
Clutch plate care tips for car drivers, Clutch plate care tips, car care tips,
Car Warranty Rules: नवीन कार खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, काही वेळा गाडीची डिलीव्हरी घेताच अनेक जण कार अधिक स्टायलिश आणि प्रिमियम दिसावी, यासाठी बाजारातून वेगवेगळी ॲक्सेसरीज आणि मॉडिफिकेशन करून घेतात. परंतु, बऱ्याचदा हीच घाई मोठ्या नुकसानीचे कारण ठरू शकते. तसेच विशिष्ट बदलांमुळे कंपनी कारची वॉरंटी त्वरित रद्द करू शकते. ही अत्यंत महत्त्वाची बाब अनेक कार मालकांना माहित नसते.
वॉरंटी रद्द झाल्यास, भविष्यात इंजिन इलेक्ट्रॉनिक्स किंवा इतर मोठ्या भागात बिघाड झाल्यास कंपनी दुरुस्त करून देण्यास स्पष्ट नकार देते. काही जण किरकोळ बिघाड समजून स्थानिक गॅरेजमध्ये कारची छेडछाड करतात, ज्यामुळे त्यांना अर्थिक फटकाही सहन करावा लागतो. म्हणूनच कार खरेदी केल्यानंतर कोणते बदल सुरक्षित आहेत आणि कोणत्या बदलामुळे कारची वॉरंटी धोक्यात येऊ शकते हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.