फोटो सौजन्य - Social Media
अभ्यासक आणि शिक्षक पदासाठी इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! नेताजी सुभाष यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी (NSUT), नवी दिल्ली यांनी असिस्टंट प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया अधिकृत संकेतस्थळ [nsut.ac.in](https://nsut.ac.in) वर सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी 11 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज भरावा. ऑनलाइन अर्जासोबत त्याची हार्ड कॉपीही विद्यापीठात पाठवावी लागेल.
या भरती मोहिमेद्वारे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये प्राध्यापकांची नेमणूक होणार आहे. यात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग या शाखांचा समावेश आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना काही पात्रता करावी लागणार आहे. असिस्टंट प्रोफेसर पदासाठी उमेदवाराकडे संबंधित शाखेत बी.ई./बी.टेक./बी.एस. आणि एम.ई./एम.टेक./एम.एस. पदवी फर्स्ट क्लास किंवा समकक्ष श्रेणीत असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, या पदासाठी NET परीक्षा किंवा अनुभवाची कोणतीही अट नाही. तर असोसिएट प्रोफेसर पदासाठी संबंधित विषयात पीएच.डी. पदवी, बॅचलर आणि मास्टर्स पदवी तसेच किमान 8 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आवश्यक आहे, ज्यामध्ये 2 वर्षांचा अनुभव पीएच.डी.नंतरचा असावा. तसेच उमेदवाराने किमान 6 संशोधन पेपर्स प्रकाशित केलेले असणे आवश्यक आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज:
या भरतीशी संबंधित अधिक माहिती आणि अद्ययावत सूचना विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
टीप: NET नसतानाही असिस्टंट प्रोफेसर होण्याची ही उत्तम संधी आहे, त्यामुळे इच्छुकांनी आजच अर्ज करावा!