Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET Result: नीट परीक्षेचा घोळ संपेना! बीडमध्ये सोहम आणि ज्ञानेश्वरीच्या ‘आन्सर की’ आणि गुणपत्रिकेत मोठी तफावत

NEET Result Controversy: नीट परीक्षेच्या निकालात बीड जिल्ह्यातील ज्ञानेश्वरी पवार आणि सोहम गवते या विद्यार्थ्यांसोबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आन्सर की नुसार जास्त गुण असताना प्रत्यक्षात मात्र कमी गुण मिळाल्याने गोंधळ वाढला आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 18, 2026 | 04:28 PM
neet controversy

neet controversy

Follow Us
Follow Us:

NEET Result Controversy: देशभरात नीट परीक्षेच्या (NEET) पेपरफुटीवरून सुरू असलेला गोंधळ अद्यापही शमलेला नाही. एकीकडे राजधानी दिल्लीत सोनम वांगचुक यांचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत उपोषण सुरू आहे, तर दुसरीकडे नीटच्या पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील दोन गुणवंत विद्यार्थ्यांना निकालानंतर मोठा मानसिक धक्का बसला असून, पुन्हा एकदा नीट परीक्षेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

टॉपरच्या शर्यतीत असणाऱ्या ज्ञानेश्वरीला अवघे ८७ गुण

बीड जिल्ह्यातील ज्ञानेश्वरी पवार या विद्यार्थिनीने नुकतीच पार पडलेली नीटची परीक्षा दिली होती. वर्षभर दिवसातील १८-१८ तास अभ्यास करणारी ज्ञानेश्वरी टॉपरच्या शर्यतीत होती. परीक्षा संपल्यानंतर अधिकृत आन्सर की नुसार गुण तपासले असता, तिला ७०० पेक्षा जास्त गुण मिळत होते. त्यामुळे तिने थेट ‘एम्स दिल्ली’मध्ये प्रवेश मिळवण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, प्रत्यक्षात स्कोअरकार्ड हातात आल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्ञानेश्वरीला थेट ८७ गुण दाखवण्यात आले आहेत. हा निकाल पाहून ज्ञानेश्वरी आणि तिच्या कुटुंबाला अश्रू अनावर झाले आहेत.

NEET UG 2026: नीट निकालानंतर कोणत्या रँकवर कोणता कोर्स मिळणार? MBBS, BDS आणि BAMS मधील प्रवेशाची जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया..

ओ.एम.आर. शीटमध्ये तफावतीचा आरोप

ज्ञानेश्वरीच्या आई मीरा पवार यांनी राष्ट्रीय परीक्षा संस्थेवर (NTA) गंभीर आरोप केले आहेत. “माझ्या मुलीला चुकीची ओएमआर (OMR) शीट देण्यात आली आहे. तिने जेवण सोडून वर्षभर अभ्यास केला. तिला ७०० गुण मिळायला हवे होते. एनटीएने (NTA) आम्हाला आमची ओएमआर शीट लाईव्हमध्ये दाखवावी,” अशी आक्रमक मागणी तिने केली आहे.

Skyroot Aerospace: इस्रोच्या जोडीदाराची अंतराळात मोठी भरारी; त्यांनी उभारलेल्या ‘स्कायरूट एअरोस्पेस’ ची यशोगाथा एकदा वाचाच

सोहम गवतेच्या कुटुंबावरही दुःखाचा डोंगर; ५२२ वरून ९५ गुणांवर

बीडमध्ये केवळ ज्ञानेश्वरीच नाही, तर सोहम गवते या विद्यार्थ्यासोबतही असाच प्रकार घडला आहे. सोहमने उत्तरपत्रिका आणि आन्सर की तपासल्यानंतर त्याला किमान ५२२ गुण मिळतील अशी पक्की खात्री होती. मात्र, अंतिम निकालात सोहमच्या स्कोअरकार्डवर अवघे ९५ गुण दिसत आहेत. हा धक्का सहन न झाल्याने सोहम बराच वेळ कोणाशीच बोलला नाही. या दोन्ही प्रकरणांमुळे बीड जिल्ह्यातील पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Neet result beed students dnyaneshwari pawar soham gavate omr sheet controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 04:28 PM

Topics:  

  • controversy
  • NEET Exam
  • NEET UG Result

संबंधित बातम्या

NEET UG 2026: नीट निकालानंतर कोणत्या रँकवर कोणता कोर्स मिळणार? MBBS, BDS आणि BAMS मधील प्रवेशाची जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया..
1

NEET UG 2026: नीट निकालानंतर कोणत्या रँकवर कोणता कोर्स मिळणार? MBBS, BDS आणि BAMS मधील प्रवेशाची जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया..

NEET UG 2026 Cutoff: नीट पात्रता गुणांमध्ये ६९ अंकांची ऐतिहासिक वाढ! NTA ने सांगितले मोठे कारण
2

NEET UG 2026 Cutoff: नीट पात्रता गुणांमध्ये ६९ अंकांची ऐतिहासिक वाढ! NTA ने सांगितले मोठे कारण

बारामतीची श्रावणी कुदळे नीट परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम, देशात मुलींमध्ये देखील अव्वल
3

बारामतीची श्रावणी कुदळे नीट परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम, देशात मुलींमध्ये देखील अव्वल

Latur NEET Success : पेपरफुटीनंतर लातूरची दमदार एन्ट्री; NEETमध्ये ‘शाहू’चे 450, जिल्ह्यातील 1200 हून अधिक विद्यार्थ्यांना
4

Latur NEET Success : पेपरफुटीनंतर लातूरची दमदार एन्ट्री; NEETमध्ये ‘शाहू’चे 450, जिल्ह्यातील 1200 हून अधिक विद्यार्थ्यांना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.