KVIC Recruitment 2026: खादी आयोग ५० पदांसाठी भरती, पगार ₹४०,००० पर्यंत; अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
सरकारी आणि निमसरकारी क्षेत्रात (KVIC Recruitment 2026) करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत येणाऱ्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) ५० विविध कंत्राटी पदांसाठी अधिकृत भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेत यंग प्रोफेशनल्स, कन्सल्टंट्स आणि सिनियर कन्सल्टंट्स यांसारख्या उच्च दर्जाच्या पदांचा समावेश असून, पदवीधर आणि अनुभवी उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी ठरणार आहे. योग्य पात्रता असणारे उमेदवार केव्हीआयसीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज पूर्ण करू शकतात.
या भरती प्रक्रियेची विशेष बाब म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारची कठीण लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड ही त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे तयार करण्यात येणारी शॉर्टलिस्ट, वैयक्तिक मुलाखत आणि मूळ कागदपत्रांच्या पडताळणीद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे योग्य शैक्षणिक पात्रता आणि संबंधित क्षेत्रातील अनुभव असणाऱ्या उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे केंद्रीय आयोगात सेवा बजावण्याची थेट संधी मिळणार आहे.
केव्हीआयसीने जाहीर केलेल्या एकूण ५० जागांपैकी २० पदे ही यंग प्रोफेशनल्ससाठी राखीव आहेत, तर ३० पदे कन्सल्टंट आणि सिनियर कन्सल्टंट या वरिष्ठ श्रेणीतील पदांसाठी निश्चित करण्यात आली आहेत. तरुण व्यावसायिकांसाठी (Young Professionals) असलेल्या २० जागांमध्ये लेखा व लेखापरीक्षण (Accounts/Audit) विभागासाठी ५ जागा, प्रशासन व मानवी संसाधन (HR & Admin) विभागासाठी ४ जागा, खादी विभागासाठी ३ जागा, कायदेशीर (Legal) विभागासाठी ३ जागा, प्रसिद्धी (Publicity) विभागासाठी २ जागा, तर विपणन (Marketing), डिझाइन व रेखांकन, आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभागासाठी प्रत्येकी १ जागा उपलब्ध आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Bangladesh : 101 करारांच्या आढाव्यावरून भारत संतप्त; बांगलादेशच्या बदलत्या भूमिकेवर दिल्लीची करडी नजर
याशिवाय, कन्सल्टंट (Consultants) च्या १५ जागांपैकी लेखा व लेखापरीक्षणासाठी ३, खादी कच्चा माल विभागासाठी ३, प्रशासन व मानवी संसाधनासाठी २, खादी विभागासाठी २, कायदेशीर विभागासाठी २, तर मालमत्ता व सेवा, विपणन आणि स्मृती विभागासाठी प्रत्येकी १ जागा आहे. वरिष्ठ सल्लागार (Senior Consultants) पदाच्या १५ जागांमध्ये लेखा व लेखापरीक्षणासाठी ३, मालमत्ता व सेवांसाठी २, खादी कच्चा माल विभागासाठी २, प्रशासन व मानवी संसाधनासाठी २, खादी विभागासाठी २, तर कायदेशीर, विपणन, स्मृती आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभागासाठी प्रत्येकी १ जागा समाविष्ट करण्यात आली आहे.
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून संबंधित विषयात पदवी (Graduation) किंवा पदव्युत्तर पदवी (Post Graduation) असणे अनिवार्य आहे. यासोबतच, उमेदवाराला संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ५ वर्षांचा व्यावसायिक अनुभव असणे आवश्यक आहे. पदनिहाय अनुभवाची अचूक माहिती उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत तपासून घेणे गरजेचे आहे.
वयोमर्यादेचा विचार केला तर, यंग प्रोफेशनल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय २७ वर्षे असावे (वयाची गणना १ ऑक्टोबर २०२६ रोजी केली जाईल). सिनियर कन्सल्टंट पदासाठी ३९ वर्षांखालील उमेदवार पात्र असतील. कन्सल्टंट पदासाठी वयोमर्यादा ४० ते ६५ वर्षे दरम्यान ठेवण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना (SC/ST/OBC/पंगू उमेदवार) केंद्र सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादेत योग्य ती सवलत दिली जाईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Dhaka Blasts : ढाकामध्ये सात ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट; शहर हाय अलर्टवर, 200 हून अधिक चेकपॉईंट्सवर पोलीस तैनात
निवड झालेल्या यंग प्रोफेशनल्स आणि सिनियर कन्सल्टंट उमेदवारांना पदानुसार दरमहा ₹२५,००० ते ₹४०,००० पर्यंत आकर्षक मानधन दिले जाईल. याशिवाय नियमानुसार इतर सोयी-सुविधा आणि भत्ते मिळतील. कन्सल्टंट पदासाठीच्या उमेदवारांचे वेतन हे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या (DoPT) नियमांनुसार आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार निश्चित केले जाईल.
अर्ज प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाइन असून इच्छुकांनी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत आपला अर्ज अंतिमरीत्या सादर करायचा आहे. अंतिम मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे पात्र उमेदवारांनी केव्हीआयसीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन सर्व आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज भरावा.






