फोटो सौजन्य - Social Media
NEET PG 2024 परीक्षेचे आयोजन ११ ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात आले आहे. दरवर्षी या परीक्षेला उत्तीर्ण करण्यासाठी देशभरातून अनेक विद्यार्थी प्रयत्नशील असतात. यांदाचयता वर्षीही अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे. विशेष म्हणजे ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार असून, एकाच दिवशी एक सेक्शन असे या परीक्षेचे गणित आहे. परीक्षेची वेळ साडे ३ तास असून, या कालावधीत विद्यार्थ्यांना एकूण २०० MCQs ला सामोरे जावे लागणार आहे. महत्वाची बाब म्हणजे ८ ऑगस्टला NEET PG EXAM 2024 चे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे, तर अर्जकर्त्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र natboard.edu.in तसेच nbe.edu.in लिंकवरून डाउनलोड करता येणार आहे.
यादरम्यान NEET PG 2024 परीक्षेस स्थगित करण्याची याचिका दाखल करण्यात आली आहे. विशाल सोरेन यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यांनी या मागील कारणेही सांगितले आहेत. त्यांच्या मते, NEET PG EXAM 2024 च्या उमेदवारांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहचण्यास कठीण होत आहे, तसेच परीक्षा २ दिवसांवर आली आहे आणि अद्याप विद्यार्थ्यांना नॉर्मलायझेशनचा फॉर्मुला मिळालेला नाही आहे. या कारणामुळे परीक्षा स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशाल सोरेन यांच्या या याचिकेवर न्यायालय ९ ऑगस्टला सुनावणी करणार आहे.
विशाल सोरेन यांच्या या याचिकेमध्ये नमूद केले गेले आहे कि,’एकाच ठिकाणच्या उमेदवारांसाठी अशा शहरांची निवड केली गेली आहे कि तिथे पोहचणे उमेदवारांना असुविधाजनक आहे तसेच प्रश्नपत्रिकेच्या चारी सेट्सच्या नॉर्मलायजेशनचा फॉर्मुल्याची मागणी करून ते लवकरात लवकर विद्यार्थ्यांना कळवण्यात यावे.’ विद्यार्थ्यांचे लक्ष कोर्टाच्या निर्णयाकडे आहे.