Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rojgar Mahakumbh Maharashtra: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी गुड न्यूज! १,५८८ नियोक्ते सहभागी, ७१,९३९ प्राथमिक रोजगार संधी

Rojgar Mahakumbh Maharashtra: राज्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘विश्वविक्रमी रोजगार महाकुंभा’ला उद्योग क्षेत्रातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत १,५८८ नियोक्त्यांनी नोंदणी केली असून त्यांच्यामार्फत ७१,९३९ प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 21, 2026 | 05:45 PM
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी गुड न्यूज! १,५८८ नियोक्ते सहभागी, ७१,९३९ प्राथमिक रोजगार संधी

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी गुड न्यूज! १,५८८ नियोक्ते सहभागी, ७१,९३९ प्राथमिक रोजगार संधी

Follow Us
Follow Us:
  • नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी गुड न्यूज!
  • १,५८८ नियोक्ते सहभागी, ७१,९३९ प्राथमिक रोजगार संधी
  • टाटा महिंद्रासह नामांकित कंपन्या रोजगार महाकुंभमध्ये सहभागी होणार
मुंबई : राज्यातील युवकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात येत असलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘विश्वविक्रमी रोजगार महाकुंभा’ला नामांकित कंपन्या आणि उद्योगसंस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत १,५८८ नियोक्त्यांनी नोंदणी केली असून, त्यांच्या माध्यमातून ७१,९३९ प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत.

रोजगार महाकुंभात टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप, LIC, HDFC, ICICI, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, बॉश, एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज, एशियन पेंट्स, JSW स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, CEAT आणि थर्मॅक्स यांसारख्या नामांकित कंपन्या व संस्थांचा सहभाग आहे. ऑटोमोबाईल, उत्पादन, बँकिंग, वित्तीय सेवा, आयटी, शिक्षण, आरोग्य, लॉजिस्टिक्स आणि इतर विविध क्षेत्रांतील कंपन्यांकडून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामुळे विविध शैक्षणिक पात्रता आणि कौशल्ये असलेल्या युवकांना त्यांच्या आवडीनुसार रोजगाराच्या संधी शोधता येणार आहेत.

फ्रेशर्ससह अनुभवी उमेदवारांसाठीही रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत. ITI, पदवी, HSC, डिप्लोमा, इंजिनीअरिंग आणि इतर कौशल्याधारित पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी विविध पदांवर संधी उपलब्ध आहेत. टेक्निशियन, मशीन ऑपरेटर, फिटर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, ट्रेनी, अप्रेंटिस, सेल्स, ग्राहक सेवा आणि इतर पदांचा यामध्ये समावेश आहे. तसेच शासनाशी निगडित संस्थांमध्येही काम करण्याची संधी युवकांना मिळणार आहे.

Dubai Crane Operator Salary: दुबईत क्रेन ऑपरेटर बनून कसा कमावतोय लाखो रुपये? जाणून घ्या एका क्लिकवर..

रोजगार महाकुंभाला मिळत असलेल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर, २९ सप्टेंबरपर्यंत नोंदणीकृत नियोक्त्यांची संख्या २,५०० हून अधिक होण्याची अपेक्षा आहे. आगामी काळात आणखी कंपन्या आणि उद्योगसंस्था सहभागी होणार असल्याने युवकांसाठी उपलब्ध रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. रोजगार महाकुंभाच्या माध्यमातून उद्योगक्षेत्राच्या मनुष्यबळाच्या गरजा आणि युवकांची कौशल्ये यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

उद्योगांच्या सहभागासाठी झाले ‘एम्प्लॉयर राऊंड टेबल’

येत्या २९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘विश्वविक्रमी रोजगार महाकुंभाच्या’ पूर्वतयारीचा भाग म्हणून कौशल्य विकास विभाग आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून ११ सप्टेंबर रोजी वांद्रे पूर्व येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ‘एम्प्लॉयर राऊंड टेबल’चे आयोजन करण्यात आले होते. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारातून आयोजित या बैठकीत महाराष्ट्रातील ३२ नामांकित उद्योग व आस्थापनांच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. रोजगार मेळाव्यात उद्योगांचा सक्रिय सहभाग वाढवणे, त्यांच्या मनुष्यबळाच्या गरजा समजून घेणे आणि उपलब्ध रोजगाराच्या संधींसाठी नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे, हा या बैठकीचा उद्देश होता.

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

Web Title: Pandit deendayal upadhyay vishwavikrami rojgar mahakumbh 71939 job opportunities 1588 employers maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • HDFC
  • jobs
  • Mangal Prabhat Lodha

संबंधित बातम्या

तरुणांसाठी मोठी बातमी! १०० कौशल्य प्रशिक्षण केंद्रे सुरू होणार; Mangal Prabhat Lodha यांच्या हस्ते शुभारंभ
1

तरुणांसाठी मोठी बातमी! १०० कौशल्य प्रशिक्षण केंद्रे सुरू होणार; Mangal Prabhat Lodha यांच्या हस्ते शुभारंभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.