Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World University Rankings: QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी २०२७ मध्ये ‘या’ भारतीय शिक्षण संस्थांचा जगात डंका!

QS World University Rankings 2027: QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी २०२७ जाहीर झाली असून भारताच्या ५२ शिक्षण संस्थांनी यात स्थान मिळवले आहे. यामध्ये आयआयटी दिल्ली देशात अव्वल ठरले आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 12, 2026 | 10:14 AM
qs

qs

Follow Us
Follow Us:

QS World University Rankings 2027: भारताच्या उच्च शिक्षण व्यवस्थेने जागतिक स्तरावर आपली उपस्थिती आणखी मजबूत केली आहे. ‘क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२७’ (QS World University Ranking 2027) मध्ये भारताच्या ५२ उच्च शिक्षण संस्थांना स्थान मिळाले आहे, तर २०१५ मध्ये हा आकडा केवळ ११ होता. केंद्र सरकारनुसार, गेल्या दशकात उच्च शिक्षणाचा झालेला विस्तार आणि संस्थांमध्ये करण्यात आलेल्या विविध सुधारणांचा सकारात्मक परिणाम जागतिक क्रमवारीत भारताच्या स्थितीवर स्पष्टपणे दिसून येत आहे. दरम्यान, क्यूएस रँकिंगमध्ये समाविष्ट होणाऱ्या भारतीय संस्थांच्या संख्येत वाढ होण्यासोबतच अनेक संस्थांच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे. ५२ भारतीय संस्थांपैकी २६ संस्थांची रँकिंग सुधारली आहे, ९ संस्था त्यांच्या मागील स्थितीवर कायम राहिल्या असून १५ संस्थांच्या रँकिंगमध्ये घसरण नोंदवली गेली आहे. तसेच, २ संस्थांनी पहिल्यांदाच या क्रमवारीत स्थान मिळवले आहे.

आयआयटी दिल्ली (IIT Delhi) ठरले सर्वात पुढे

QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी २०२७ मध्ये आयआयटी दिल्ली हा भारताचा सर्वोत्कृष्ट क्रमांक मिळवणारा संस्थान ठरला आहे. आयआयटी दिल्लीने ५ स्थानांची झेप घेत जागतिक स्तरावर ११८ वा क्रमांक पटकावला आहे. यानंतर आयआयटी बॉम्बे १३४ व्या, आयआयटी मद्रास १७० व्या, आयआयटी खरगपूर २०५ व्या आणि आयआयएससी बंगळुरू २२१ व्या स्थानावर राहिले. मागील वर्षाच्या तुलनेत आयआयटी बॉम्बेची रँकिंग ५ स्थानांनी खाली आली आहे, तर आयआयटी मद्रास आणि आयआयटी खरगपूरच्या स्थितीत सुधारणा झाली आहे.

आयआयटी व्यतिरिक्त या संस्थांचीही उत्कृष्ट कामगिरी:

यावेळी जागतिक क्रमवारीत भारताची उत्तम कामगिरी केवळ आयआयटी आणि आयआयएससी पुरती मर्यादित राहिली नाही, तर अनेक नॉन-आयआयटी संस्थांनीही क्रमवारीत मोठी भरारी घेतली आहे. उदाहरणार्थ, बिट्स पिलानी ९३ स्थानांनी वर जात ५७५ व्या स्थानावर पोहोचले, तर व्हीआयटी (VIT) ने ९४ स्थानांची झेप घेत ५९७ वा क्रमांक मिळवला. शूलिनी विद्यापीठ (Shoolini University) देखील ५१ स्थानांनी वर जात ४५२ व्या स्थानावर पोहोचले.

UPSC Mains 2026 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; परीक्षेला जाताना ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी!

याशिवाय, आयआयटी हैदराबादच्या रँकिंगमध्ये ७६ स्थानांची सुधारणा झाली आहे. जामिया मिलिया इस्लामियानेही ७५ हून अधिक स्थानांची मजल मारत ६८६ वा क्रमांक पटकावला. क्रमवारीत समाविष्ट असलेल्या एकूण ५२ भारतीय संस्थांपैकी १८ संस्थांनी त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे, ज्यामध्ये १३ नॉन-आयआयटी संस्थांचा समावेश आहे.

NEET PG 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षा सिटी स्लिप कधी आणि कशी डाउनलोड करावी? जाणून घ्या सविस्तर!

सरकारने एनआयआरएफ (NIRF) आणि एनईपी (NEP) चे मानले श्रेय:

भारताच्या जागतिक क्रमवारीतील वाढत्या उपस्थितीचे श्रेय केंद्र सरकारने ‘एनआयआरएफ’ (NIRF) आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील सुधारणांना दिले आहे. एनआयआरएफची सुरुवात २०१५ मध्ये झाली. या अंतर्गत उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकन अध्यापन व संसाधने, संशोधन आणि व्यावसायिक सराव, पदवीचे परिणाम, पोहोच आणि सर्वसमावेशकता आणि सहकाऱ्यांचे मत यांसारख्या निकषांवर केले जाते. याशिवाय, सरकारने जागतिक क्रमवारीत भारतीय संस्थांच्या चांगल्या कामगिरीमागे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ (NEP 2020) सह अनेक उपक्रमांनाही महत्त्वाचे ठरवले आहे.

Web Title: Qs world university rankings 2027 india marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • education

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! IIIT Pune च्या संशोधन प्रकल्पांना केंद्र सरकारचे मोठे अनुदान प्राप्त
1

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! IIIT Pune च्या संशोधन प्रकल्पांना केंद्र सरकारचे मोठे अनुदान प्राप्त

School Sanchmanyata 2026: शाळांसाठी महत्त्वाची बातमी! संचमान्यता भरण्यासाठी आता ‘या’ तारखेची अंतिम मुदत असणार
2

School Sanchmanyata 2026: शाळांसाठी महत्त्वाची बातमी! संचमान्यता भरण्यासाठी आता ‘या’ तारखेची अंतिम मुदत असणार

School Dropouts: एकही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही; राज्यभर विशेष शोधमोहीम राबवण्याचे निर्देश
3

School Dropouts: एकही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही; राज्यभर विशेष शोधमोहीम राबवण्याचे निर्देश

NEET PG 2026 Result जाहीर; मागील ६ वर्षांच्या तुलनेत यंदा कट ऑफ सर्वात खाली!
4

NEET PG 2026 Result जाहीर; मागील ६ वर्षांच्या तुलनेत यंदा कट ऑफ सर्वात खाली!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.