले जातात. उमेदवारांनी कोणतीही खात्री न करता कोणतीही पोस्ट पुढे शेअर करण्यास, त्यांची खाजगी माहिती देण्यास किंवा कोणत्याही प्रकारचे पेमेंट करण्यास सक्त मनाई केली आहे. परीक्षेशी संबंधित सर्व अधिकृत माहिती केवळ NBEMS कडूनच जारी केली जाईल.






