Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नीट, जेईई परीक्षांसाठी फेस रिकग्निशन! इतर परीक्षांमध्येही ‘ही’ व्यवस्था जाणार राबवली

२०२६ पासून नीट, जेईईसह प्रमुख प्रवेश परीक्षांमध्ये उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी फेस रिकग्निशन तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय एनटीएने घेतला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 26, 2025 | 02:50 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रमुख प्रवेश परीक्षांमध्ये उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी फेस रिकग्निशन (चेहरा ओळख) तंत्रज्ञानाचा वापर
  • अर्ज प्रक्रियेदरम्यान लाईव्ह फोटो अपलोड करणे बंधनकारक
  • परीक्षा केंद्रांवर आधार-आधारित फेसियल रिकग्निशन ऑथेंटिकेशन प्रणालीची चाचणी घेण्यात आली
नीट, जेईई यांसारख्या देशातील महत्त्वाच्या राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) कडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. २०२६ पासून नीट, जेईई तसेच इतर प्रमुख प्रवेश परीक्षांमध्ये उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी फेस रिकग्निशन (चेहरा ओळख) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या नव्या प्रणालीमुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार असून फसवणूक, बनावट उमेदवार आणि पेपरफुटीचे प्रकार रोखण्यास मदत होणार आहे.

यंदाचे वर्ष रोजगार बाजारासाठी निर्णायक! तरुणाईची वाढती भूमिका आली दिसून

एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, या नव्या नियमांनुसार उमेदवारांना अर्ज प्रक्रियेदरम्यान लाईव्ह फोटो अपलोड करणे बंधनकारक असेल. हा फोटो प्रत्यक्ष वेळेत (Live Capture) घेतला जाणार असल्याने, अर्ज भरणारी व्यक्ती खरीच उमेदवार आहे की नाही, याची तात्काळ खातरजमा करता येणार आहे. परीक्षा केंद्रावर उपस्थित असलेला उमेदवार आणि अर्जात दिलेला फोटो यांची फेस रिकग्निशन प्रणालीद्वारे तुलना केली जाणार आहे.

हा महत्त्वपूर्ण बदल केंद्र सरकारने स्थापन केलेल्या राधाकृष्णन समितीच्या शिफारशींनुसार करण्यात येत आहे. प्रवेश परीक्षांमधील वाढती फसवणूक, बनावट प्रवेशपत्रे, दुसऱ्या व्यक्तीकडून परीक्षा देण्याचे प्रकार आणि तांत्रिक गैरप्रकार लक्षात घेता अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह यंत्रणा उभारण्याची गरज समितीने अधोरेखित केली होती. या निर्णयामागे नीट-२०२५ दरम्यान राबविण्यात आलेला एक प्रायोगिक उपक्रम महत्त्वाचा ठरला आहे. दिल्लीतील काही निवडक परीक्षा केंद्रांवर आधार-आधारित फेसियल रिकग्निशन ऑथेंटिकेशन प्रणालीची चाचणी घेण्यात आली होती. या प्रायोगिक प्रकल्पात उमेदवारांची ओळख पडताळणी यशस्वीरीत्या पार पडली असून, गैरप्रकारांचे प्रमाण कमी झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

हा प्रयोग भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI), नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर (NIC) आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) यांच्या संयुक्त सहकार्याने राबविण्यात आला. तिन्ही संस्थांनी मिळून विकसित केलेली ही प्रणाली सुरक्षित, वेगवान आणि विश्वासार्ह असल्याचे एनटीएने स्पष्ट केले आहे. एनटीएने पुढे सांगितले की, २०२६ पासून देशभरातील प्रमुख प्रवेश परीक्षांमध्ये ही फेस रिकग्निशन प्रणाली टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे. सुरुवातीला नीट आणि जेईईसारख्या मोठ्या परीक्षांमध्ये अंमलबजावणी करून नंतर इतर परीक्षांमध्येही ही व्यवस्था राबवली जाणार आहे.

सोशल मीडिया पेज आहे? अशा प्रकारे मिळवा Paid Collaborator! कमवा लाखात

या निर्णयामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढणार असून, परीक्षांबाबत निर्माण झालेली शंका आणि अविश्वास दूर होण्यास मदत होईल, असा विश्वास शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र, डेटा सुरक्षितता आणि गोपनीयतेबाबत योग्य काळजी घेण्यात यावी, अशी अपेक्षाही काही पालक आणि विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. एकूणच, प्रवेश परीक्षांमध्ये पारदर्शकता, विश्वासार्हता आणि शिस्त आणण्यासाठी एनटीएचा हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, भविष्यातील परीक्षा प्रक्रियेसाठी तो दिशादर्शक ठरणार आहे.

Web Title: Face recognition for neet jee exams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 02:50 PM

Topics:  

  • JEE
  • NEET
  • NEET Exam

संबंधित बातम्या

NEET SS Admit Card 2025: प्रवेशपत्र आज जाहीर होण्याची शक्यता; कसे कराल प्रवेशपत्र डाउनलोड?
1

NEET SS Admit Card 2025: प्रवेशपत्र आज जाहीर होण्याची शक्यता; कसे कराल प्रवेशपत्र डाउनलोड?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.