Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET Pre Ayurveda 2026: संस्कृतच्या विद्यार्थ्यांना १० वी नंतर थेट आयुर्वेद डॉक्टर बनता येणार; जाणून घ्या सविस्तर

NEET Pre Ayurveda 2026: केंद्रीय संस्कृत विद्यापीठाने सुरू केलेल्या 'नीट प्री-आयुर्वेद २०२६' अंतर्गत १० वी पास विद्यार्थ्यांना थेट साडेसात वर्षांच्या BAMS कोर्सला प्रवेश कसा मिळणार? जाणून घ्या या ऐतिहासिक निर्णयाची आणि प्रवेश परीक्षेची संपूर्ण माहिती सविस्तर

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 10, 2026 | 05:46 PM
neet

neet

Follow Us
Follow Us:

NEET Pre Ayurveda 2026: वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि अनोखी बातमी समोर आली आहे. सामान्यतः डॉक्टर बनण्यासाठी १२ वी  उत्तीर्ण होऊन ‘NEET’ सारखी कठीण परीक्षा क्रैक करावी लागते. परंतु, आता या पारंपरिक मार्गापेक्षा एक वेगळा आणि रंजक पर्याय उपलब्ध झाला आहे. विद्यार्थ्यांना १० वी पास झाल्यानंतरच आयुर्वेद डॉक्टर बनण्याच्या दिशेने पाऊल टाकण्याची संधी मिळणार आहे.

मात्र, हा पर्याय सर्वच १० वी पास विद्यार्थ्यांसाठी नसेल. संस्कृत विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेद शिक्षणाची ही नवी कपाटे खुली करण्यात आली आहेत. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ‘नीट प्री-आयुर्वेद’ बाबतची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.

१० वी पास विद्यार्थ्यांसाठी साडे सात वर्षांचा BAMS कोर्स काय आहे?

या प्रवेश परीक्षेद्वारे पात्र उमेदवार ‘आयुर्वेद चिकित्सा आणि शल्यचिकित्सा पदवी’ हा कोर्स करू शकतील. या संपूर्ण कोर्सचा कालावधी साडेसात वर्षांचा असेल, ज्याची रचना खालीलप्रमाणे आहे:

२ वर्षे: प्री-आयुर्वेद गुरुकुल कार्यक्रम

साडेचार वर्षे: मुख्य बीएएमएस (BAMS) अभ्यासक्रम

१ वर्ष: अनिवार्य इंटर्नशिप

नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन (NCISM) ने या कोर्सला मंजुरी दिली आहे. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाशी संलग्न असलेली ‘आयुर्वेद गुरुकुले’ हा कार्यक्रम चालवणार आहेत. यासाठी ‘आयुर्वेद गुरुकुल संलग्नता पोर्टल’ देखील सुरू करण्यात आले आहे.

Indian Army Medical Officer Jobs: भारतीय सैन्यात डॉक्टर व्हायचयं! मग ‘हे’ पात्रता निकष लगेच जाणून घ्या

पात्रता आणि निकष

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त बोर्ड, राज्य संस्कृत बोर्ड किंवा समकक्ष बोर्डातून १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच सर्वसामान्य प्रवर्गातील उमेदवरांना किमान ५०% गुण आवश्यक तर SC, ST, OBC आणि दिव्यांग (PwD) उमेदवारांना किमान ४०% गुण असणे आवश्यक आहेत.

वयोमर्यादा: ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत उमेदवाराचे वय किमान १५ वर्षे आणि कमाल २५ वर्षे असावे. .

महत्त्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रियेची सुरुवात: परीक्षा नियंत्रक प्रो. पवन कुमार यांच्या माहितीनुसार, या कोर्सची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया जुलै २०२६ च्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होईल. याच्या प्रवेशासाठी ऑनलाईन एट्रांन्स परीक्षा असेल, जी ऑगस्ट २०२६ च्या अंतिम आठवड्यात किंवा सप्टेंबर २०२६ च्या पहिल्या आठवड्यात देशभरातील विविध केंद्रांवर घेतली जाईल.

Corporate Trend 2026: सध्या मोठ्या कंपन्या चांगला नफा कमावूनही ‘कॉस्ट कटिंग’ आणि नोकरकपात का करत आहेत? जाणून घ्या सविस्तर

परीक्षा पद्धत कशी असेल?

परीक्षा ऑफलाइन म्हणजेच पेन-पेपर (OMR) आधारित असेल. परीक्षेसाठी एकूण १५० मिनिटे वेळ दिला जाईल.  यामध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार असून यामध्ये संस्कृत वाङ्मय, व्याकरण, पुराण-इतिहास, दर्शन आणि भारतीय ज्ञान परंपरा या विषयांचा समावेश असेल. तसेच ही परीक्षा हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत अशा तीन भाषांमध्ये आयोजित केली जाईल.

Web Title: Neet pre ayurveda 2026 bams after 10th sanskrit students marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • Doctor
  • NEET

संबंधित बातम्या

Army Doctor : भारतीय सैन्यात डॉक्टर कसे बनतात? जाणून घ्या परीक्षा, पात्रता आणि सॅलरी पॅकेज..
1

Army Doctor : भारतीय सैन्यात डॉक्टर कसे बनतात? जाणून घ्या परीक्षा, पात्रता आणि सॅलरी पॅकेज..

NEET UG Scam : नीट परीक्षा वादावर सर्वात मोठी अपडेट; मास्टरमाइंड्सचे चेहरे लवकरच उघड होणार?
2

NEET UG Scam : नीट परीक्षा वादावर सर्वात मोठी अपडेट; मास्टरमाइंड्सचे चेहरे लवकरच उघड होणार?

NEET UG 5th Largest Exam: जगातील सर्वात कठीण परीक्षांमध्ये भारतातील ‘या’ परीक्षेला स्थान; SBI रिसर्च अहवालातील मोठे खुलासे
3

NEET UG 5th Largest Exam: जगातील सर्वात कठीण परीक्षांमध्ये भारतातील ‘या’ परीक्षेला स्थान; SBI रिसर्च अहवालातील मोठे खुलासे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.