फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Rojgar Mela 2026: देशभरातील हजारो तरूणांसाठी शनिवारचा दिवस आनंदी भेट घेऊन आला. १९ व्या रोजगार मेळाव्यात (Rojgar Mela) ५१ हजारहून अनेक तरूणांना सरकारी नोकरीचे नियुक्तीपत्र (Appointment Letter) देण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तरूणांचे अभिनंदन करून त्यांना संबोधित केले.
पंत्रप्रधानांनी यावेळी तरुणांबद्दल विश्वास व्यक्त केला की, काही वर्षात हे तरुण ‘विकसित भारत’ (Viksit Bharat) चे स्वप्न साकार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. यामध्ये त्यांनी तरुणांच्या कष्टाचे कौतुक करत त्यांच्या पालकांचीही प्रशंसा केली.
ते पुढे म्हणाले की, जेव्हा एखादा तरुण यश मिळवतो. तेव्हा त्यात केवळ त्याचेच कष्ट नसतात, तर त्याच्या आई-वडीलांचे, कुटुंबियांचे आणि समाजाचे सहकार्य समाविष्ट असते. देशातील १४० कोटी नागरिकही कोणत्या ना कोणत्या स्वरुपात या यशाचे भागीदार असतात. तसेच त्यांनी निवड झालेल्या सर्व तरूणांचे कौतुक करत सांगितले की, केवळ एक नोकरी नसून देशसेवेची मोठी संधी आहे.
हा १९ वा रोजगार मेळावा ४७ देशातील ठिकाणी पार पडला असून यामध्ये विविध राज्यातील आणि शहरातील निवडलेल्या तरुणांना नियुक्तीपत्रे सुपुर्द करण्यात आली.
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी आपल्या पार पडलेल्या पाच देशाच्या दौऱ्याबद्द्ल आवर्जून उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, संयुक्त अरब अमिराती(UAE), नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांच्या यात्रेदरम्यान अनेक देशांच्या नेत्यांची आणि प्रमुखांची भेट घेतली. यावेळी तिथे त्यांना भारतातील तरूणांबद्दल प्रचंड उत्साह जाणवला असल्याचे सांगितले. पंतप्रधानांच्या मते, भारत वेगवेगळ्या देशांबद्दल जी भागीदारी करत आहे. त्याचा सर्वात मोठा उद्देश तरुणांना नवीन संधी, रोजगार, आत्मविश्वास आणि आंतरराष्ट्रीय अनुभव उपलब्ध करून देणे हा आहे.






