Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi: ‘आयुष्याची परीक्षा आऊट …..’! आयआयटी दिल्लीच्या दीक्षांत सोहळ्यात पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद!

PM Modi IIT Delhi convocation speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयआयटी दिल्लीच्या ५७ व्या दीक्षांत समारंभात 'परम प्रज्ञा' सुपरकंप्यूटरचे उद्घाटन झाले. या सोहळ्यात पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना कोणता सल्ला दिला? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 08, 2026 | 01:36 PM
pm modi in iit

pm modi in iit

Follow Us
Follow Us:

PM Modi IIT Delhi convocation speech : आयआयटी दिल्लीच्या ५७ व्या दीक्षांत समारंभात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्य पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. तसेच शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी हेदेखील यावेळी उपस्थित होते. या सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना जीवनाशी संबंधित महत्त्वाचे धडे दिले. त्यांनी विविध क्षेत्रांवर चर्चा करण्यासोबतच ‘एआय’चे महत्त्वही अधोरेखित केले.

या कार्यक्रमात ३ हजारहून अधिक विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या, तर ५८७ पीएचडी स्कॉलर्सनी या सोहळ्यात सहभाग घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेसिडेंट्स गोल्ड मेडल, डायरेक्टर्स गोल्ड मेडल आणि परफेक्ट १० गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले.

याशिवाय, पंतप्रधान मोदींनी एआयवर आधारित हाय-परफॉर्मन्स सुपरकंप्यूटर ‘परम प्रज्ञा’चे उद्घाटनही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांना आयुष्याचा गुरुमंत्र देताना सांगितले की, जेव्हा एखादी अडचण मोठी वाटू लागते, तेव्हा तिला लहान-लहान भाग करावेत. तसेच ते पुढे म्हणतात. आयुष्यात अडचणी येणारच, पण संकटांचा स्वभाव असतो की ती कधीही एकटे येत नाहीत; जेव्हा अडचणी येतात, तेव्हा त्यासोबत संधीही येतात. आयआयटी दिल्लीने जे शिकवले आहे, ते नेहमी लक्षात ठेवा. कॅम्पसचे जीवन आणि कॅम्पसबाहेरील जीवन यामध्ये खूप मोठा फरक असतो, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

‘ आयुष्याची परीक्षा आऊट ऑफ सिलॅबस असते’

पंतप्रधानांनी पुढे म्हटले की, आयआयटीच्या परीक्षेत फक्त सिलॅबस असतो, परंतु आयुष्याची परीक्षा ही ‘आऊट ऑफ सिलॅबस’ असते. यशस्वी लोकांच्या यशाचे कारण फक्त योग्य उत्तरे देणे हे नसते, तर ज्या प्रश्नांकडे जगाने दुर्लक्ष केले, ते प्रश्न ओळखणे आणि त्यांच्यावर उपाय शोधणे हे असते. आयुष्यात नेहमी कुतुहल (क्युरिऑसिटी) टिकवून ठेवा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

AI in ZP School: जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल! एआयच्या मदतीने तयार केले ॲनिमेटेड व्हिडिओ

तुम्ही जे काही कराल, त्याचा परिणाम ‘विकसित भारतावर’ होईल

पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत, हा देश स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या पिढीचे दुःख, तपस्या आणि बलिदानाचे फळ आहे. आपल्या आयुष्यातील आव्हाने वेगळी आहेत आणि जबाबदाऱ्याही वेगळ्या आहेत.

पंतप्रधान विद्यार्थ्यांना म्हणाले की, पुढील ३० ते ३५ वर्षांत तुम्ही जे काही कराल, ते आपल्या ‘विकसित भारत’च्या प्रवासावर प्रभाव पाडेल. तुम्ही जे काही कराल, त्याचा भारतावर कसा परिणाम होईल, याचा विचार करा. आज देशातील एखादा तरुण अभियंता असे म्हणत आहे की, ‘First in My Bloodline to Build a Rocket’

IIT Madras Indonesia MoU: आयआयटी मद्रास आणि इंडोनेशियामध्ये ऐतिहासिक करार; उच्च शिक्षण आणि ‘या’ क्षेत्रात सहकार्य वाढणार!

त्यांनी पुढे सांगितले की, आपल्या विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी दिली जात आहे. पुढे स्टार्टअपची संधी दिली जात आहे. यासाठी रिसर्च, डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशन सुरू करण्यात आले आहे. तसेच ‘नॅशनल रिसर्च फाऊंडेशन’ची स्थापना करण्यात आली आहे, ज्यामुळे देशातील विज्ञान आणि संशोधनाला नवी ताकद मिळू शकेल.

Web Title: Pm modi iit delhi convocation param pragya news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 01:36 PM

Topics:  

  • IIT
  • PM Modi
  • PM Modi Speech

संबंधित बातम्या

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा
1

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा

Rahul Gandhi: पीएम मोदींची राहुल गांधींनी उडवली खिल्ली? ‘रामायण’ फेम सुनील लहरींनी व्यक्त केला संताप
2

Rahul Gandhi: पीएम मोदींची राहुल गांधींनी उडवली खिल्ली? ‘रामायण’ फेम सुनील लहरींनी व्यक्त केला संताप

Climate Change वर भारताचा Green प्लॅन! हायड्रोजन ट्रेन ते अणू ऊर्जेपर्यंत; PM Modi नी सांगितला फ्युचर व्हिजन
3

Climate Change वर भारताचा Green प्लॅन! हायड्रोजन ट्रेन ते अणू ऊर्जेपर्यंत; PM Modi नी सांगितला फ्युचर व्हिजन

Narendra Modi : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त नवा संकल्प, ‘से नो टू ड्रग्स’ या पोर्टलचे उद्घाटन
4

Narendra Modi : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त नवा संकल्प, ‘से नो टू ड्रग्स’ या पोर्टलचे उद्घाटन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.