
पीडीएल
PDIL Recruitment 2026: इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. प्रोजेक्ट्स अँड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड (PDIL) ने देशभरातील आपल्या विविध कार्यालयांसाठी आणि प्रोजेक्ट साईट्ससाठी १५३ पदांच्या भरतीची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत ग्रेज्युएट इंजिनिअर (Graduate Engineer) आणि डिप्लोमा इंजिनिअर च्या विविध पदांवर नियुक्त्या केल्या जातील. इच्छुक उमेदवारांना २७ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
ही भरती पूर्णपणे कंत्राटी पद्धतीवर आधारित असेल. सुरुवातीला ही नियुक्ती एक वर्षासाठी केली जाईल, जी उमेदवाराची कामगिरी आणि कंपनीच्या गरजेनुसार जास्तीत जास्त तीन वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते. निवड झालेल्या उमेदवारांची पोस्टिंग देशभरात कंपनीच्या कोणत्याही कार्यालयात किंवा प्रोजेक्ट साईटवर केली जाऊ शकते.
या भरती मोहिमेमध्ये ग्रेज्युएट आणि डिप्लोमा इंजिनिअर्ससाठी वेगवेगळ्या स्केलनुसार पदे आणि मानधन निश्चित करण्यात आले आहे:
ग्रेज्युएट इंजिनिअर (स्केल-४) : ₹ ७१,०००/-
ग्रेज्युएट इंजिनिअर (स्केल-३) : ₹ ६३,०००/-
ग्रेज्युएट इंजिनिअर (स्केल-२) : ₹ ५६,०००/-
ग्रेज्युएट इंजिनिअर (स्केल-१) : ₹ ४७,०००/-
डिप्लोमा इंजिनिअर (स्केल-१ ते ३) : ₹ ३१,०००/- ते ₹ ४०,०००/-
पात्र शाखा: सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, प्रोसेस, कॉम्प्युटर सायन्स, फायर अँड इंडस्ट्रियल सेफ्टी, ह्युमन रिसोर्स, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, मटेरियल मॅनेजमेंट आणि केमिस्ट्री.
शैक्षणिक पात्रता: उमेदवाराकडे संबंधित विषयात मान्यताप्राप्त संस्थेतून इंजिनिअरिंगची डिग्री किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. सामान्य आणि ओबीसी प्रवर्गासाठी किमान ६०% गुण, तर एससी आणि एसटी प्रवर्गासाठी ५५% गुण असणे अनिवार्य आहे.
वयोमर्यादा: वेगवेगळ्या पदांनुसार कमाल वयोमर्यादा ३२ वर्षे ते ४३ वर्षे दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. वय आणि अनुभवाची गणना ३० जून २०२६ या तारखेच्या आधारे केली जाईल.
ही भरती प्रक्रिया दोन प्रमुख टप्प्यांत पूर्ण केली जाईल.
स्क्रीनिंग: सर्वात आधी ऑनलाईन आलेल्या अर्जांची छाननी (Screening) करून पात्र उमेदवारांची निवड केली जाईल.
वैयक्तिक मुलाखत: पात्र उमेदवारांना ईमेलद्वारे वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. हा इंटरव्यू ‘पीडीआईएल भवन, ए-१४, सेक्टर-१, नोएडा’ येथे आयोजित केला जाईल. मुलाखतीसाठी येणाऱ्या पात्र उमेदवारांना कंपनीच्या नियमांनुसार प्रवास भत्ता देखील दिला जाईल.
सामान्य (General) आणि ओबीसी (OBC) प्रवर्ग: ₹ ८००/-
एससी (SC), एसटी (ST) आणि ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्ग: ₹ ४००/-
Indian Navy Recruitment 2026: नौदलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! घरबसल्या असा करा अर्ज?
१. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम पीडीआयएलच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ‘Careers’ सेक्शनमध्ये जावे.
२. अधिकृत ओळखपत्राच्या (ID) तपशिलानुसार आपली नोंदणी (Registration) पूर्ण करावी.
३. नोंदणी केल्यानंतर अर्ज फॉर्ममध्ये मागितलेली सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूक भरावी.
४. आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करावी.
५. ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क जमा करून फॉर्म सबमिट करावा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआऊट काढून जतन करून ठेवावी.