फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Indian Navy SSC Officer Recruitment 2026: जर तुमचे भारतीय नौदलात सामील होऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न असेल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. इंडियन नेव्हीने एसएससी ऑफिसर (SSC Officer) पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आणि इच्छुक आहेत, ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ जुलै २०२६ आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण २७५ उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
ऑफिसर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून बीई (BE) किंवा बीटेक (B.Tech) मध्ये किमान ६०% गुणांसह पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय, विशिष्ट पदांनुसार इतर निर्धारित शैक्षणिक पात्रता व निकष असणे गरजेचे आहे.
इंडियन नेव्हीमधील या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म ०२ जुलै २००२ ते २००८ च्या दरम्यान झालेला असावा.
शॉर्टलिस्टिंग: उमेदवारांनी पदवीमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे त्यांना शॉर्टलिस्ट केले जाईल. शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना ईमेल किंवा एसएमएसद्वारे याची माहिती दिली जाईल.
SSB इंटरव्यू: ज्या उमेदवारांचे नाव गुणवत्ता यादीत (Merit List) असेल, त्यांना एसएसबी (SSB) इंटरव्यूसाठी बोलावले जाईल. यामध्ये उमेदवारांची मानसशास्त्रीय चाचणी (Psychological Test), ग्रुप इंटरव्यू आणि पर्सनल इंटरव्यू घेतला जाईल.
वैद्यकीय चाचणी: एसएसबी इंटरव्यूमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अंतिम टप्प्यात वैद्यकीय चाचणीसाठी (Medical Exam) आमंत्रित केले जाईल.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो कराव्यात:
१. सर्वप्रथम भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाईट www.joinindiannavy.gov.in वर जा.
२. वेबसाईटच्या होम पेजवर असलेल्या ‘Registration’ या लिंकवर क्लिक करा.
३. लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक तपशील अचूक भरा.
४. यानंतर विचारलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी अपलोड करा.
५. सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट करा आणि लॉगिन डिटेल्स नोंदवून अर्जाची एक प्रिंट आऊट काढून जतन करून ठेवा.






