Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजस्थानमध्ये सरकारी नोकरीची संधी! परराज्यात जाऊन काम करण्याची तयारी आहे? करा अर्ज

एनएलसी इंडिया लिमिटेडने बारसिंगसर प्रकल्पासाठी अप्रेंटीस भरती 2025 जाहीर केली असून ITI, डिप्लोमा व ग्रॅज्युएट उमेदवारांना अर्जाची संधी आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 03, 2025 | 03:48 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

एनएलसी इंडिया लिमिटेड (NLC India Limited) ही भारत सरकारच्या कोळसा मंत्रालयाअंतर्गत असलेली एक “नवरत्न” सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. नुकतीच या कंपनीकडून बारसिंगसर प्रकल्प, बीकानेर (राजस्थान) येथे विविध अप्रेंटीस पदांसाठी भरती 2025 ची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या अंतर्गत ITI ट्रेड, डिप्लोमा, ग्रॅज्युएट (इंजिनिअरिंग) आणि ग्रॅज्युएट (नॉन-इंजिनिअरिंग) अशा विविध गटांमध्ये उमेदवारांना प्रशिक्षणाची संधी दिली जाणार आहे. ही संधी केवळ राजस्थान राज्यातील उमेदवारांसाठी आहे. तसेच 2021 ते 2025 या कालावधीत शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेले उमेदवारच अर्ज करण्यास पात्र आहेत.

दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी! अगदी १८ वर्षांपासून ‘या’ वयोगटातील उमेदवार करू शकतात अर्ज

प्रशिक्षण कालावधी व मानधन

या अप्रेंटीस भरतीत उमेदवारांना 1 वर्ष कालावधीसाठी प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणादरम्यान पदानुसार मासिक मानधन दिले जाईल. ITI ट्रेड अप्रेंटीसना दरमहा ₹10,019, डिप्लोमा अप्रेंटीसना ₹12,524 आणि ग्रॅज्युएट अप्रेंटीस (इंजिनिअरिंग) उमेदवारांना ₹15,028 इतके मानधन देण्यात येईल. तर नॉन-इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटीसना देखील दरमहा ₹12,524 इतका भत्ता मिळेल.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. निवड प्रक्रिया पूर्णपणे गुणांच्या आधारे होणार आहे. उमेदवारांचे शैक्षणिक पात्रतेतील गुण विचारात घेतले जातील. त्यानंतर शॉर्टलिस्टिंग करून कागदपत्रांची पडताळणी व वैद्यकीय तपासणी केली जाईल.

अर्जाची प्रक्रिया

  • अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे.
  • उमेदवारांनी सर्वप्रथम www.nlcindia.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन Career → Trainee & Apprentices → Advt. No. BP 01/2025 या विभागात नोंदणी करावी.
  • त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरून त्याची प्रिंटआउट काढून स्वाक्षरीसह आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • हा अर्ज हार्ड कॉपी स्वरूपात बारसिंगसर थर्मल पॉवर स्टेशन (BTPS), गेट क्र. 2, बारसिंगसर, बीकानेर येथे जमा करावा किंवा टपालाद्वारे पाठवावा.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑक्टोबर 2025 असून हार्ड कॉपी जमा करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे.

UDISE नोंदणीची धक्कादायक आकडेवारी! महाराष्ट्रातील तब्बल 394 शाळांचे वर्ग रिकामे, विद्यार्थ्यांची वानवा

महत्त्वाचे मुद्दे

  • अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
  • अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 35 वर्षे असावे. सरकारच्या नियमानुसार आरक्षित प्रवर्गाला वयात सवलत लागू होईल.
  • ही भरती संधी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक व तांत्रिक अनुभव मिळवून देणारी ठरणार आहे.
राजस्थानमधील आणि पात्रतेला पूरक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमावू नये. अधिक माहिती व अर्जासाठी अधिकृत वेबसाइट: www.nlcindia.in

Web Title: Nlc india limited in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 03:48 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.