Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET and JEE Entrance Exams: नीट व जेईई प्रवेश परीक्षांत ‘फेशियल रेकग्निशन’ तंत्रज्ञान बंधनकारक

नव्या प्रणाली अंतर्गत, आता उमेदवारांना परीक्षा अर्ज सादर करताना थेट मोबाईल किंवा संगणकाच्या कॅमेरातून लाइव्ह फोटो अपलोड करणे अनिवार्य राहणार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Dec 27, 2025 | 04:22 PM
NEET exam 2026, JEE exam new rules, NTA facial recognition

NEET exam 2026, JEE exam new rules, NTA facial recognition

Follow Us
Follow Us:
  • डमी उमेदवार व फसवणूक रोखण्यासाठी NTAचा कडक निर्णय
  • प्रवेश परीक्षांत पारदर्शकता वाढणार; चेहरा ओळख तंत्रज्ञान लागू
  • नीट-जेईई 2026: अर्ज करताना लाईव्ह फोटो अपलोड अनिवार्य
NEET and JEE Entrance Exams: देशातील सर्वाधिक महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट व जेईई यामध्ये गत काही वर्षांत डमी उमेदवार, पेपरफुटी, ओळख दडवून परीक्षा देणे अशा गैरप्रकारांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) आता कठोर पावले उचलत असून, २०२६ पासून परीक्षा प्रक्रियेत ‘चेहरा ओळख’ (फेशियल रेकग्निशन) तंत्रज्ञान बंधनकारक करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता वाढून फसवणुकीला कायमचा आळा बसणार असल्याचा विश्वास एनटीएकडून व्यक्त करण्यात येत आहे.

BMC Elections 2026: महायुतीचा ‘जागा फॉर्म्युला’ तयार, ९९% जागांवर एकमत; आज रात्रीपर्यंत अंतिम शिक्कामोर्तब

नव्या प्रणाली अंतर्गत, आता उमेदवारांना परीक्षा अर्ज सादर करताना थेट मोबाईल किंवा संगणकाच्या कॅमेरातून लाइव्ह फोटो अपलोड करणे अनिवार्य राहणार आहे. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या राधाकृष्णन समितीच्या शिफारशींनुसार हा बदल राबवला जात असून यामुळे अर्ज करणारा विद्यार्थी आणि प्रत्यक्ष परीक्षेला बसणारा उमेदवार या दोघांच्या ओळखीतील फरक त्वरित लक्षात येऊ शकेल.

नीट २०२५ परीक्षेदरम्यान दिल्लीतील काही निवडक केंद्रांवर ‘आधार-आधारित फेशियल रेकग्निशन’ची प्रायोगिक चाचणी घेण्यात आली होती. हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी ठरल्याने आगामी २०२६ पासून देशातील सर्व केंद्रांवर ही तंत्रप्रणाली लागू करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे.

‘प्रशांत जगताप यांना दिलेला शब्द पाळणार’; काँग्रेस नेते वडेट्टीवारांचं मोठं विधान

या तंत्रज्ञानात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) उमेदवाराच्या चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांचे सखोल विश्लेषण करते आणि ते डेटाबेसमध्ये जतन करते. परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा थेट स्कॅनद्वारे चेहरा तपासला जाईल आणि डेटाबेसशी जुळणारी ओळख पटल्याशिवाय कोणालाही परीक्षागृहात प्रवेश दिला जाणार नाही.

काय अपेक्षित आहे.

– डमी उमेदवारांना प्रवेश मिळणे अशक्य

– फसवणूक आणि पेपरफुटी प्रकारावर मोठा अंकुश

– उमेदवारांच्या सुरक्षिततेसह परीक्षा प्रक्रियेत वाढती पारदर्शकता

– देशभर एकसमान परीक्षा सुरक्षायंत्रणा लागू

 

 

Web Title: Facial recognition technology to be mandatory in neet and jee entrance exams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 04:22 PM

Topics:  

  • education news
  • JEE exam
  • NEET Exam

संबंधित बातम्या

NEET Re Exam Result: नीट विद्यार्थ्यांसाठी मोठी गूड न्यूज! Answer Key मध्ये एक प्रश्न ‘ड्रॉप’, सर्व उमेदवारांना मिळणार बोनस गुण
1

NEET Re Exam Result: नीट विद्यार्थ्यांसाठी मोठी गूड न्यूज! Answer Key मध्ये एक प्रश्न ‘ड्रॉप’, सर्व उमेदवारांना मिळणार बोनस गुण

CJP Protest: फक्त अंगठ्याचा ठसा द्या…! CJP अध्यक्ष अभिजीत दीपकेंकडून धर्मेंद्र प्रधानांना वाढदिवसाची ‘खास’ भेट
2

CJP Protest: फक्त अंगठ्याचा ठसा द्या…! CJP अध्यक्ष अभिजीत दीपकेंकडून धर्मेंद्र प्रधानांना वाढदिवसाची ‘खास’ भेट

University News: धाराशिव विद्यापीठ उपकेंद्र सक्षम करण्याची मागणी; प्र-कुलगुरूंना निवेदन, ‘वन विंडो’ सेवेसह विविध सुविधांची मागणी
3

University News: धाराशिव विद्यापीठ उपकेंद्र सक्षम करण्याची मागणी; प्र-कुलगुरूंना निवेदन, ‘वन विंडो’ सेवेसह विविध सुविधांची मागणी

Education News: ग्रामीण शाळांना मोठा दिलासा! ९ वी-१० वीच्या २० विद्यार्थ्यांसाठी ३ शिक्षक मंजूर
4

Education News: ग्रामीण शाळांना मोठा दिलासा! ९ वी-१० वीच्या २० विद्यार्थ्यांसाठी ३ शिक्षक मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.