Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खांदा सतत दुखतोय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

सततची आणि कारण न सापडणारी खांदेदुखी केवळ स्नायू किंवा सांध्यांचा त्रास नसू शकतो. काही दुर्मीळ प्रकरणांत फुफ्फुसाच्या वरच्या भागातील गाठीमुळे खांद्यात वेदना, हातात मुंग्या किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. त्यामुळे अशी असामान्य लक्षणे दीर्घकाळ राहिल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 20, 2026 | 01:16 PM
खांदा सतत दुखतोय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

खांदा सतत दुखतोय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

Follow Us
Follow Us:

खांद्यातील सतत जाणवणारी वेदना फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते का? असा प्रश्न सहसा कोणाच्या मनात येत नाही. बहुतेक लोक खांद्याच्या दुखण्याला चुकीचे बसने, स्नायूंचा ताण किंवा दिवसभराच्या कामाचा ताणतणाव असे कारण मानतात; मात्र कारण न सापडणारी आणि काहीही केल्यावरही न जाणारी अस्वस्थता कधीकधी अधिक गंभीर गोष्टीकडे निर्देश करते. ती म्हणजे काही दुर्मीळ प्रकरणांमध्ये खरा त्रास खांद्यात नाही तर फुफ्फुसात असतो.

 

फुफ्फुसाच्या कर्करोमध्ये सततचा खोकला, दम लागणे आणि छातीत दुखणे अशी लक्षणे असतात. मात्र काही गाठी कोणतेही लक्षण न दाखवता न कळत वाढतात आणि श्वसनाशी संबंधित नेहमीची लक्षणे दिसण्यापूर्वीच खांद्यात किंवा हातात वेदना निर्माण करतात. फारसे माहीत नसलेल्या या इशाऱ्याकडे बऱ्याचदा स्नायू किंवा सांधे यांची सामान्य तक्रार म्हणून दुर्लक्ष होते आणि त्यामुळे या कर्करोगाचे लवकर निदान होत नाही व त्यामुळे वेळेवर उपचार देखील घेतले जात नाहीत.

या कर्करोगाबाबत पुण्यातील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या फुफ्फुसरोग विभागाचे सहयोगी संचालक डॉ. आनंद विजय सांगतात की, “खांद्याची वेदना सहसा स्नायू किंवा सांधे यांच्याशी जोडली जाते, पण कारण न सापडणारी, सतत जाणवणारी अस्वस्थता दुर्लक्ष करण्यासारखी नाही. विशेषतः तिच्यासोबत हातातील अशक्तपणा, बधीरपणा किंवा मुंग्या येणे असेल तर. काही दुर्मीळ प्रकरणांमध्ये फुफ्फुसाच्या सर्वांत वरच्या भागातील गाठी जवळच्या नसांवर परिणाम करतात आणि श्वसनाची नेहमीची लक्षणे दिसण्यापूर्वीच वेदना निर्माण करतात. बहुतेक खांद्याच्या वेदना कर्करोगामुळे होत नाहीत, हे खरे; तरी असामान्य लक्षणे ओळखून वेळेत वैद्यकीय तपासणी करून घेतल्यास निदानस होणारा उशिर टळता येऊ शकतो. ”

फुफ्फुसाचा कर्करोग खांद्याच्या वेदनेने सुरू होतो तेव्हा काय होते?

पँकोस्ट ट्यूमर (Pancoast tumour) हा फुफ्फुसाच्या कर्करोगाचा एक दुर्मीळ प्रकार आहे. यात एकूण फुफ्फुस कर्करोगाच्या सुमारे ३ ते ५ टक्के प्रकरणांत आढळतो. या गाठी फुफ्फुसाच्या अगदी वरच्या भागात, खांदा, बरगड्या, पाठीचा कणा आणि महत्त्वाच्या नसांच्या अगदी जवळ वाढतात. श्वसनमार्गातील गाठींच्या तुलनेत पँकोस्ट गाठींमुळे सुरुवातीला खोकला जवळपास होत नाही. त्याऐवजी या गाठी जवळच्या नसांना दाबतात किंवा त्यांच्यात शिरतात. विशेषतः हात व बोटांच्या हालचाली आणि संवेदना नियंत्रित करणाऱ्या नसांना. वेदना सहसा एका खांद्यापासून सुरू होते आणि खांद्याकडे, हाताकडे किंवा बोटांकडे पसरू शकते. ती फ्रोझन शोल्डर (frozen shoulder), सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस किंवा स्नायूंची दुखापत असे समजली जाऊ शकते आणि त्यामुळे निदान उशिरा होऊ शकते.

खांद्याची वेदना कधी चिंतेची बाब ठरते?

