फोटो सौजन्य- सोशल मीडिया
IPS officer starting salary per month: देशातील सर्वात कठीण मानली जाणारी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन अनेक तरुणांचे आयपीएस(IPS) बनण्याचे स्वप्न असते. कायदे सुव्यवस्था निर्माण करणारे हे पद (IPS) अधिकाऱ्यांना सन्मान मिळवून देणारे असून चांगल्या पगारासह अनेक सरकारी सुविधा मिळवून देणारे आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की, IPS अधिकाऱ्यांची सुरुवातीचे पद कोणते असते आणि त्यांना पगार किती असतो. चला तर मग जाणून घेऊया…
नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर IPS अधिकाऱ्यांची पहिली नियुक्ती ही साधारणपणे उपअधीक्षक पोलिस (DSP) या पदावर होते. या दरम्यान कोणत्याही जिल्ह्यात विरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना पोलिस प्रशासनाची जबाबदारी दिली जाते.
IPS अधिकाऱ्यांना प्रशिक्षणादरम्यानही पगार दिला जातो. हे प्रशिक्षण प्रामुख्याने हैद्राबादच्या सरदार वल्लभाई पटेल नॅशनल पोलिस अकॅडमीमध्ये होते.
आयपीएस अधिकाऱ्यांचे सुरवातीचे वेतन (IPS Officer Salary) हे प्रति महिना ५६,१०० रुपये असते. याशिवाय त्यांना महागाई भत्ता(DA), घरभाडे भत्ता(HRA), प्रवास भत्ता(TA) आणि इतर सुविधाही दिल्या जातात. या सर्व सुविधा मिळून त्यांचा पगार जवळजवळ ७५,००० रुपये ते ८०,००० रुपयांपर्यंत पोहचतो.
या क्षेत्रातील अनुभव आणि पदोन्नती सोबत अधिकाऱ्यांचे वेतनदेखील वाढत जाते. पोलिस अधिक्षक(SP), उपमहानिरीक्षक (DIG), महानिरीक्षक (IG) आणि पोलिस महासंचालक (DGP) या पदांपर्यंत पोहचल्यानंतर १ लाख रूपयांपासून २.२५ लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.
IPS अधिकाऱ्यांना सरकारी बंगला, गाडी आणि चालक, आरोग्य सुविधा, सुरक्षा रक्षक, प्रवास भत्ता, पेन्शन आणि इतर सरकारी लाभ मिळतात. या कारणामुळे आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांची प्रतिष्ठा ही आपल्या समाजात अधिक असते.






