
NEET 2026 Paper Leak
NEET UG 2026 Paper Leak: नीट यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. आता राष्ट्रीय परीक्षा संस्थेचा (एनटीए) रसायनशास्त्र विषयाचा आणखी एक तज्ञ केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) समोर आला आहे. पुण्यात अटक करण्यात आलेली मुख्याध्यापिका मनीषा हवालदार हिच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीमुळे राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या रसायनशास्त्रातील पॅनलमधील तज्ञ प्राध्यापिकेची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत.
रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांचे पेपर फुटल्याचे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे. भौतिकशास्त्राचा पेपर फोडणाऱ्या मनीषा हवालदारने एका विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्राच्या पेपरमधील प्रश्न दिल्याचे कबुल केले आहे. विषेश म्हणजे त्यांनी हे प्रश्न एनटीए पॅनेलशी संबंधित असलेल्या रसायनशास्त्र विषयाच्या एका तज्ञाच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवल्याचे मान्य केले आहे.
Govt Jobs After 12th: पदवीशिवाय सरकारी नोकरी कशी मिळवायची? ‘हे’ आहेत सर्वोत्तम मार्ग
सध्या नीट यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने एनटीएशी संबंधित इतर राज्यातील शैक्षणिक संस्थाचा आणि इतर तज्ञांचा तपास सुरू केला आहे. तसेच प्रश्नपत्रिका तयार करणे, भाषांतर, रिव्हर्स ट्रांन्सलेशन आणि मॉडरेशन आणि परिक्षेसंबंधित असणाऱ्या सर्व प्रक्रियेत समाविष्ट तज्ञांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. सीबीआयच्या पथकाने संबंधितांकडे अनेक तास चौकशी करून त्यांचा मोबाईल संपर्क, परीक्षा प्रक्रियेदरम्यानची भूमिका तसेच आरोपींशी असलेले संबंध याबाबत माहिती घेतली. प्राथमिक चौकशीनंतर काहींना सोडून देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
नीट परीक्षेचे धागेदोरे हे अनेक राज्यांमध्ये सापडत असून राजस्थानमध्ये नीट परीक्षेपूर्वी काही विद्यार्थ्यांकडे संशयास्पद प्रश्नसंच आढळल्याची माहिती आधीच समोर आली होती. त्यानंतर हा तपास सीबीआयने सुरू केला. हा तपास राजस्थानातून सुरु होऊन तो पुणे, लातूरपर्यंत पोहचला आहे. सीबीआय अधिकाऱ्यांना आतापर्यंत तपासात प्रश्नपत्रिका तयार करणे, भाषांतर, प्रिंटिंग, डिजिटल ट्रांन्सफर आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेतील विविध टप्प्यांत गळती झाल्याचा संशय आहे.