Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

२३ वर्षांनी पुन्हा घंटा वाजली! न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’; जुन्या आठवणींना उजाळा

तब्बल २३ वर्षांनी विद्यार्थी आणि त्यांचे सर्व शिक्षक पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी शाळेमध्ये एक वर्ग भरवून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी प्रत्येकाच्या मनात भावनांचा पूर उसळला होता.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 27, 2025 | 04:50 PM
न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’; जुन्या आठवणींना उजाळा (Photo Credit - X)

न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’; जुन्या आठवणींना उजाळा (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • माजी विद्यार्थी आणि शिक्षकांचा वर्ग पुन्हा भरला
  • भावनांचा पूर उसळला
  • शिस्तीमुळे जीवनात यशस्वी झाल्याची विद्यार्थ्यांची कृतज्ञता व्यक्त.
शिरसगाव (वा.): खासदार गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शिरसगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ (वाणिज्य) महाविद्यालयाच्या सन २००२ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा व शिक्षकांचा कृतज्ञता सोहळा शनिवारी (२५ ऑक्टोबर) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तब्बल २३ वर्षांनी विद्यार्थी आणि त्यांचे सर्व शिक्षक पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी शाळेमध्ये एक वर्ग भरवून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी प्रत्येकाच्या मनात भावनांचा पूर उसळला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून ऋषिकेश औताडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ‘गेट टुगेदर’ची कल्पना प्रत्यक्षात आणली.

शिक्षकांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांची कृतज्ञता

या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिक्षकांप्रति आदर व्यक्त केला. त्यांनी शिक्षकांना रोपटे आणि भेटवस्तू देऊन सन्मानित केले. माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना मैत्री, खोडकरपणा आणि जुन्या आठवणी ताज्या केल्या. काही विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते. या विद्यालयाच्या शिस्तीमुळे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच आज आम्ही उद्योग-व्यवसाय, नोकरीद्वारे प्रगती करून आनंदी जीवन जगत आहोत, अशी कृतज्ञतेची भावना अनेकांनी व्यक्त केली. यावेळी रेणुका गवारे, वैशाली लाके, अनुराधा गवारे, दीपाली यादव, योगेश यादव, दीपक विखे, रमेश बकाल, रितेश सोळस, विशाल सोनार आदींनी मनोगत व्यक्त केले.

ISRO Bharti 2025: १०वी पास आणि डिप्लोमाधारकांसाठी इसरो मध्ये मोठी संधी! टेक्निशियन आणि फार्मासिस्टसह ४४ पदांवर भरती; असा करा अर्ज

शिक्षकांनी व्यक्त केली भावनिक प्रतिक्रिया

विद्यार्थ्यांनी आजही शाळा आणि शिक्षकांबद्दल जपलेला आदर पाहून शिक्षकही भावूक झाले. शिक्षक व विद्यार्थी हे नाते आयुष्यभर टिकणारे असून, भविष्यातही असे उपक्रम घेत राहावे, अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली. लवकरच या शाळेतील सर्व बॅचच्या विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

शाळेच्या विकासासाठी हातभार लावा

कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्राचार्य सुभाष काळे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. ते म्हणाले, “प्रत्येक विद्यार्थी हा आमचा अभिमान आहे. शाळा म्हणजे आईच असते. त्यामुळे आपण वर्षातून एकदा तरी तिला भेट द्यावी आणि शाळेच्या विकासासाठी हातभार लावावा.” प्रारंभी संस्थापक खासदार गोविंदराव आदिक यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन ऋषिकेश औताडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रकाश पारखे यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी रमेश बकाल, बापू जाधव, सागर वाघ, गणेश वाघ, गजानन गवारे, रितेश सोळस, विशाल सोनार आदींनी परिश्रम घेतले. सामूहिक फोटोसेशननंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

IB Bharti 2025: इंटेलिजेंस ब्युरो मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! तांत्रिक पदांसाठी २५८ जागा; लगेच करा अर्ज

Web Title: New english school alumni hold emotional get together old memories rekindled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 04:50 PM

Topics:  

  • Career
  • Career News

संबंधित बातम्या

Career News: शिक्षक TAIT परीक्षेच्या ‘एनसीएल’ प्रमाणपत्राबाबत महत्वाचा निर्णय; 14 मे पर्यंत…
1

Career News: शिक्षक TAIT परीक्षेच्या ‘एनसीएल’ प्रमाणपत्राबाबत महत्वाचा निर्णय; 14 मे पर्यंत…

१६ वर्षांनी पुन्हा शाळा भरली! माजी विद्यार्थी एकत्र, जुन्या आठवणींना दिला उजाळा
2

१६ वर्षांनी पुन्हा शाळा भरली! माजी विद्यार्थी एकत्र, जुन्या आठवणींना दिला उजाळा

इंग्रजी नवोपक्रम अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, बालभारती मंडळाच्या सदस्य असलेल्या शिक्षकाच्या व्हिडिओला प्रतिसाद
3

इंग्रजी नवोपक्रम अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, बालभारती मंडळाच्या सदस्य असलेल्या शिक्षकाच्या व्हिडिओला प्रतिसाद

झिरो लिक्वीड डिस्चार्ज टेक्नॉलॉजीमध्ये पीजी सर्टिफिकेट कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
4

झिरो लिक्वीड डिस्चार्ज टेक्नॉलॉजीमध्ये पीजी सर्टिफिकेट कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.