Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yasmin Shaikh : भाषाशास्त्रातला हिरा हरपला! प्रा. यास्मिन शेख यांनी वयाच्या १०१ व्या वर्षी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

Prof Yasmin Shaikh obituary : मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रात आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका, प्राध्यापिका आणि व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे आज वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 24, 2026 | 04:03 PM
yasmin

yasmin

Follow Us
Follow Us:

Prof Yasmin Shaikh obituary : मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रात आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका, प्राध्यापिका आणि व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे आज (सोमवारी) वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या १०१ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील वृद्धाश्रमात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य, व्याकरण आणि शिक्षण वर्तुळात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

प्रा. यास्मिन शेख यांचा जन्म २१ जून १९२५ रोजी ज्यू कुटुंबात झाला असून त्यांचे मूळ नाव ‘जेरुषा रुबेन’ असे होते. वडिलांच्या सरकारी नोकरीमुळे त्यांना बालपणापासून विविध ठिकाणी राहण्याची संधी मिळाली. त्यांनी पुण्यातील एस.पी. कॉलेजमधून बी.ए.चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात आणि मुंबईतील शीव येथील एसआयईएस (SIES) महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक म्हणून त्यांनी प्रदीर्घ सेवा दिली.

मराठी लेखनसंस्कृतीच्या प्रसारासाठी कार्य

एसआयईएस महाविद्यालयात प्रा. यास्मिन शेख यांनी मराठी विभागप्रमुख म्हणूनही महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मराठी भाषा, व्याकरण, शुद्धलेखन आणि लेखनसंस्कृतीच्या प्रसारासाठी समर्पित केले. त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थी, लेखक आणि भाषा अभ्यासकांना मार्गदर्शन मिळाले.

Sharad Ratna Awards : कलाकारांसाठी मोठी बातमी! मुंबईत रंगणार ‘शरद रत्न पुरस्कार’ सोहळा, पुणे बैठकीत रूपरेषा निश्चित..

१९४९ मध्ये अझीझ अहमद इब्राहिम शेख यांच्याशी विवाह केल्यानंतर त्यांनी आपले नाव बदलून यास्मिन शेख केले, परंतु आपले ज्यू मूळ आणि धर्म कायम ठेवला.त्यांच्या पश्चात डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना या दोन मुली आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस: भाषाशास्त्राचा एक मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त

मराठी मातृभाषा नसतानाही त्यांनी मराठी भाषेवर आणि व्याकरणावर असाधारण प्रभुत्व मिळवले. ‘अंतर्नाद’ मासिकाशी त्यांचे दीर्घकाळ नाते होते आणि त्या मासिकाच्या त्या अधिकृत ‘व्याकरण सल्लागार’ म्हणून कार्यरत होत्या. ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’, ‘मराठी शब्दलेखन कोश’ आणि ‘सुगम मराठी व्याकरण कोश’ हे त्यांचे ग्रंथ मराठी भाषेच्या अभ्यासात अत्यंत मोलाचे मानले जातात. निवृत्तीनंतरही त्यांनी स्पर्धा परीक्षा आणि युपीएससी (UPSC)च्या विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन केले.

Yasmin Shaikh: ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी निधन; मुख्यमंत्र्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली!

त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक साहित्यिकांनी आणि अभ्यासकांनी तीव्र शोक व्यक्त केला असून, प्रा. शेख यांच्या जाण्याने मराठी भाषेचा आणि भाषाशास्त्राचा एक मार्गदर्शक दीपस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त केली आहे.

Web Title: Prof yasmin shaikh passes away marathi grammarian 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 04:03 PM

Topics:  

  • big breaking
  • Death
  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या शेवटच्या फोन कॉलची हृदयस्पर्शी आठवण; ‘लव यु बाळा’ म्हणत निरोप
1

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या शेवटच्या फोन कॉलची हृदयस्पर्शी आठवण; ‘लव यु बाळा’ म्हणत निरोप

नाना पाटेकरांच्या निधनाने रझा मुराद भावुक; आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली
2

नाना पाटेकरांच्या निधनाने रझा मुराद भावुक; आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली

नाना पाटेकरांची शेवटची इच्छा काय होती? आज पुण्यातील डोणजे येथे शासकीय इतमामात अखेरचा निरोप
3

नाना पाटेकरांची शेवटची इच्छा काय होती? आज पुण्यातील डोणजे येथे शासकीय इतमामात अखेरचा निरोप

नाना पाटेकरांच्या अखेरच्या क्षणी नेमकं काय घडलं? पहाटे २.३० वाजता मेसेज, ४५ मिनिटे CPR अन्…
4

नाना पाटेकरांच्या अखेरच्या क्षणी नेमकं काय घडलं? पहाटे २.३० वाजता मेसेज, ४५ मिनिटे CPR अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.