Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET UG 2026: ‘टॉयलेटच्या फ्लश टँकमध्ये मोबाईल!’ नीट परीक्षेत विद्यार्थ्याची अजब शक्कल; पोलिसांनी रंगेहात पकडले

NEET UG 2026 Cheating Case: नीट फेरपरीक्षेदरम्यान हैदराबादमध्ये कॉपी करण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने टॉयलेटच्या फ्लश टँकमध्ये फोन लपवून कॉपी करण्याचा प्रयत्न केला.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 22, 2026 | 12:41 PM
POLICE

POLICE

Follow Us
Follow Us:

NEET UG 2026 Hyderabad Cheating Case: देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेली नीट परीक्षा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (मेडिकल कॉलेज) प्रवेश घेण्यासाठी आयोजित केली जाते. यावर्षी ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा २१ जून २०२६ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत पुन्हा आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान, तेलंगणातील हैदराबादमधून एका विद्यार्थ्याने नक्कल (कॉपी) करण्यासाठी लढवलेली एक अजब शक्कल समोर आली आहे. तेलंगणाच्या हैदराबादमध्ये नीट फेरपरीक्षेत बसलेल्या एका १८ वर्षीय उमेदवाराने कॉपी करण्याचा प्रयत्न केला, ज्याला पोलिसांनी रंगेहात पकडले. परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्राच्या वॉशरुममधील फ्लश टँकमध्ये आपला फोन लपवून ठेवल्याचा आणि तो काढून फोनमधून प्रश्नांची उत्तरे पाहून कॉपी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप या उमेदवारावर आहे.

कडक सुरक्षेनंतरही परीक्षा केंद्राच्या वॉशरुममध्ये फोन कसा पोहोचला?

पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अचमपेटच्या राहणाऱ्या या विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वीच फोन शाळेच्या आवारात (नीट परीक्षा केंद्रात) लपवून ठेवला होता. कॉपी करण्याच्या योजनेनुसार हा विद्यार्थी सकाळी ७ वाजताच केंद्रावर पोहोचला होता आणि त्याने वॉशरुमच्या व्हेंटिलेटरमध्ये (खिडकीत) मोबाईल फोन ठेवून दिला. विद्यार्थ्याला व्हेंटिलेटरपर्यंत पोहोचणे यासाठी शक्य झाले कारण ती खिडकी शाळेच्या बाहेरील भिंतीला लागून होती. यानंतर, सकाळी ११ वाजता हा विद्यार्थी पुन्हा वॉशरुममध्ये गेला आणि त्याने एका झिप-लॉक कव्हरमध्ये (प्लॅस्टिक पिशवीत) फोन ठेवून तो टॉयलेटच्या फ्लश टँकमध्ये लपवून ठेवला.

Indian Navy Recruitment 2026: भारतीय नौदलात बंपर भरती! १० वी आणि डिप्लोमा उत्तीर्ण असणाऱ्यांना सुवर्णसंधी!

शाळेच्या इमारतीपासून दूर असलेल्या वॉशरुममध्ये जाऊन केली कॉपी

पोलिसांनी सांगितले की, परीक्षेदरम्यान या विद्यार्थ्याने पोट दुखत असल्याचे कारण सांगून वॉशरुममध्ये जाण्याची परवानगी मागितली. हे वॉशरुम संपूर्ण केंद्रासाठी सामायिक (कॉमन) होते आणि शाळेच्या मुख्य इमारतीपासून बरेच दूर होते. तेथे पोहोचून विद्यार्थ्याने फोन काढला आणि उत्तरे पाहू लागला.

फोनमध्ये उत्तरे शोधताना रंगेहात पकडला

परीक्षा खंडात लक्ष ठेवणाऱ्या आणि व्यवस्था सांभाळणाऱ्या पर्यवेक्षकांनी (इनविजिलेटर) पाहिले की, एक विद्यार्थी बऱ्याच वेळापासून टॉयलेटमध्येच आहे. त्यामुळे संशय आल्याने जेव्हा काही कर्मचाऱ्यांना तेथे जाऊन पाहण्यास सांगितले, तेव्हा तो विद्यार्थी फोनमध्ये उत्तरे शोधताना रंगेहात पकडला गेला. पोलिसांनी सांगितले की, विद्यार्थ्यावर कॉपी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तो गुन्हा विद्यार्थ्याने कबूल केला आहे.

CBSE 12th Result 2026: सीबीएसई १२ वीचा निकाल जाहीर? बोर्डाने ‘एक्स’वर दिले संकेत; ‘या’ डायरेक्ट लिंकवर पाहता येणार स्कोअरकार्ड

Web Title: Neet ug 2026 hyderabad cheating case candidate hidden phone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • Froud
  • mobile
  • NEET Exam

संबंधित बातम्या

NEET UG Counselling: नीटच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी खूशखबर! अर्जातील चुका सुधारण्यासाठी ‘रजिस्ट्रेशन रिसेट’चा पर्याय सुरू..
1

NEET UG Counselling: नीटच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी खूशखबर! अर्जातील चुका सुधारण्यासाठी ‘रजिस्ट्रेशन रिसेट’चा पर्याय सुरू..

Delhi Mobile Cover Market: 50 पासून मिळतात ट्रेंडी मोबाईल कव्हर्स! दिल्लीतील ‘हे’ मार्केट आहे ग्राहकांचे फेव्हरेट
2

Delhi Mobile Cover Market: 50 पासून मिळतात ट्रेंडी मोबाईल कव्हर्स! दिल्लीतील ‘हे’ मार्केट आहे ग्राहकांचे फेव्हरेट

NEET UG 2026: नीट परीक्षा पद्धतीत मोठे बदल होणार? पेपर लीक रोखण्यासाठी केंद्र सरकार काय करणार? जाणून घ्या सविस्तर!
3

NEET UG 2026: नीट परीक्षा पद्धतीत मोठे बदल होणार? पेपर लीक रोखण्यासाठी केंद्र सरकार काय करणार? जाणून घ्या सविस्तर!

NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांवर गुन्हे मागे घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश; ‘गुन्हे मागे घेण्यास…’
4

NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांवर गुन्हे मागे घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश; ‘गुन्हे मागे घेण्यास…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.