फोटो सौजन्य- नवराष्ट्र टीम
CBSE 12th Result 2026 (Soon): विद्यर्थ्यांची नीट यूजीची परीक्षा नुकतीच झाली असून आता ते केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE)परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा लाखो विद्यार्थी करत आहेत. पुनर्मुल्यांकन आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांसमोर हाच प्रश्न समोर येत आहे की सीबीएसई बोर्ड निकाल केव्हा जाहीर करणार? परंतु आता बोर्डाच्या रिजल्ट बाबतीत सीबीएसईने त्याच्या एक्स (पूर्वीचे ट्वीटर) आकांउटवर निकाल लवकरच जाहीर करण्याचा संकेत दिला आहे.
सीबीएसईने या पोस्टमध्ये सांगितले आहे की, सीबीएसईने १२ वी वर्गाच्या उत्तरपत्रिकांची पडताळणी प्रक्रिया आणि पुनर्मुल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाली असून निकाल जाहीर केला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांचा निकाल पाहण्यासाठी त्यांचा सीट क्रमांक, प्रवेशपत्रकावरील आयडी आणि आईचे नाव सोबत तयार ठेवावे. विद्यार्थी त्यांचा निकालाचे अपडेट //results.digilocker.gov.in वर देखील पाहू शकतात.
CBSE has commenced the release of Class XII Verification of issues observed and Re-evaluation outcomes. Please keep your Roll Number, Admit Card ID, School Number, and Mother’s name ready before checking. Students can check their updated status at https://t.co/Uez4FymzeI pic.twitter.com/gGYDqhm0Rx — CBSE HQ (@cbseindia29) June 21, 2026
1) सर्वात आधी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईट results.cbse.nic.in वर जावे.
2) होमपेजवर ‘CBSE 12th Result 2026’ दिसेल त्या लिंकवर क्लिक करा.
3) सीट क्रमांक, शाळा क्रमांक आणि प्रवेशपत्र आयडी सोबत अन्य माहिती त्यामध्ये भरावी. नंतर सबमीट करावे.
4) स्कीनवर स्कोरकार्ड दिसेल येथून गुणपत्रक डाउनलोड करू शकता,
5) या नंतर विद्यार्थी त्याची प्रिंट देखील काढू शकतात.






