Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 30 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET UG 2026: २१ जूनला होणार री-नीट परीक्षा; केंद्रावर जाताना ‘ही’ कागदपत्रे सोबत ठेवणे आहे बंधनकारक!

NEET UG 2026 :२१ जून २०२६ रोजी होणाऱ्या 'री-नीट' परीक्षेसाठी नॅशनल टेस्टींग एजन्सी (NTA) कधीपर्यंत ॲडमिट कार्ड जारी करणार आहे? परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणती ओळखपत्रे सोबत बाळगणे अनिवार्य करण्यात आले आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 14, 2026 | 11:52 AM
neet

neet

Follow Us
Follow Us:

NEET UG 2026 updates: देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट यूजी २०२६’ च्या री-एग्जामला (पुनर्परीक्षा) बसणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नॅशनल टेस्टींग एजन्सी (NTA) पुढील आठवड्यात री-नीट २०२६ चे ॲडमिट कार्ड (Admit Card) जाहीर करू शकते. हॉल तिकीट जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना ते neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन डाऊनलोड करता येईल.

एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, नीट यूजी २०२६ ची पुनर्परीक्षा २१ जून २०२६ रोजी आयोजित केली जाईल. ही परीक्षा दुपारून २:०० वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ५:१५ वाजेपर्यंत चालेल. परीक्षा पेन-अँड-पेपर (Pen-and-Paper) म्हणजेच ऑफलाईन मोडमध्ये घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व परीक्षा केंद्रांवर विशेष व्यवस्था करण्यात येत आहे.

किती विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा?

यावर्षी नीट यूजी २०२६ साठी जवळपास २२.७५ लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी २२.०५ लाखांहून अधिक विद्यार्थी ३ मे रोजी झालेल्या मुख्य परीक्षेला बसले होते. देशभरातील मेडिकल, डेंटल आणि इतर पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘नीट’ ही सर्वात मोठी परीक्षा मानली जाते. त्यामुळे या परीक्षेशी संबंधित प्रत्येक अपडेट लाखो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असते.

Portal Security Flaw: दुबईतील १२ वीच्या विद्यार्थ्याने उघड केली ‘NTA’ची गंभीर चूक; विद्यार्थ्यांचा डेटा होता धोक्यात!

ॲडमिट कार्ड कसे डाऊनलोड करावे?

1. ॲडमिट कार्ड जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी सर्वप्रथम neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

2. त्यानंतर होमपेजवर दिलेल्या “NEET UG 2026 Admit Card” यावर क्लिक करावे.

3. पुढे आपला ॲप्लिकेशन नंबर (Application Number), जन्मतारीख किंवा पासवर्ड आणि सिक्युरिटी कॅप्चा भरणे आवश्यक आहे.

4. माहिती सबमिट करताच ॲडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल. उमेदवार ते डाऊनलोड करून त्याची प्रिंटआऊट काढून घेऊ शकतात.

परीक्षा केंद्रावर काय घेऊन जाणे बंधनकारक आहे?

परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळवण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवणे अनिवार्य असेल. उमेदवारांनी ॲडमिट कार्डची प्रिंटेड कॉपी, वैध फोटो ओळखपत्र (जसे की पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट किंवा इतर सरकारी फोटो ओळखपत्र) आणि ॲडमिट कार्डवर लावलेल्या फोटोसारखाच एक पासपोर्ट साईझ फोटो सोबत ठेवावा. यांपैकी कोणतेही कागदपत्र नसल्यास केंद्रावर प्रवेश मिळण्यात अडचण येऊ शकते.

IIM Calcutta: आता नोकरी जाण्याच्या भीतीशिवाय सुरू करता येणार बिझनेस! IIM कलकत्ताच्या ‘या’ खास धोरणाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Web Title: Neet ug 2026 re exam admit card date how to download nta updates marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • Admit Card
  • NEET
  • NEET Exam

संबंधित बातम्या

NEET Paper Leak Case: NEET पेपरफुटी प्रकरणी सीबीआयचे विशेष न्यायालयात १३ आरोपींवर आरोपपत्र दाखल!
1

NEET Paper Leak Case: NEET पेपरफुटी प्रकरणी सीबीआयचे विशेष न्यायालयात १३ आरोपींवर आरोपपत्र दाखल!

Ram Gopal Varma : ‘परीक्षेत AI टूल्सना परवानगी..’, अँटी-पेपर लीक विधेयकावर राम गोपाल वर्मांचा सरकारला मोठा सल्ला
2

Ram Gopal Varma : ‘परीक्षेत AI टूल्सना परवानगी..’, अँटी-पेपर लीक विधेयकावर राम गोपाल वर्मांचा सरकारला मोठा सल्ला

NEET Re-Exam Paper Leak: नीट फेरपरीक्षेचा पेपरही ३ दिवस आधीच फुटला; रोहित पवारांचा ‘गुजरात कनेक्शन’चा दावा
3

NEET Re-Exam Paper Leak: नीट फेरपरीक्षेचा पेपरही ३ दिवस आधीच फुटला; रोहित पवारांचा ‘गुजरात कनेक्शन’चा दावा

NEET Result Controversy: NTA पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली! बिंदुश्री पवारचे NEET पुनर्रपरीक्षेच्या निकालावर गंभीर आरोप!
4

NEET Result Controversy: NTA पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली! बिंदुश्री पवारचे NEET पुनर्रपरीक्षेच्या निकालावर गंभीर आरोप!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.