Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

पुण्यात आरटीई प्रवेशासाठी दरवर्षी होणारी गर्दी यंदा ओसरली आहे. अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि नियमांमुळे ३ लाखांहून अधिक येणारे अर्ज १ लाखापर्यंत खाली आले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 03, 2026 | 09:46 PM
पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेची गती मंद; आरटीईच्या चार हजार जागा रिक्त

पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेची गती मंद; आरटीईच्या चार हजार जागा रिक्त

Follow Us
Close
Follow Us:

 

  • RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ!
  • अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर
  • पालकांमध्ये प्रचंड नाराजी
सोनाजी गाढवे/नवराष्ट्र पुणे: ‘आरटीई’ प्रवेशासाठी अर्जप्रक्रिया सुरू झाल्यानंतर दरवर्षी पालकांची अर्ज करण्यासाठी उडी पडत असते. त्यानुसार दरवर्षी एक लाखांवर जागांसाठी तीन लाखांहून अधिक अर्ज येत असत. परंतु यंदा मात्र पालकांना अर्जच करता येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे तीन लाखांवर येणारे अर्ज यंदा एक लाखाबर आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालकांच्या सोयीसाठी पूर्वीप्रमाणेच प्रवेशप्रक्रिया राबविण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

राज्यातील ८ हजार ६५१ शाळांमधील १ लाख १२ हजार ७७२ जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकृती सुरू आहे. १० मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. २७ फेब्रुवारीपर्यंत १ लाख १२ हजार ३३ अर्ज प्राप्त झाले आहेत. दरवर्षी एक लाखांहून अधिक जागांसाठी सुमारे तीन लाख अर्ज येत असताना यंदा अर्जसंख्या घटल्याचे चित्र आहे. अकोला, अमरावती, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, जळगाव, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे हे जिल्हे वगळता अनेक ठिकाणी प्रवेशक्षमतेपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाले आहेत.

पुणे जिल्ह्यातील ९०५ शाळांमधील १७हजार ५०९ जागांसाठी २३ हजार २४१ अर्ज आले असून, राज्यात सर्वाधिक नोंदणी पुण्यात झाली आहे. ठाणे, नागपूर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्येही तुलनेने चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र ग्रामीण भागात एक किलोमीटरच्या परिघात पात्र खासगी शाळा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर मर्यादा येत असल्याची तक्रार आहे.

BSNL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या पात्रता

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने यंदा नियमावलीत बदल करून तीन किलोमीटरची मर्यादा रद्द केली आहे. २०१३ च्या नियमांनुसार प्रथम एक किलोमीटर परिसरातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देऊन उर्वरित जागा तीन किलोमीटरपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्याची तरतूद होती. नव्या निर्णयामुळे एक किलोमीटरबाहेरील विद्यार्थ्यांना संधी उरणार नाही, असा आरोप मुकुंद किर्दत यांनी केला.

आरटीई हा खाजगी शाळांसाठी कोट्यांवधीचा नफेखोरीचा विषय आहे. या मान्यतांना स्थगिती दिली हे सरकारचे म्हणणे दिशाभूल करणारे असून, प्रत्यक्षात या सर्व शाळांनी या प्रमाणपत्राआधारे आरटीई मधून शाळा नोंदणी काढून घेतलेली असून यातून साधारण या ७३ खाजगी शाळांमधील आरटीई दुर्बल, वंचीत घटकातील साधारण चार हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले जाणार आहेत. त्यामुळे तातडीने यांच्या स्थगिती द्यावी अशी मागणी आहे.

आरटीई प्रवेश नोंदणी: प्रमुख आकडेवारी (जिल्हानिहाय)

खालील तक्त्यावरून कोणत्या जिल्ह्यांत सर्वाधिक आणि कुठे सर्वात कमी प्रतिसाद मिळाला आहे, हे स्पष्ट होते:

सर्वाधिक नोंदणी असलेले जिल्हे अर्ज संख्या सर्वात कमी नोंदणी असलेले जिल्हे अर्ज संख्या
पुणे २३,२४१ सिंधुदुर्ग २६
ठाणे १२,६५७ नंदुरबार ३३४
नागपूर १२,२४२ गडचिरोली ४०४
नाशिक ७,०६५ रत्नागिरी ४३७
छ. संभाजीनगर ६,९९२ हिंगोली ६८७
मुंबई ४,४६० धाराशिव ९३३
रायगड ४,५३१ वाशिम ९७७
जळगाव ३,८२९

BTech in Engineering Physis की अभियांत्रिकी विज्ञानात बीटेक? करिअरला चालना देण्यासाठी कोणता अभ्यासक्रम योग्य?

Web Title: Confusion in rte admission process number of applications drops from 3 lakhs to 1 lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 09:46 PM

Topics:  

  • Career News

संबंधित बातम्या

CSBC Constable Exam २०२६: सीएसबीसी कॉन्स्टेबल भरती परीक्षेची तारीख जाहीर, ‘या’ तारखेपासून मिळणार एडमिट कार्ड
1

CSBC Constable Exam २०२६: सीएसबीसी कॉन्स्टेबल भरती परीक्षेची तारीख जाहीर, ‘या’ तारखेपासून मिळणार एडमिट कार्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.