Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur NEET Success : पेपरफुटीनंतर लातूरची दमदार एन्ट्री; NEETमध्ये ‘शाहू’चे 450, जिल्ह्यातील 1200 हून अधिक विद्यार्थ्यांना

Latur NEET Success: राजर्षी शाहू महाविद्यालयातील सुमारे 1,400 विद्यार्थ्यांनी यंदा NEET परीक्षा दिली होती. उपलब्ध निकालांच्या प्राथमिक पाहणीत अनेक विद्यार्थ्यांनी 600 पेक्षा अधिक गुण मिळवले असल्याचे स्पष्ट झाले

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 17, 2026 | 04:45 PM
NEET 2026 Result (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

NEET 2026 Result (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

Neet (UG) चा निकाल जाहीर… 

आर्यन गुप्ता देशात पहिला

राजर्षी शाहू महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना 530 पेक्षा जास्त गुण

 

वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी NEET परीक्षा हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. या वर्षीच्या निकालातही लातूरने आपली वेगळी ओळख कायम ठेवत उल्लेखनीय यश मिळवले आहे. देशभरात परीक्षेबाबत अनेक वाद आणि चर्चांना तोंड फुटले असले, तरी लातूरमधील विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या बळावर पुन्हा एकदा यशाचा झेंडा रोवला आहे.

लातूरमधील अनेक विद्यार्थ्यांना उत्कृष्ट गुण

यंदाच्या निकालात लातूरमधील (Latur NEET Success) अनेक विद्यार्थ्यांना उत्कृष्ट गुण मिळवत सरकारी आणि नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची मजबूत संधी निर्माण केली आहे. विशेष म्हणजे, राजर्षी शाहू महाविद्यालयातून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना एमबीबीएससाठी प्रवेश मिळवण्याची शक्यता व्यक्त केली जाते. याशिवाय शहरातील इतर महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय कामगिरी करुन लातूरच्या शैक्षणिक परंपरेला नवे बळ दिले आहे.

NEET 2026 Result : सर्व प्रवर्गांसाठी नवीन Cut-Off गुण जाहीर; UG Counselling अपडेट जाणून घ्या…

गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता..  

राजर्षी शाहू महाविद्यालयातील सुमारे 1,400 विद्यार्थ्यांनी यंदा NEET परीक्षा दिली होती. उपलब्ध निकालांच्या प्राथमिक पाहणीत अनेक विद्यार्थ्यांनी 600 पेक्षा अधिक गुण मिळवले असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजूनही काही निकालांचे विश्लेषण सुरू असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे . तसेच 530 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यावर्षी वैद्यकीय शिक्षणासाठी लातूरमधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पुढे जाणार असल्याचे चित्र दिसत आहे. फक्त एका महाविद्यालयापुरते हे यश मर्यादित नाही. दयानंद विज्ञान महाविद्यालय, बसवेश्वर महाविद्यालय, संत तुकाराम महाविद्यालय तसेच इतर शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट निकाल नोंदवला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या सातत्यपूर्ण अभ्यासामुळे उच्च गुण मिळवत पालक आणि शिक्षकांचा विश्वास सार्थ ठरवला आहे.

लातूरच्या विद्यार्थ्यांचा नेमका पॅटर्न काय? 

गेल्या काही महिन्यांत NEET परीक्षेबाबत अनेक वाद निर्माण झाले होते. त्यामुळे मेहनतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही काहीशी चिंता होती. अशा परिस्थितीत लातूरच्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही चर्चेकडे लक्ष न देता अभ्यासावर भर दिला आणि निकालातून आपली गुणवत्ता सिद्ध केली. यामुळे लातूरच्या शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. लातूरची ओळख केवळ निकालापुरती मर्यादित नाही. येथे विद्यार्थ्यांमध्ये नियमित अभ्यास, शिस्त, वेळेचे नियोजन आणि सातत्य यांना विशेष महत्त्व दिले जाते. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे दरवर्षी अनेक विद्यार्थी डॉक्टर होण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल करतात. हीच परंपरा यंदाही कायम राहिली आहे.

NEET Re-Exam Result 2026 : तामिळनाडूतील १२ विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी, ३९० हून अधिक गुण

या निकालामुळे राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये लातूरमधील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही अनेक विद्यार्थी प्रवेश घेतील. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात लातूरचे योगदान यंदाही ठळकपणे दिसून येणार आहे. एकूणच, यंदाचा NEET निकाल लातूरसाठी अभिमानाची बाब ठरला आहे. कोणत्याही वादापेक्षा विद्यार्थ्यांची मेहनत आणि गुणवत्ताच मोठी असते, हे या निकालाने पुन्हा सिद्ध केले. सातत्य, योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर लातूरच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवत राज्यासह देशाचे लक्ष पुन्हा एकदा वेधून घेतले आहे.

Web Title: Neet result latur pattern shahu college 450 students success mbbs seats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • Latur
  • NEET UG Result

संबंधित बातम्या

Latur News: पाणीटंचाईवर प्रशासन सतर्क! पाझर तलाव, बंधाऱ्यांच्या नियमित पाहणीसाठी विशेष पथकांची नियुक्ती
1

Latur News: पाणीटंचाईवर प्रशासन सतर्क! पाझर तलाव, बंधाऱ्यांच्या नियमित पाहणीसाठी विशेष पथकांची नियुक्ती

NEET UG Counselling राउंड १ चे सीट अलॉटमेंट जाहीर; किती जागांवर झाले प्रवेश आणि कट ऑफ किती राहिला?
2

NEET UG Counselling राउंड १ चे सीट अलॉटमेंट जाहीर; किती जागांवर झाले प्रवेश आणि कट ऑफ किती राहिला?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.