Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET UG 2026: ‘फसवणूक करणारा एकही जण वाचणार नाही!’ नीट फेरपरीक्षेतील गडबडीवर NTA महासंचालकांचा कडक इशारा; वाचा काय घडले

NEET UG 2026 Cheating Case: २१ जून रोजी झालेल्या नीट फेरपरीक्षेदरम्यान बिहारच्या लखीसरायमध्ये कॉपी आणि तोतयागिरीचे प्रकार समोर आले आहेत. एनटीए (NTA) महासंचालकांनी यावर कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 22, 2026 | 03:00 PM
NTA MAHASANCHALAK

NTA MAHASANCHALAK

Follow Us
Follow Us:

NEET UG 2026 Lakhisarai Cheating Case : काल झालेल्या नीट यूजी (NEET UG) फेरपरीक्षेदरम्यान बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातून कॉपी आणि दुसऱ्याच्या जागी परीक्षा देण्यासारखी काही प्रकरणे समोर आली आहेत. यावर राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे (NTA) महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितले की, काही उमेदवार परीक्षा केंद्रांवर मोबाईल फोन घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते, तर काही जण इतर उमेदवारांच्या जागी परीक्षा देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, संस्थेची सतर्कता आणि कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे हे प्रयत्न वेळेतच हाणून पाडण्यात आले.

अभिषेक सिंह यांनी सांगितले की, परीक्षेची निष्पक्षता टिकवून ठेवण्यासाठी एनटीएने (NTA) बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू केली होती. परीक्षा केंद्रांवर उमेदवारांची कसून झडती, ओळखपत्रांची तपासणी, बायोमेट्रिक प्रमाणीकरण आणि सीसीटीव्ही देखरेख अशी चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

कोणत्याही प्रकारची फसवणूक करणारा वाचणार नाही

एनटीए (NTA) महासंचालकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जो कोणी उमेदवार किंवा व्यक्ती कॉपी करणे, तोतयागिरी म्हणजेच दुसऱ्याच्या जागी परीक्षा देण्याचा प्रयत्न करणे किंवा परीक्षेसंबंधी इतर कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीत सामील असेल, त्याला पकडलेच जाईल. आमची सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचा मुख्य उद्देशच हा आहे की कोणालाही कोणत्याही प्रकारची गडबड करता येऊ नये. जर कोणी असा प्रयत्न केला, तर तो नक्कीच पकडला जाईल.

Strait of Hormuz: होर्मुज स्ट्रेटमध्ये तणाव असतानाच भारतासाठी गूड न्यूज! ३ महाकाय ऑइल टँकर्स सुखरूप रवाना; पाहा किती लागतं इंधन?

परीक्षेचा सविस्तर तपशील

नीट फेरपरीक्षेचे आयोजन २१ जून रोजी देशभरात उभारण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांवर करण्यात आले होते. या परीक्षेत २२.७९ लाखांहून अधिक उमेदवार बसले होते. या परीक्षेचे आयोजन देशभरातील ५५१ केंद्रांवर आणि परदेशातील १४ केंद्रांवर करण्यात आले होते. ही परीक्षा दुपारी २ वाजल्यापासून ते सायंकाळी ५:१५ वाजेपर्यंत पार पडली.

राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) १३ भाषांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेसह या परीक्षेचे आयोजन केले होते. परीक्षेची पारदर्शकता आणि निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी आधार-आधारित बायोमेट्रिक-फेस ऑथेंटिकेशन, सीसीटीव्ही देखरेख, सिग्नल जॅमर्स आणि दोन स्तरांवर शारीरिक तपासणी यांसारख्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. याशिवाय, एनटीए, शिक्षण मंत्रालय, राज्य मुख्यालय आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या कमांड अँड कंट्रोल सेंटर्सच्या माध्यमातून परीक्षेवर थेट लक्ष ठेवले जात होते.

NEET Success Story: घरात गळके छत, खाण्यापिण्याची भ्रांत; पण वडिलांच्या एका शब्दाने ‘शिव कुमार’बनला गावातील पहिला डॉक्टर

Web Title: Neet ug 2026 lakhisarai cheating case nta action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • NEET Exam
  • police security

संबंधित बातम्या

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार
1

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार

NTA Exam Calendar 2026-27: एनटीएकडून मोठ्या परीक्षांचे कॅलेंडर प्रसिद्ध; ‘या’ दिवशी होणार परीक्षा!
2

NTA Exam Calendar 2026-27: एनटीएकडून मोठ्या परीक्षांचे कॅलेंडर प्रसिद्ध; ‘या’ दिवशी होणार परीक्षा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.