Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET UG 2026 Re-Exam: नीट यूजी पुनर्परीक्षेची ओएमआर (OMR) शीट जाहीर! ‘या’ तारखेला लागणार अंतिम निकाल!

NEET UG 2026 Re-Exam: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) नीट यूजी २०२६ री-एग्जामची OMR शीट प्रसिद्ध केली आहे. आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया, फी आणि निकालाच्या संभाव्य तारखेबद्दल सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 14, 2026 | 10:22 AM
neet result

neet result

Follow Us
Follow Us:

NTA NEET UG 2026 re-exam OMR sheet challenge : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) नीट यूजी २०२६ री-एग्जामची ओएमआर शीट (OMR Sheet) आणि रेकॉर्ड केलेले रिस्पॉन्स अधिकृतपणे प्रसिद्ध केले आहेत. एनटीएने आपल्या अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) अकाऊंटद्वारे या संदर्भात माहिती दिली आहे. २१ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या नीट परीक्षेत बसलेल्या उमेदवारांसाठी एनटीएने त्यांच्या ओएमआर उत्तरांना आव्हान देण्याची सुविधा सुरू केली आहे.

३ मे रोजी झालेल्या नीट पेपर लीक प्रकरणानंतर, २१ जून २०२६ रोजी दुपारी २ ते संध्याकाळी ५.१५ या वेळेत पुन्हा एकदा नीट परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेचे ओएमआर रिस्पॉन्स पाहण्यासाठी उमेदवार एनटीएच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

ओएमआर शीट आणि रेकॉर्ड केलेले रिस्पॉन्स कुठे पाहावे?

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) स्कॅन केलेल्या ओएमआर उत्तरपत्रिकेची पीडीएफ आणि रेकॉर्ड केलेली उत्तरे प्रसिद्ध केली आहेत. नीटची अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर जाऊन उमेदवार हे चेक करू शकतात. यासाठी उमेदवारांना आपले लॉगिन डिटेल्स भरावी लागेल.

ओएमआर शीट आणि रेकॉर्ड केलेले रिस्पॉन्स कसे डाउनलोड करावे?

1. सर्वप्रथम neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

2. त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर (Application Number) आणि पासवर्ड टाका.

3. ओटीपी (OTP) व्हेरिफिकेशन पूर्ण केल्यानंतर ‘View/Challenge OMR Sheet & Recorded Responses’ या पर्यायावर क्लिक करा.

4. येथे तुम्ही निवडलेल्या उत्तरांची तुलना स्कॅनरने वाचलेल्या उत्तरांशी करू शकता.

JNV Admission 2026: आपल्या मुलाला नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवून द्यायचाय? जाणून घ्या पात्रता, परीक्षा आणि आवश्यक कागदपत्रे

१५ जुलैपर्यंत आक्षेप नोंदवता येणार

ओएमआर शीट आणि रेकॉर्डेड रिस्पॉन्स शीट तपासताना जर तुमच्या उत्तरांचा ताळमेळ अचूक बसत नसेल किंवा काही तफावत आढळल्यास, तुम्ही त्यावर आक्षेप नोंदवू शकता. आक्षेप नोंदवण्यासाठी १५ जुलै २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांना योग्य तो प्रश्न निवडून आपल्या दाव्याच्या पर्यायावर टिक करावे लागेल. प्रत्येक आव्हानासाठी २०० रुपये शुल्क भरावे लागेल, ज्यासाठी नेट बँकिंग / कार्ड / यूपीआय (UPI) सुविधा उपलब्ध आहेत. आक्षेप नोंदवल्यानंतर सबमिट बटण दाबा आणि त्याची पावती डाउनलोड करा. जर तुमचे आव्हान योग्य ठरले, तर तुमचे २०० रुपये परत केले जातील.

Study Tips to Focus: अभ्यास करताना मन विचलित होतेय? मग ‘या’ ५ सोप्या पद्धतींचा नक्की वापर करा..

नीट यूजी परीक्षेचा निकाल कधी लागणार?

एनटीएने आधीच अधिकृतपणे माहिती दिली आहे की, २० जुलै २०२६ पर्यंत नीट यूजी २०२६ री-एग्जामचा निकाल जाहीर केला जाईल. १५ जुलैपर्यंत उमेदवारांकडून ओएमआर शीटबाबत आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, त्यानंतर १९ जुलै किंवा २० जुलै रोजी नीट परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर होऊ शकतो.

Web Title: Neet ug 2026 re exam omr sheet recorded responses nta result date objection process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 10:22 AM

Topics:  

  • NEET
  • NEET UG Result

संबंधित बातम्या

Re NEET UG 2026 Cutoff: सरकारी कॉलेजमध्ये MBBS सीटसाठी किती मार्क्स हवेत? पाहा प्रवर्गनिहाय संभाव्य ‘सेफ स्कोर’
1

Re NEET UG 2026 Cutoff: सरकारी कॉलेजमध्ये MBBS सीटसाठी किती मार्क्स हवेत? पाहा प्रवर्गनिहाय संभाव्य ‘सेफ स्कोर’

NEET Pre Ayurveda 2026: संस्कृतच्या विद्यार्थ्यांना १० वी नंतर थेट आयुर्वेद डॉक्टर बनता येणार; जाणून घ्या सविस्तर
2

NEET Pre Ayurveda 2026: संस्कृतच्या विद्यार्थ्यांना १० वी नंतर थेट आयुर्वेद डॉक्टर बनता येणार; जाणून घ्या सविस्तर

NEET UG Exam Big Update: नीट परीक्षेत केंद्र सरकारचा मोठा बदल! पेपर लीक रोखण्यासाठी सरकारचा नवा मेगा प्लॅन वाचा एका क्लिकवर..
3

NEET UG Exam Big Update: नीट परीक्षेत केंद्र सरकारचा मोठा बदल! पेपर लीक रोखण्यासाठी सरकारचा नवा मेगा प्लॅन वाचा एका क्लिकवर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.