फोटो सौजन्य - सोशल मीडिया
Govt Jobs After 12th: एखाद्या विद्यार्थ्यांसाठी १८ व्या वर्षी सरकारी नोकरी मिळवण्यापेक्षा उत्तम गोष्ट कोणती असू शकते. भारतात अशा सरकारी नोकऱ्या आहेत, ज्यांना पदवीची गरज नसून केवळ १२ वी च्या शिक्षणावर नोकरी मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया या नोकऱ्यांबद्दल..
तसे पाहता पदवीचे शिक्षण घेत असतानाच अनेक नोकऱ्या मिळू शकतात. परंतु, त्यापैकी अशा काही सर्वोत्तम नोकऱ्या आहेत, ज्यांची माहिती प्रत्येक विद्यार्थ्यांला असायला हवी..
एनडीए (NDA-राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी): तरूण वर्गातील बहुतांश विद्यार्थ्यांचे स्वप्न देशसेवा करण्याचे असते. 12 वी नंतर एनडीएच्या माध्यमातून सैन्यात जाण्याचा मार्ग मोकळा होतो. यामध्ये परीक्षा उत्तीर्ण होऊन उमेद्वार थेट अधिकारी बनू शकतो.
एसएससी सीएचएसएल (SSC CHSL): यामध्ये ‘कर्मचारी निवड आयोगाची’ (SSC) सीएचएसएल ही अत्यंत लोकप्रिय परीक्षा असून यामार्फत सरकारच्या विविध विभागात भरती केली जाते.
रेल्वे भरती (Railway Jobs): रेल्वेमधील अशी अनेक पदे आहेत, जी १२ वी उत्तीर्ण झाल्यांनंतर लगेच मिळवता येतात. या नोकऱ्यामध्ये चांगले वेतन आणि उत्तम सुविधाही मिळतात.
बँकिंग क्षेत्र (Banking job): विद्यार्थ्यांना १२ वीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बँकेतल्या अनेक पदांसाठी अर्ज करता येतो. बँकेच्या अनेक पदांसाठी शैक्षणिक पात्रता १२ वी पास असणे आवश्यक असते.
अग्निवीर योजना(Agniveer Program): सैन्याची अग्निवीर योजना देखील तरूणांसाठी योग्य वयात रोजगार मिळवण्याचे मोठे माध्यम आहे. ज्या विद्यार्थ्यांना देशसेवेची आवड आहे, ते या क्षेत्रात आपले नशीब आजमावून पाहू शकतात.
जर कमी वयात म्हणजेच १८ ते २० व्या वर्षीच विद्यार्थी नोकरी मिळवू शकला, तर तो आयुष्यात खूप काही करू शकतो. जेव्हा कमाईचा मार्ग उपलब्ध होतो, तेव्हा तो कोणत्याही दबावाशिवाय स्वत:च्या आवडीनिवडी जपू शकतो, ज्यामुळे त्याचे जीवन सुकर होते.






