फोटो सौजन्य - Social Media
NIACL Administrative Officer भरती 2025 ही सरकारी क्षेत्रातील एक महत्त्वाची भरती प्रक्रिया असून, न्यू इंडिया अॅश्योरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) मार्फत एकूण 550 Administrative Officer (AO) पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. ही पदे Generalist आणि Specialist अशा दोन्ही प्रकारांत असून, यामध्ये रिस्क मॅनेजर, ऑटोमोबाईल इंजिनिअर, लीगल स्पेशलिस्ट, अकाउंट स्पेशलिस्ट, हेल्थ AO, IT स्पेशलिस्ट, बिझनेस अॅनालिस्ट, कंपनी सेक्रेटरी, अॅक्च्युरियल स्पेशलिस्ट आणि जनरलिस्ट अशा विविध पदांचा समावेश आहे.
जनरलिस्ट पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे, तर इतर स्पेशलिस्ट पदांसाठी संबंधित क्षेत्रातील शिक्षण आवश्यक आहे, जसे BE/BTech, CA, MBBS, LLB इत्यादी. उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षांदरम्यान असावे आणि आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सवलत लागू आहे. या पदासाठी बेसिक पगार ₹50,925 असून, सर्व भत्ते धरून मेट्रो शहरांमध्ये एकूण वेतन सुमारे ₹90,000/- पर्यंत मिळू शकते.
चयन प्रक्रिया ही दोन टप्प्यांमध्ये होणार असून, यामध्ये प्रथम टप्पा म्हणजेच Phase I परीक्षा दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. ही एक प्राथमिक (Preliminary) परीक्षा असेल, ज्यामध्ये उमेदवारांची पात्रता तपासली जाईल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यातील म्हणजेच Phase II परीक्षा देण्यास परवानगी दिली जाईल. ही मुख्य (Main) परीक्षा 29 ऑक्टोबर 2025 रोजी होण्याची शक्यता आहे. दोन्ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. या परीक्षांमध्ये उमेदवारांच्या विषयज्ञानासोबतच विश्लेषणात्मक विचारशक्ती, इंग्रजी भाषा, गणित, रीझनिंग व करंट अफेअर्सची चाचणी केली जाईल. अंतिम निवड लेखी परीक्षेच्या कामगिरीनुसार आणि त्यानंतरच्या इंटरव्ह्यू फेरीनंतर केली जाईल.
अर्ज प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाइन माध्यमातून होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी सर्वप्रथम NIACL च्या अधिकृत वेबसाइट www.newindia.co.in वर जावे. वेबसाइटवरील “Recruitment” विभागात जाऊन “Apply Online” या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर “New Registration” या पर्यायावर जाऊन आपले नाव, ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. नोंदणी झाल्यानंतर उमेदवारांना एक Registration Number आणि Password मिळेल, ज्याचा वापर करून पुढील अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येईल. अर्ज भरताना उमेदवारांनी आपले फोटो आणि सही योग्य फॉरमॅटमध्ये अपलोड करणे आवश्यक आहे. संपूर्ण अर्ज भरल्यानंतर सर्व माहितीची खातरजमा (Preview) करूनच शुल्क भरण्याची प्रक्रिया करावी. शुल्क भरल्यानंतरच अर्ज अंतिमतः सबमिट होईल. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याचा प्रिंटआउट काढणे अत्यंत आवश्यक आहे.
अर्ज शुल्क SC, ST आणि PwBD (Persons with Benchmark Disability) प्रवर्गासाठी ₹100/- इतके आहे, तर उर्वरित सर्व श्रेणींसाठी ₹850/- इतके आहे. हे शुल्क फक्त ऑनलाइन पद्धतीनेच (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग इत्यादी) भरायचे आहे.