
घाटकोपरमधील शाळेत समोसा खाल्ल्याने मुलांना विषबाधा (फोटो सौजन्य - Google Gemini AI)
शाळेच्या कॅन्टीनमधील एक साधा समोसा खाल्ल्याने अनेक मुले बाधित झाली आणि पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या आराेग्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. आता ही गंभीर बाब असल्याचे तज्ज्ञ सांगतात. शालेय शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी स्पष्ट नियम असूनही, शाळांमध्ये जंक फूडचा विळखा इतका घट्ट आणि धोकादायक असल्याबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
दूषित तेलात तळलेले समाेसे विद्यार्थ्यांना का दिले?
शाळेच्या प्राचार्या, रिमा डिसूझा, यांनी सांगितले की, कॅन्टीनमधील एका कर्मचाऱ्याकडून समोसे तळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलात चुकून कापूर पडला होता. कापूर पडल्याने हे तेल दूिषत झाले तर मग तेल फेकून न देता त्याच तेलात समोसे तळून मुलांना खायला का दिला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे ही घटना निष्काळजीपणा आणि स्वच्छता मानकांच्या भीषण स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात.
उन्हाळ्यात होऊ शकते अन्नातून विषबाधा; अन्नपदार्थांची अशी घ्या काळजी
कागदावरचा कायदा: शाळांमध्ये जंक फूड बंदीचा विसर
मुलांमध्ये वाढणारी लठ्ठपणा आणि आरोग्याच्या समस्या रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अनेक वर्षांपूर्वी परिपत्रक जारी करून शाळा कॅन्टीनमध्ये जंक फूडच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली हाेती. या नियमानुसार ‘उच्च चरबी, मीठ आणि साखर’ असलेल्या पदार्थांवर बंदी आहे. शासनाने मुलांच्या ताटातून धोकादायक पदार्थ काढून टाकण्यासाठी परिपत्रक जारी केले हाेते. पण या नियमांबाबत आजघडीला वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांना पुसटशी कल्पना नसल्याचे दिसून आले.
शासनाने बंदी घातलेल्या पदार्थांची यादी:
१. बटाटा चिप्स, पिझ्झा, बर्गर
२. केक, बिस्किटे, चॉकलेट, कँडीज
३. कार्बोनेटेड आणि सर्व प्रकारची हवाबंद शीतपेये
४. वडापाव आणि समोसे यांसारखे तळलेले पदार्थ
त्याऐवजी, सरकारने आरोग्यदायी पर्यायांची शिफारस केली होती
१. चपाती/पराठे, भात, भाज्या, डाळी
२. इडली सांबार, गव्हाचा उपमा, खिचडी
३. नारळ पाणी, लिंबू सरबत, जलजीरा
नियमांच्या अंमलबजावणीची जबाबदारी शाळांच्या मुख्याध्यापकांवर
या नियमांच्या अंमलबजावणीची जबाबदारी शाळांचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनावर टाकण्यात आली होती. सरकारी परिपत्रकात स्पष्टपणे म्हटले आहे की, एचएफएसएस पदार्थांमध्ये पोषक तत्वे कमी असतात आणि मीठ, साखर व मैद्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे लठ्ठपणा आणि इतर आजार होतात, जे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्षमतेवर परिणाम करतात. त्यामुळे, शाळेच्या कॅन्टीनमध्ये जंक फूडचा साठा आणि विक्री प्रतिबंधित करत आहोत आणि शाळेचे मुख्याध्यापक व व्यवस्थापनाने याची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
शासकीय वसतिगृहातील 50 हून अधिक मुलींना जेवणातून विषबाधा, 30 मुलींवर उपचार सुरू
राष्ट्रीय आदेश: कॅन्टीनसाठी FSSAI चे कठोर नियम
केवळ राज्य सरकारच नाही, तर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने देखील ‘अन्न सुरक्षा आणि मानक (शालेय मुलांसाठी सुरक्षित अन्न आणि आरोग्यदायी आहार) विनियम, २०२०’ अंतर्गत कडक नियम लागू केले आहेत.