Neet Exam (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
NEET UG 2026 Result Out : वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) NEET UG 2026 परीक्षेची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध केली असून निकालही जाहीर करण्यात आला आहे. आता मात्र विद्यार्थ्यांना गुणांची खात्री करण्यासाठी किंवा पुढील प्रवेश प्रक्रियेला वेग येईल.निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ दूर झाला. यंदाच्या परीक्षेत जवळपास २० लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ११.२१ लाखांहून अधिक विद्यार्थी वैद्यकीय, दंतवैद्यकीय, आयुष आणि इतर आरोग्यविषयक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या अधिक आहे. एकूण पात्र विद्यार्थ्यांपैकी सुमारे ५८ टक्के विद्यार्थिनी आहेत. त्यामुळे यंदाही मुलींनी उत्कृष्ट कामगिरीची छाप सोडली आहे.
राज्यानुसार पाहिल्या क्रमांकावर उत्तरप्रदेश…
राज्यानुसार पाहिले तर उत्तर प्रदेश आघाडीवर राहिला आहे. या राज्यातील १.७० लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी पात्र ठरले. दुसरीकडे लक्षद्वीप येथे सर्वात कमी विद्यार्थी यशस्वी झाले. यंदाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी उच्च गुण मिळवले असून ७२० पैकी ७०५ किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे. यावर्षी आणखी एक विशेष बाब म्हणजे बहुतांश यशस्वी विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली. उपलब्ध माहितीनुसार, पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९३ टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रथमच NEET परीक्षा दिली होती. तसेच अव्वल स्थान मिळवणाऱ्या बहुतेक विद्यार्थ्यांचे वय १७ ते १९ वर्षे या गटातील आहे. मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे.
21 जून रोजी पुनर्परीक्षा
या वर्षीची परीक्षा अनेक कारणांनी चर्चेत राहिली. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांमुळे परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर २१ जून रोजी पुनर्परीक्षा आयोजित करण्यात आली. देशभरातील आणि परदेशातील अनेक शहरांमध्ये ही परीक्षा पार पडली. विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने हजारो परीक्षा केंद्रांवर काटेकोर व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षा १३ भाषांमध्ये घेण्यात आली, त्यामुळे विविध राज्यांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत पेपर सोडवण्याची संधी मिळाली. निकाल जाहीर करण्यापूर्वी संस्थेने तात्पुरती उत्तरतालिका प्रसिद्ध केली होती. विद्यार्थ्यांना त्यावर हरकती नोंदवण्याची संधी देण्यात आली. प्राप्त झालेल्या सर्व हरकतींची तपासणी केल्यानंतरच अंतिम उत्तरतालिका तयार करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रसिद्ध झालेल्या उत्तरतालिकेलाच अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.
NEET UG 2026 Re-Exam: नीट यूजी पुनर्परीक्षेची ओएमआर (OMR) शीट …
निकालानंतर लवकरच समुपदेशनाची प्रक्रिया सुरू
ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अंतिम उत्तरतालिकेची PDF डाउनलोड करावी. त्यानंतर आपल्या प्रश्नपत्रिकेच्या कोडनुसार योग्य उत्तरे तपासता येतील. भविष्यातील संदर्भासाठी ही प्रत जतन करून ठेवणेही महत्त्वाचे ठरेल. आता सर्वांचे लक्ष वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेकडे लागले आहे. निकालानंतर लवकरच समुपदेशनाची प्रक्रिया सुरू होणार असून सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागांसाठी प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवावीत, जेणेकरून प्रवेश प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण येणार नाही.
Re NEET UG 2026 Cutoff: सरकारी कॉलेजमध्ये MBBS सीटसाठी किती …
राष्ट्रीय परीक्षा संस्थेने विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचा सल्लाही दिला आहे. प्रवेश, समुपदेशन आणि पुढील सूचना याबाबतची माहिती केवळ अधिकृत पोर्टलवरच पाहावी. सोशलमीडियाावर व्हायरल होणाऱ्या अफवाकडे दुर्लक्ष करावे. योग्य माहितीच्या आधारेच पुढील निर्णय घेतल्यास अनावश्यक गोंधळ टाळता येईल. एकंदरीत, NEET UG 2026 चा निकाल आणि अंतिम उत्तरतालिका जाहीर झाल्यानंतर लाखो विद्यार्थ्यांचा प्रतीक्षेचा काळ संपला आहे. आता यशस्वी उमेदवारांसाठी वैद्यकीय शिक्षणाचा नवा प्रवास सुरू होणार असून त्यांच्या करिअरमधील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.






