Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन, पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

सोमवारी पहाटे अल्पशा आजाराने ज्येष्ठ फोटोग्राफर रजनीश काकडे यांनी अखेरचा श्वास राहत्या घरी घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 23, 2026 | 10:36 PM
रजनीश काकडे यांचे दुःखद निधन

रजनीश काकडे यांचे दुःखद निधन

Follow Us
Close
Follow Us:
  • ज्येष्ठ फोटोग्राफर रजनीश काकडे यांचे निधन
  • अनेक पुरस्कारांचे होते मानकरी
  • अल्पशा आजाराने झाले निधन 
द मुंबई प्रेस क्लबचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे सोमवारी पहाटे दुख:द निधन झाले. ५५ वर्षांचे असणाऱ्या रजनीश काकडे यांची सोमवारी पहाटे प्रकृती अचानक बिघडली. त्यांना रुग्णालयात नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात बंधू राजेश काकडे आणि बहिण असा परिवार आहे.  

ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे हे अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. सोमवारी पहाटे त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र त्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काकडे यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.  

Sunil Thapa Dies: ‘ मेरी कोम’ फेम अभिनेता सुनील थापा यांचे निधन, वयाच्या ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अनेक पुरस्कारांचे मानकरी 

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरलेले रजनीश काकडे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात दैनिक सकाळमधून केली होती. त्यानंतर ‘हिंदुस्तान टाइम्स’मध्ये तीन वर्षे काम केल्यानंतर ते आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था ‘असोसिएटेड प्रेस’मध्ये दाखल झाले. मागील अठरा वर्षांपासून ते असोसिएटेड प्रेससोबत कार्यरत होते. 

काकडे हे केवळ अनुभवी छायाचित्रकार नव्हते, तर अनेक पिढ्यांतील तरुण छायाचित्र पत्रकारांसाठी मार्गदर्शक होते. आपल्या कामातून त्यांनी अनेक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण क्षण प्रामाणिकपणे व संवेदनशीलतेने टिपले. रजनीश काकडे यांना अनेक पुरस्कार प्राप्त होते. तसंच मनोरंजन, कला आणि क्रीडा क्षेत्रात त्यांचं मोठ नाव होतं आणि त्यांना अनेक क्रीडा छायाचित्रांसाठीही पुरस्कार प्राप्त झाले होते. अनेक तरूण छायाचित्रकारांसाठी ते एक आदर्श फोटोग्राफर होते. त्यांच्या फोटोचे अँगल हे नेहमीच चर्चेचा विषय ठरले होते. 

Bigg Boss Marathi 6 : दीपाली सय्यदवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन, नवऱ्यानेही लपवलं सत्य, म्हणाला…

तरूण छायाचित्रकारांचे मार्गदर्शक 

आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी अनेक छायाचित्रकार घडवले. तरुण छायाचित्रकारांना धैर्य आणि करुणेने सत्याचा पाठपुरावा करण्यासाठी नेहमी प्रेरित केले. मुंबईच्या पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे योगदान केवळ छायाचित्रांपुरते मर्यादित नव्हते, त्यांनी माणसे घडवली, संस्थांना बळ दिले आणि पत्रकारितेच्या सर्वोत्तम परंपरा जपल्या. त्यांच्या निधनामुळे माध्यम क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. याशिवाय गेली अनेक वर्ष मुंबई प्रेस क्लबच्या पदावरही ते कार्यरत होते आणि त्यांनी योग्य पद्धतीने आपला कार्यभार वाहिला होता. रजनीश काकडे यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 

Web Title: Veteran photographer rajneesh kakade passes away mourning in the journalism sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 10:36 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Gen Z आणि Millennialsसाठी खास अनुभव, पार्थने सादर केला मुंबईत जगातील पहिला HEXAIMMERSIVE™️ शो
1

Gen Z आणि Millennialsसाठी खास अनुभव, पार्थने सादर केला मुंबईत जगातील पहिला HEXAIMMERSIVE™️ शो

इच्छुकांची संख्या वाढली, ‘स्वीकृत ‘ची निवड लांबणीवर पडण्याची शक्यता… इच्छुकांची नाराजी टाळण्यासाठी राजकीय पक्षांचा सावध पवित्रा
2

इच्छुकांची संख्या वाढली, ‘स्वीकृत ‘ची निवड लांबणीवर पडण्याची शक्यता… इच्छुकांची नाराजी टाळण्यासाठी राजकीय पक्षांचा सावध पवित्रा

राजकीय वाद पेटला! मीरा-भाईंदरचा विकास आराखडा पुन्हा रद्द? राज्य सरकार घेणार अंतिम निर्णय
3

राजकीय वाद पेटला! मीरा-भाईंदरचा विकास आराखडा पुन्हा रद्द? राज्य सरकार घेणार अंतिम निर्णय

Kolhapur News : “पूरनियंत्रण प्रकल्पात त्रुटी राहता कामा नये”; आमदार राजेश क्षीरसागर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
4

Kolhapur News : “पूरनियंत्रण प्रकल्पात त्रुटी राहता कामा नये”; आमदार राजेश क्षीरसागर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.