बहुतेक खांद्याच्या वेदना निरुपद्रवी असतात; मात्र सतत राहणारी किंवा वाढत जाणारी अस्वस्थता. विशेषतः उपचार घेतल्यानंतरही न कमी होणारी किंवा रात्री अधिक जाणवणारी वेदना दुर्लक्षित करू नये. खांद्यापासून हाताच्या दिशेने, विशेषतः अनामिका व करंगळीकडे पसरणाऱ्या वेदनेची अधिक तपासणी आवश्यक ठरू शकते. मुंग्या येणे, बधीरपणा, पकड कमी होणे किंवा हातात अशक्तपणा, तसेच कारण न सापडणारे वजन कमी होणे किंवा असामान्य थकवा अशी लक्षणे आहेत. काही प्रकरणांमध्ये एका बाजूची पापणी लटकणे, बुबुळ लहान दिसणे किंवा चेहऱ्याच्या एका बाजूला घाम कमी येणे हे हॉर्नर सिंड्रोम दर्शवू शकते; जवळच्या नसांवर परिणाम झाल्यास हे होऊ शकते. या लक्षणांचा अर्थ कर्करोगच असतो असे नाही; मात्र ती सतत राहिल्यास किंवा एकत्र दिसल्यास वेळेत वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा : स्वयंपाकघरात झुरळे, मुदतबाह्य पदार्थ; लोणावळ्यातील चार हॉटेल्सवर एफडीएची कारवाई

वेळीच तपासणी का महत्त्वाची?

फुफ्फुसाचा कर्करोग कधीही धूम्रपान न केलेल्या लोकांनाही होऊ शकतो. तंबाखूच्या सेवनाशिवाय अप्रत्यक्ष धूम्रपान, हवेचे प्रदूषण आणि काही व्यावसायिक जोखमीही धोका वाढवतात. खांद्याच्या वेदनेचे कारण स्पष्ट होत नसेल तर डॉक्टर वैद्यकीय तपासणीच्या निष्कर्षांवर आधारित छातीचा एक्स-रे, सीटी स्कॅन किंवा एमआरआय करण्याचा सल्ला देतात. संशयित गाठीची पुष्टी करण्यासाठी बायोप्सी
देखील केली जाते.

कर्करोगाचा प्रकार आणि अवस्था यानुसार उपचारांमध्ये केमोथेरपी, रेडिएशन, शस्त्रक्रिया किंवा इतर विशेष उपचारांचा समावेश असू शकतो. फुफ्फुस कर्करोग जागृती मासानिमित्त संदेश साधाच आहे: प्रत्येक खांद्याची वेदना कर्करोगाचे लक्षण असते असे नाही; मात्र स्नायू किंवा सांधे यांच्या सामान्य तक्रारीपेक्षा वेगळ्या पद्धतीने वागणारी सततची वेदना दुर्लक्षित करू नये. असामान्य इशारा देणारी लक्षणे ओळखणे आणि वेळेत तपासणी करून घेणे यामुळे मोठा फरक पडू शकतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सतत खांदेदुखी हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते का?

    Ans: होय, काही दुर्मीळ प्रकरणांमध्ये फुफ्फुसाच्या वरच्या भागातील पँकोस्ट ट्यूमरमुळे खांद्यात सतत वेदना होऊ शकतात. मात्र बहुतेक खांदेदुखी कर्करोगामुळे होत नाही.

  • Que: खांदेदुखीसोबत कोणती लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा?

    Ans: खांदेदुखी सतत राहणे, उपचार करूनही कमी न होणे, रात्री वेदना वाढणे, हातात मुंग्या किंवा बधिरपणा, अशक्तपणा, पकड कमी होणे, वजन कमी होणे किंवा असामान्य थकवा अशी लक्षणे असल्यास वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

  • Que: खांदेदुखीमागे फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचा संशय आल्यास कोणत्या तपासण्या केल्या जातात?

    Ans: डॉक्टरांच्या तपासणीनंतर छातीचा एक्स-रे, सीटी स्कॅन किंवा एमआरआय करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. गाठ आढळल्यास तिची खात्री करण्यासाठी बायोप्सी केली जाऊ शकते.

Web Title: Experts have offered important advice regarding persistent shoulder pain nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • Doctor
  • lung cancer
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Anti Encroachment: अतिक्रमाणात राजकीय हस्तक्षेप करणाऱ्यांची नावे आणि छायाचित्रे सार्वजनिक करणार: नवलकिशोर राम
1

Pune Anti Encroachment: अतिक्रमाणात राजकीय हस्तक्षेप करणाऱ्यांची नावे आणि छायाचित्रे सार्वजनिक करणार: नवलकिशोर राम

पुण्यातील पाणीपुरवठ्याचा निर्णय थेट मुख्यमंत्र्यांच्या ‘कोर्टा’त; निर्णयाकडे पुणेकरांचे लागले लक्ष
2

पुण्यातील पाणीपुरवठ्याचा निर्णय थेट मुख्यमंत्र्यांच्या ‘कोर्टा’त; निर्णयाकडे पुणेकरांचे लागले लक्ष

Crime News: दुबईत अडकलेल्या महिलेची मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांतून सुटका
3

Crime News: दुबईत अडकलेल्या महिलेची मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांतून सुटका

अजितदादांच्या मृत्यूमागील सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला कधी मिळणार? पुण्यात झळकले बॅनर
4

अजितदादांच्या मृत्यूमागील सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला कधी मिळणार? पुण्यात झळकले बॅनर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.