Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET UG PreparationTips: नीटमध्ये टॉपर बनण्यासाठी कोणत्या विषयावर जास्त भर द्यावा? जाणून घ्या एका क्लिकवर..

NEET UG Preparation Strategy: नीट परीक्षेत बायोलॉजी, केमिस्ट्री की फिजिक्स? कोणत्या विषयात जास्त मेहनत केल्याने अव्वल रँक मिळते? वाचा टाय-ब्रेकिंग नियम आणि तज्ज्ञांचा सल्ला...

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 30, 2026 | 04:41 PM
neet ..

neet ..

Follow Us
Follow Us:

NEET UG Preparation Strategy:  १६ जुलै रोजी नीटचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता देशातील लाखो विद्यार्थी समुपदेशनाची वाट पाहत आहेत. समुपदेशन सुरू होताच नीट पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एमबीबीएसच्या अभ्यासासाठी त्यांच्या आवडीचे कॉलेज निवडण्याची संधी मिळणार आहे. दरवर्षी नीट परीक्षेच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी एमबीबीएस, बीडीएस आणि इतर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी परीक्षेला बसतात. नीट परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी अभ्यासात दिवस-रात्र एक करतात.

नीटमधील यश हे कोणत्याही एका विषयावर अवलंबून नसून फिजिक्स (भौतिकशास्त्र), केमिस्ट्री (रसायनशास्त्र) आणि बायोलॉजी (जीवशास्त्र) या तिन्ही विषयांत मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे रँक ठरवली जाते. तरीही या तिन्ही विषयांमध्ये वेगवेगळ्या मेहनतीची गरज असते. आज आपण जाणून घेणार आहोत की फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजी यांपैकी कोणत्या विषयात जास्त मेहनत केल्याने नीटमध्ये चांगली रँक मिळते.

बायोलॉजीचा सर्वात जास्त वेटेज

नीट परीक्षा एकूण ७२० गुणांची असते. यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे प्रत्येकी ४५-४५ प्रश्न विचारले जातात, ज्यांना एकूण १८०-१८० गुण असतात. तर बॉटनी (वनस्पतीशास्त्र) आणि ज्युओलॉजी (प्राणीशास्त्र) मिळून बायोलॉजीमध्ये ९० प्रश्न विचारले जातात, ज्यासाठी ३६० गुण निर्धारित आहेत. म्हणजेच संपूर्ण पेपरचा अर्धा भाग केवळ बायोलॉजीचा असतो. याच कारणामुळे या विषयात मिळणारा चांगला स्कोर उमेदवारांच्या रँकवर मोठा प्रभाव पाडतो.

फक्त एकच विषय रँक ठरवतो का?

तज्ज्ञांच्या मते, नीटमधील रँक एकाच विषयावर ठरत नाही. अंतिम रँक ही तिन्ही विषयांत मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे तयार केली जाते. मात्र, दोन उमेदवारांचे एकूण गुण समान असतील, तर टाय-ब्रेकिंग नियमांनुसार सर्वात आधी बायोलॉजीचे गुण पाहिले जातात. त्यानंतर केमिस्ट्री आणि मग फिजिक्सच्या गुणांना प्राधान्य दिले जाते. यानंतरही समसमान गुण राहिल्यास, कमी चुकीची उत्तरे दिलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाते.

Commercial Pilots in India: भारतात दर चौथा कमर्शियल पायलट महिला! पायलट बनण्यासाठी नेमकी काय पात्रता लागते? जाणून घ्या

फिजिक्स ठरू शकतो गेम चेंज

बायोलॉजीचा वेटेज सर्वात जास्त असला, तरी फिजिक्स हा परीक्षेतील सर्वात कठीण भाग मानला जातो. या विषयातील संकल्पना, गणिते आणि वेळेचे नियोजन यांची उत्तम समज असणे आवश्यक आहे. अनेक विद्यार्थ्यांसाठी हाच भाग सर्वात आव्हानात्मक ठरतो. अशा परिस्थितीत, जे विद्यार्थी फिजिक्समध्ये चांगली कामगिरी करतात, त्यांना रँकिंगमध्ये मोठा फायदा मिळू शकतो.

अनेक माजी नीट टॉपर्सचेही असे म्हणणे आहे की, त्यांच्या यशात फिजिक्सने सर्वात मोठी भूमिका बजावली. त्यांच्या मते, येत्या वर्षांत जर प्रश्नपत्रिकेची पातळी कठीण राहिली, तर फिजिक्सवरील मजबूत पकड विद्यार्थ्यांना उत्तम रँक आणि आवडीचे मेडिकल कॉलेज मिळवून देण्यात मदत करू शकते.

NEET OMR Sheet Glitch: ६५० वरून विद्यार्थ्याचे गुण थेट १३५ वर आले! नीट निकालातील अजब घोळावरून सुरू झाला नवा वाद

केमिस्ट्री देखील चांगल्या स्कोरचा पाया

केमिस्ट्री हा नीट परीक्षेतील संतुलित आणि तुलनेने गुण मिळवून देणारा विषय मानला जातो. यामध्ये फिजिकल, ऑरगॅनिक आणि इनऑरगॅनिक केमिस्ट्रीमधून प्रश्न विचारले जातात. नियमित सराव आणि संकल्पनांची स्पष्टता असणारे विद्यार्थी या विषयात सातत्याने चांगली कामगिरी करू शकतात. अनेक तज्ज्ञांचे मते, केमिस्ट्री हा एकूण स्कोर स्थिर ठेवण्यात मोठी भूमिका बजावतो.

Web Title: Neet ug preparation tips which subject needs more focus physics chemistry biology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • NEET Exam
  • study

संबंधित बातम्या

Singapore Reading Campaign: रील्सचा नाद सोडा, वाचनाची सवय लावा! १५ मिनिटांच्या वाचनासाठी मिळणार व्हर्च्युअल कॉइन्स, जाणून घ्या
1

Singapore Reading Campaign: रील्सचा नाद सोडा, वाचनाची सवय लावा! १५ मिनिटांच्या वाचनासाठी मिळणार व्हर्च्युअल कॉइन्स, जाणून घ्या

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार
2

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार

NTA Exam Calendar 2026-27: एनटीएकडून मोठ्या परीक्षांचे कॅलेंडर प्रसिद्ध; ‘या’ दिवशी होणार परीक्षा!
3

NTA Exam Calendar 2026-27: एनटीएकडून मोठ्या परीक्षांचे कॅलेंडर प्रसिद्ध; ‘या’ दिवशी होणार परीक्षा!

UPSC Preparation Strategy: १६ तास वाचनाची गरज नाही! फक्त ६ तासांच्या अभ्यासाने व्हा आयएएस; वाचा टॉपर्सचा सक्सेस फॉर्म्युला
4

UPSC Preparation Strategy: १६ तास वाचनाची गरज नाही! फक्त ६ तासांच्या अभ्यासाने व्हा आयएएस; वाचा टॉपर्सचा सक्सेस फॉर्म्युला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.