फोटो सौजन्य- सोशल मीडिया
NTA Portal Security Flaw: देशामध्ये सध्या सीबीएसई (CBSE) आणि नीट (NEET) परीक्षा हा मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे. यापूर्वी सार्थक आणि निसर्ग यांनी एथिकल हॅकिंगच्या (Ethical Hacking) माध्यमातून सीबीएसईला आरसा दाखवला होता; तर आता दुबईत राहणाऱ्या एका सीबीएसईच्या विद्यार्थ्याने एनटीएची (NTA) बाबत खुलासा केला आहे. १६ वर्षांच्या रायलन अनिल याने नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) पोर्टलवरील एक गंभीर तांत्रिक सुरक्षा चूक (Security Flaw) उघडकीस आणली आहे. फक्त ५ दिवसांमध्ये त्याने नीट परीक्षेसह जेईई ॲडव्हान्स्डच्या (JEE Advanced) परीक्षा पोर्टल मधील त्रुटी शोधून काढल्या आणि त्याबाबत एनटीएला रिपोर्ट केला.
१६ वर्षांचा रायलन अनिल हा मूळचा दुबईचा रहिवासी आहे. सध्या तो सीबीएसई बोर्डाच्या एका शाळेतून इयत्ता १२ वीचे शिक्षण घेत आहे. रायलनला एथिकल हॅकिंगमध्ये प्रचंड रस आहे. इयत्ता ८ वीपासूनच त्याला कॉम्प्युटर कोडिंग आणि ‘लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम’मध्ये (Linux Operating System) विशेष आवड होती. विशेष म्हणजे, रायलनने हे कौशल्य कोणत्याही संस्थेतून शिकलेले नाही, तर ऑनलाईन सिक्युरिटी गेम्स आणि ‘बग बाउंटी’ (Bug Bounty) प्रोग्राम्समध्ये भाग घेऊन त्याने स्वतः हे स्किल्स आत्मसात केले आहेत. भविष्यात त्याला ‘चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर’ (CISO) म्हणून काम करायचे आहे.
रायलन अनिलने दिलेल्या माहितीनुसार, त्याने ३१ मेच्या रात्री एनटीएच्या ‘री-नीट एक्झाम पोर्टल’च्या (Re-NEET Exam Portal) तांत्रिक सुरक्षेची तपासणी केली. नीट एक्झाम पोर्टलची सुरक्षा तपासण्यासाठी त्याला साधारण तीन तासांचा वेळ लागला. या तपासणी दरम्यान त्याला पोर्टलच्या ‘बॅकएंड आर्किटेक्चर’ मधील (Backend Architecture) एक मोठी त्रुटी आढळून आली. रायलनच्या मते, या तांत्रिक बिघाडामुळे पोर्टलचे मुख्य पेज सहज ‘बायपास’ (Bypass) करता येत होते, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक डेटापर्यंत (Personal Data) सहज पोहोचणे शक्य होते. यानंतर त्याने तात्काळ भारताची सायबर एजन्सी ‘CERT-In’ कडे या संदर्भात रिपोर्ट दाखल केला आणि १० मिनिटांनंतर ‘एक्स’ (X) अकाउंटवर याबद्दल पोस्ट शेअर केली.
NEET UG 2026: नीट परीक्षार्थींना मोठा दिलासा! पाहा NTA चे ‘हे’ ३ मोठे बदल एका क्लिकवर..
एनटीएकडून आभार व्यक्त: नीट आणि जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेच्या पोर्टलवरील या गंभीर त्रुटीची माहिती मिळताच, एनटीएच्या अधिकाऱ्यांनी रायलनला एका अधिकृत ईमेलद्वारे धन्यवाद दिले. यानंतर अधिकाऱ्यांनी रायलनशी संपर्क साधला, तेव्हा त्याने हे पोर्टल तात्काळ बंद करण्याचा सल्ला दिला. सायबर सुरक्षेला प्राधान्य देत एनटीएने ते पोर्टल तातडीने बंद केले. एनटीएने घेतलेल्या या जलद निर्णयामुळे रायलन अत्यंत आनंदी आहे. आपल्या सरकारी यंत्रणेत अशा अनेक तांत्रिक त्रुटी आहेत आणि त्या वेळेतच दुरुस्त केल्या पाहिजेत, असे मत रायलनने व्यक्त केले आहे.






