Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ella Love income: शिक्षिकेची नोकरी सोडून महिला बनली ‘प्रोफेशनल कडलर’ अन् आता मिठी मारून करतीये कोट्यावधीची कमाई..

Ella Love income: अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या ५१ वर्षीय एला लव सध्या 'प्रोफेशनल कडलर' म्हणून जगभरात चर्चेत आल्या आहेत. १३ वर्षे शिक्षिकेची नोकरी करणाऱ्या एला यांनी हा क्षेत्रात येण्याचा निर्णय का घेतला? आणि काय असतो हा 'प्लॅटॉनिक टच'वर आधारित व्यवसाय? जाणून घ्या सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 02, 2026 | 11:44 AM
Professional Cuddler

Professional Cuddler

Follow Us
Follow Us:

Professional cuddler Ella Love income: अमेरिकेत सध्या एक वेगळाच व्यवसाय विषय गंभीर चर्चेचा ठरत आहे. लोकांना भावनिक आधार देण्यासाठी मिठी मारणे, जवळ बसून संवाद साधणे आणि मानसिक आधार देणे यासारख्या कामातून एका महिलेने कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. न्यूयॉर्कमध्ये राहणारी ५१ वर्षीय एला लव नावाची महिला सध्या ‘प्रोफेशनल कडलर’ म्हणून काम करत आहे.  हे काम ती दिवसातून तीन तास करत असून वर्षाला जवळपास ती १ कोटी रुपयांची कमाई करत असल्याची माहिती समोर आली आहे.

एला लव यापूर्वी शिक्षिका म्हणून काम करत होती. तब्बल १३ वर्षे तिने अध्यापन क्षेत्रात काम केले. मात्र सततचा ताण, मानसिक दबाव आणि कामाचा वाढता तणाव यामुळे ती त्रासली होती. याच काळात तिला एका लेखातून ‘प्रोफेशनल कडलिंग’ या व्यवसायाबद्दल माहिती मिळाली. यानंतर तिने सुमारे २५० पाउंड खर्च करून याबद्दलचे प्रशिक्षण घेतले आणि सुरुवातीला पार्टटाइम काम सुरू केले. गेल्या आठ वर्षांपासून ती पूर्णवेळ ‘प्रोफेशनल कडलर’ म्हणून कार्यरत आहेत.

‘प्रोफेशनल कडलर’चे नेमके काय काम असते?

प्रोफेशनल कडलिंगमध्ये क्लायंटला मिठी मारणे, भावनिक आधार देणे, त्यांच्या समस्या ऐकून घेणे आणि त्यांना मानसिकदृष्ट्या रिलॅक्स वाटेल असे वातावरण तयार करणे याचा समावेश असतो. अनेक लोक एकटेपणा, नैराश्य, तणाव किंवा भावनिक समस्यांमुळे या सेवांचा वापर करतात.

IPS Officer Salary: आयपीएस अधिकाऱ्यांना सुरुवातीला किती पगार मिळतो? पगाराशिवाय मिळतात ‘या’ व्हीआयपी सुविधा!

एला लव सांगते की, अनेक क्लायंट त्यांच्या आयुष्यातील अशा गोष्टी तिच्यासोबत शेअर करतात. ज्या त्यांनी आजवर कुणालाही सांगितलेल्या नसतात. काही लोक फक्त जवळ बसून बोलू इच्छितात, काहींना मिठीची गरज असते तर काहींना मानसिक आधार हवा असतो.

दिवसाला फक्त तीन तास काम करणारी एला एका तासासाठी १३ हजार रुपये शुल्क आकारते. तिच्या वार्षिक उत्पन्नाचा आकडा जवळपास १ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असल्याचे सांगितले जाते. अनेकवेळा ती एका सेशनमध्ये ९ तासांपर्यंतही काम करते. मात्र, बहुतांश वेळा ती कमी तास काम करूनच चांगले उत्पन्न मिळवते.

Teacher Bharti: पवित्र पोर्टलवर जागा अपलोड करण्यासाठी मुदतवाढ मिळणार? उमेदवारांची शिक्षण आयुक्तांकडे मोठी मागणी!

क्लायंट्सकडून मर्यादा ओलांडण्याचे प्रयत्न

एलाने एका मुलाखतीत सांगितले की, हा व्यवसाय दिसायला सोपा असला तरी प्रत्यक्षात तो खूप आव्हानात्मक आहे. प्रत्येक क्लायंट वेगळा असतो. काहीजण भावनिकदृष्ट्या खूप कमजोर असतात तर काही क्लायंट वैयक्तिक मर्यादा ओलांडण्याचाही प्रयत्न करतात.

मात्र, एला स्पष्ट नियमांचे पालन करते. प्रोफेशनल कडलिंगमध्ये कोणत्याही प्रकारची लैंगिक सेवा दिली जात नाही हे क्लायंटला स्पष्ट करते. हा व्यवसाय पूर्णपणे भावनिक आधार आणि ‘प्लॅटॉनिक टच’वर आधारित असल्याचे ती सांगते.

Web Title: Professional cuddler ella love income one crore annually hugging clients

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • love life
  • love news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.