फोटो सौजन्य - Social Media
केरळ राज्यातील कोट्टायममध्ये जन्मलेले कन्नन गोपीनाथन त्यांच्या जीवन कथेसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. सुरुवातीला इंजिनिअरिंग क्षेत्रात शिक्षण घेणारे कन्नन पत्नीच्या सांगण्यावरून कसे IAS होतात? काय आहे त्यांची संघर्ष कम प्रेमकथा जाणून घ्या. कन्नन गोपीनाथन यांनी इंजिनिअरिंगमध्ये स्वर्णपदक मिळवले. नंतर नोएडामधील फ्रीस्केल सेमीकंडक्टर कंपनीत VLSI डिझायनर म्हणून काम केले, तसेच NGO सुरू करून रस्त्यावर विक्री करणाऱ्या मुलांना शिक्षण दिले.
कन्ननच्या आयुष्यात मोठा बदल त्यांची पत्नी हिमानीच्या येण्याने झाला. हिमानी, हरियाणवी सॉफ्टवेअर इंजिनिअर, NGOमध्ये स्वयंसेविका म्हणून काम करत होती. NGO मध्ये काम करत असताना कन्नन यांना हिमानीची फार मोठी मदत लाभली.
दोघांच्या लग्नानंतर त्यांनी प्रशासनात जाण्याचा निर्णय घेतला. हिमानीने UPSC तयारी सुरू केली आणि कन्ननने ही हिमानीच्या सोबत परीक्षा क्रॅक करण्याचे ठरवले. कन्ननने अगदी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्लिअर केली पण रँक आला नाही. पुढे रँकच्या शोधात, त्याने पुन्हा खिंड लढवली. यावेळी त्याच्या पत्नीने त्याला पूर्णतः फोकस राहण्यासाठी सांगितले. कन्ननने नोकरी सोडली आणि हिमानीने त्या दिवसात स्वतः घर चालवले. कन्ननने फ्रीस्केल कंपनी सोडली आणि अखेर २०१२ मध्ये UPSC परीक्षा ५९व्या रँकवर उत्तीर्ण झाली. कन्नन यांनी ५ ऑगस्ट २०१९ रोजी अनुच्छेद 370 रद्द झाल्यानंतर विरोधार्थ इस्तीफा दिला. हिमानीने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. नंतर सरकारने २०२० मध्ये पुन्हा ड्यूटी जॉइन करण्यास सांगितले, पण कन्ननने नकार दिला आणि स्वतःची वेबसाइट सुरू केली.
सध्या दांपती एकत्रितपणे साध्या जीवनशैलीत राहतात. भाड्याचे घर, मुलाचे शिक्षण, वाय-फाय आणि खर्च मर्यादित ठेवले आहेत. त्यांच्या या कथा संघर्ष, साहस आणि जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे यश मिळवण्याची प्रेरणा देतात. एकमेकांवर प्रेम करत त्यांनी आयुष्यात अनेक गोष्टी सध्या केल्या, यामागे त्यांच्या एकमेकांवरील विश्वास विश्वास कारणीभूत आहे. त्यांच्या या कथेने अनेक गोष्टी शिकण्यासाख्या आहेत तसेच प्रेरणादायी आहेत.