Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रीडाविश्वात खळबळ! BCCI अंडर-19 संघात निवड झालेल्या महिला खेळाडूची आत्महत्या

क्रीडाविश्वाला हादरवणारी घटना समोर आली आहे. नुकतीच बीसीसीआयच्या अंडर-19 महिला क्रिकेट संघात निवड झालेल्या प्रतिभावान खेळाडू नंदिनी हिने राहत्या घरी आत्महत्या केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 14, 2026 | 12:17 PM
क्रीडाविश्वात खळबळ! BCCI अंडर-19 संघात निवड झालेल्या महिला खेळाडूची आत्महत्या
Follow Us
Follow Us:
  • 17 वर्षीय क्रिकेटपटू नंदिनी राठोडची आत्महत्या
  • ब्लॅकमेलिंगला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप
  • पोलिसांकडून तपास सुरु
विकाराबाद : क्रीडाविश्वाला हादरवणारी घटना समोर आली आहे. नुकतीच बीसीसीआयच्या अंडर-19 महिला क्रिकेट संघात निवड झालेल्या प्रतिभावान खेळाडू नंदिनी हिने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. याबाबतचे वृत्त IANS ने दिलं आहे. या आत्महत्येमुळे संपूर्ण क्रीडा वर्तुळावर आणि कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर मृत नंदिनीच्या कुटुंबियांनी आणि संतप्त नातेवाईकांनी रस्त्यावर उतरत जोरदार निदर्शने केली. दोन तरुणांच्या मानसिक त्रासाला व ब्लॅकमेलिंगला कंटाळूनच आपल्या मुलीने हे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे.

 

कोण होती नंदिनी?

नंदिनी ही तेलंगणातील विकाराबाद जिल्ह्यातील यलाल मंडळातील संगय्यापल्ली गावची रहिवासी होती. ती शिक्षणासाठी आणि क्रिकेटचे व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी विकाराबाद शहरातील मधु कॉलनी इथं तिच्या आजीकडे राहत होती. अभ्यासासोबतच ती क्रिकेटचा सराव करत होती. तिच्या मेहनतीला यश मिळालं आणि नुकतीच तिची BCCI अंडर-19 महिला क्रिकेट संघात निवड झाली होती. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात आनंदाचं वातावरण होतं. भविष्यात भारतीय संघाकडून खेळण्याचं स्वप्न तिने पाहिलं होतं. मात्र, तिच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमीक माहितीनुसार, मृत नंदिनीने आपल्याच घरातील सिलिंग फॅनच्या हुकाला दुपट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. काही युवकांच्या सततच्या त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून या तरुण खेळाडूने आपले आयुष्य संपवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर कायदेशीर व पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करून शुक्रवारी सकाळी मृतदेह पोस्टमार्टम नंतर शोकाकुल कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला.

या अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटनेनंतर मृत नंदिनीच्या कुटुंबियांनी आणि संतप्त नातेवाईकांनी रस्त्यावर उतरत जोरदार निदर्शने केली. अनिल आणि कृष्णा नावाच्या दोन युवकांच्या सततच्या मानसिक त्रासाला व ब्लॅकमेलिंगला कंटाळूनच आपल्या मुलीने हे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. तसेच, या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कुटुंबियांनी लावून धरली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल व निष्पक्ष तपास करण्यासाठी विकाराबादचे सर्कल इन्स्पेक्टर रघु यांनी मृत नंदिनीचा मोबाईल जप्त केला असून, तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : सोसायटीत पोलिसांची गाडी येईल, तुम्हाला हातकड्या घालून तुरुंगात नेले जाईल; महिलेला सायबर चोरट्यांनी घातला गंडा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून तिला नेमका कोणी व कशा प्रकारे त्रास दिला होता, हे शोधून काढण्यासाठी तिचे इंस्टाग्राम अकाउंट आणि चॅट्स कसून तपासले जात आहेत. एका होतकरू व प्रतिभावान खेळाडूचा अशा प्रकारे अचानक अंत होणे क्रीडा जगतासाठी कधीही न भरून निघणारे नुकसान मानले जात आहे. पोलीस तपासातून समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारावर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नंदिनी कोण होती?

    Ans: नंदिनी ही तेलंगणातील विकाराबाद जिल्ह्यातील यालाल मंडलातील संगयापल्ली गावची रहिवासी होती. ती विकाराबाद शहरातील मधु कॉलनी येथे आजीकडे राहून शिक्षणासोबत क्रिकेटचे प्रशिक्षण घेत होती. नुकतीच तिची बीसीसीआय अंडर-19 महिला क्रिकेट संघात निवड झाली होती.

  • Que: नंदिनीच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांचा आरोप काय आहे?

    Ans: दोन युवकांच्या सततच्या मानसिक त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून नंदिनीने टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी निदर्शनांद्वारे केली आहे.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली आहे?

    Ans: पोलिसांनी संशयास्पद मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. नंदिनीचा मोबाईल जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. तिचे इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲप अकाऊंट तपासून सोशल मीडियातून त्रास दिला जात होता का, याचा तपास सुरू आहे.

Web Title: A female cricketer selected for the bcci under 19 team has died by suicide nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 12:17 PM

Topics:  

  • crime news
  • Death
  • Suicide case

संबंधित बातम्या

सातबारा आणि फेरफार नोंदीसाठी लाचेची मागणी; महिला मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
1

सातबारा आणि फेरफार नोंदीसाठी लाचेची मागणी; महिला मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

सोसायटीत पोलिसांची गाडी येईल, तुम्हाला हातकड्या घालून तुरुंगात नेले जाईल; महिलेला सायबर चोरट्यांनी घातला गंडा
2

सोसायटीत पोलिसांची गाडी येईल, तुम्हाला हातकड्या घालून तुरुंगात नेले जाईल; महिलेला सायबर चोरट्यांनी घातला गंडा

दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार, पाठलाग करत तरुणावर कोयत्याने वार; आळंदीतील घटनेनं खळबळ
3

दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार, पाठलाग करत तरुणावर कोयत्याने वार; आळंदीतील घटनेनं खळबळ

पोलिसांकडूनच जीवाला धोका! तरुणाचा गंभीर आरोप; थेट आयुक्तांकडे केली तक्रार
4

पोलिसांकडूनच जीवाला धोका! तरुणाचा गंभीर आरोप; थेट आयुक्तांकडे केली तक्रार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.